
चालू घडामोडी 03, मार्च 2025 | वनतारा ला ‘प्राणी मित्र’ पुरस्कार | Vantara received the “Prani Mitra” National Award

वनतारा ला ‘प्राणी मित्र’ पुरस्कार
Vantara received the “Prani Mitra” National Award
Subject : GS - पुरस्कार, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच ‘वनतारा’ या प्राणी पुनर्वसन केंद्राला केंद्र सरकारकडून ‘प्राणी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हे केंद्र खालील पैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. कर्नाटक
4. आंध्र प्रदेश
उत्तर : गुजरात
बातमी काय आहे ?
• उद्योगपती अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ या प्राणी पुनर्वसन केंद्राला केंद्र सरकारकडून ‘प्राणी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
• नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे एका समारंभात केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
‘वनतारा’ ला ‘प्राणी मित्र’ पुरस्कार का देण्यात आला ?
• भारतातील 'कॉर्पोरेट' श्रेणी अंतर्गत ‘वनतारा’च्या राधे कृष्णा मंदिर प्राणी कल्याण ट्रस्टद्वारे हत्तींचे बचावकार्य, संरक्षण, उपचार तसेच त्यांची आजीवन काळजी घेतल्याबद्दल असाधारण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
• भारतात वन्य प्राण्यांची देखभाल, कल्याण या क्षेत्रात हा सर्वोच्च सन्मान समजला जातो.
वनतारा पुनर्वसन केंद्रा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• वनतारा हे रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स फाउंडेशनसह स्थापन केलेले प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र आहे.
• हे भारतातील गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे.
• या केंद्रातर्फे आत्तापर्यंत 240 हून हत्तींची सुटका करण्यात आली असून त्यांना साखळी-मुक्त करून, सुरक्षित आणि समृद्ध वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
• यामध्ये 30 सर्कशीतील हत्ती, वृक्षतोड उद्योगात ओंडके वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे हत्ती तसेच पर्यटन आणि रस्त्यावर भीक मागण्यासाठी वापर करून वर्षानुवर्ष शोषण करण्यात येत असेलल्या हत्तींचा समावेश आहे.
• वनतारा’च्या प्राणी पुनर्वसन केंद्राच्या 998 एकर विस्तीर्ण नैसर्गिक जंगलात हत्ती मुक्तपणे वावरू शकतात.
• त्यांच्यासाठी नैसर्गिकरित्या तलाव तयार करण्यात आलेले आहे.
• येथे जखमी हत्तींचे रोग व्यवस्थापन आणि त्यांच्या वेदनाशमनासाठी ॲलोपॅथी, आयुर्वेदासह एक्यूपंक्चरसारख्या इतर पर्यायी औषधांसह प्रगत पशुवैद्यकीय व्यवस्थापन आहे.