राष्ट्रीय विज्ञान दिवस
National Science Day
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
1. चंद्रशेखर वेंकट रमण सर
2. श्रीनिवास रामानुजन सर
3. प्रशांत चंद्र महालनोबिस सर
4. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर
उत्तर : चंद्रशेखर वेंकट रमण सर
• चंद्रशेखर वेंकट रमण सर : 28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन
• प्रशांत चंद्र महालनोबिस सर : 29 जून - राष्ट्रीय सांख्यिकी दिवस
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : 15 ऑक्टोबर - जागतिक विद्यार्थी दिन, महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’
• श्रीनिवास रामानुजन सर : 22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिवस
राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरी करतात ?
• देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
• 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमन इफेक्ट' (Raman Effect) हा शोध लावला.
• यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
• या दिनाचे महत्त्व ओळखून भारत सरकारने 1986 रोजी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला ?
• 28 फेब्रुवारी 1987 रोजी पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• 'विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे' आहे, ही राष्ट्रीय विज्ञान दिवस 2025 ची संकल्पना (थीम) आहे.
रमण इफेक्ट शोध कसा लागला ?
• एकदा सर सी.व्ही. रमन सर प्रवास करताना त्यांना भूमध्य समुद्राचे निळे पाणी दिसले.
• ‘समुद्राचा रंग हा आकाशाच्या रंगाचे फक्त प्रतिबिंब होता’ आणि येथूनच रमण इफेक्ट संशोधनाला सुरुवात झाली.
• त्यांनी क्वार्ट्ज प्रिझमने प्रकाशाच्या विखुरणाऱ्या परिणामाचा प्रयोग केला.
रमण इफेक्ट म्हणजे काय ? (Raman Effect)
• सर सी.व्ही. रमन आणि त्यांचे विद्यार्थी के.एस. कृष्णन यांना असे आढळून आले की प्रकाश, पारदर्शक माध्यमातून गेल्यानंतर, विखुरताना त्याची तरंगलांबी (Wavelength) आणि ऊर्जा (Energy) बदलतो. या घटनेला रमन इफेक्ट किंवा रमन स्कॅटरिंग म्हणतात.
• जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक म्हणजेच स्वच्छ माध्यमावर पडतो तेव्हा तो काही प्रमाणात तसाच पुढे जातो, काही प्रमाणात परावर्तित (Reflect) होतो आणि काही वेळा त्याच्या तरंगलांबी (Wavelength) मध्ये थोडासा बदल होतो.
समुद्र निळा का दिसतो ?
सूर्यप्रकाश पाण्यावर पडतो आणि त्यातील काही रंग शोषले जातात तर निळा रंग परावर्तित होतो त्यामुळे समुद्र निळा दिसतो.
रमन इफेक्टचे महत्त्व काय आहे ?
• रमन इफेक्ट हा विज्ञानात महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला प्रकाश वेगवेगळ्या पदार्थांशी कसा संवाद साधतो हे समजून घेण्यास मदत करतो.
• प्रकाशाचे वर्तन स्पष्ट करते : पृष्ठभागावर आदळल्यावर प्रकाश कसा पसरतो हे समजून घेण्यास मदत करते.
• विज्ञान आणि संशोधनात : साहित्य, रसायने आणि जैविक नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे.
• वैद्यकीय क्षेत्रात : प्रगत इमेजिंग तंत्रांद्वारे रोगांचे निदान करण्यासाठी वापरले जाते.
• फॉरेन्सिक सायन्स : गुन्ह्याच्या ठिकाणाचे पुरावे, जसे की औषधे किंवा स्फोटके तपासण्यासाठी वापरले जाते.
• अंतराळ संशोधनात : शास्त्रज्ञांना दूरच्या ग्रहांच्या रचनेचे विश्लेषण करण्यास मदत करते.
सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे झाला.
• वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळवले.
• त्यांनी रमण रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स आणि इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस ची स्थापना केली.

पुरस्कार आणि सन्मान :
• सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
• 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
• 1957 मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.