
चालू घडामोडी 01, मार्च 2025 | ब्रिटेनचा प्रतिष्ठित 'नाइटहूड' पुरस्कार कोणत्या भारतीयाला देण्यात आला ? | Which Indian was awarded Britain's Prestigious 'Knighthood' Award?

ब्रिटेनचा प्रतिष्ठित 'नाइटहूड' पुरस्कार कोणत्या भारतीयाला देण्यात आला ?
Which Indian was awarded Britain's Prestigious 'Knighthood' Award?
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच कोणत्या भारतीयाला युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तिसरे यांच्या कडून ‘ मानद नाइटहूड ’ हा किताब मिळाला ?
1. श्री सुनील भारती मित्तल
2. श्री मुकेश अंबानी
3. श्री गौतम अदानी
4. श्री राधाकिशन दमानी
उत्तर : श्री सुनील भारती मित्तल
बातमी काय आहे ?
• भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री. सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे (King Charles III) यांनी नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सेलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (मानद नाइटहूड) पुरस्काराने सन्मानित केले आहे.

भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक कोण आहे ?
• भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री. सुनील भारती मित्तल हे आहे.
• भारती एंटरप्रायझेसचा व्यवसाय दूरसंचार, रिटेल विक्री, वित्तीय सेवा, विमा, उत्पादन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात पसरलेला आहे.
उदाहरणार्थ :
• भारती एयरटेल लिमिटेड (Bharti Airtel Ltd.)
• भारती इंफ्राटेल (Bharti Infratel)
• भारती रिटेल लिमिटेड (Bharti Retail Ltd.)
• भारती टेलीटेक लिमिटेड (Bharti TeleTech Ltd.)
• भारती फाउंडेशन (Bharti Foundation)
श्री सुनील भारती मित्तल यांना मानद नाइटहूड पुरस्कार का देण्यात आला ?
• युनायटेड किंग्डम आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध वाढविण्यात श्री सुनील भारती मित्तल यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा मानद नाइटहूड पुरस्कार देण्यात आला आहे.
नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सेलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(Knight Commander of the Most Excellent Order of the British Empire)
• नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सेलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE) हा युनायटेड किंग्डम कडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.
• हे "ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर" मधील दुसरे सर्वोच्च स्थान आहे.
• कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा, धर्मादाय कार्य किंवा लष्करी सेवेत असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जाते.
KBE पुरस्कार मिळाले ले भारतीय कोण ?
• श्री जमशेद इराणी – टाटा स्टीलचे माजी संचालक.
• श्री रविशंकर – प्रसिद्ध सतारवादक.
• श्री रतन टाटा - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष
• श्री सुनील भारती मित्तल - भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आणि संस्थापक