
चालू घडामोडी 06, मार्च 2025 | आशिया-पॅसिफिकमधील 12वी प्रादेशिक 3R आणि सर्कुलर इकोनॉमी फोरम

आशिया-पॅसिफिकमधील 12वी प्रादेशिक 3R आणि सर्कुलर इकोनॉमी फोरम
12th Regional 3R and Circular Economy Forum in Asia and the Pacific
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच आशिया-पॅसिफिकमधील 12वी प्रादेशिक 3R आणि सर्कुलर इकोनॉमी फोरम पार पडला. हा खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. युद्ध सराव
2. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था
3. कचरा व्यवस्थापन
4. डिजिटल अर्थव्यवस्था
उत्तर : कचरा व्यवस्थापन
बातमी काय आहे ?
• आशिया आणि पॅसिफिकमधील 12व्या प्रादेशिक 3R आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंचाची सांगता आज, 5 मार्च 2025 रोजी झाली.
• या दरम्यान सदस्य देशांनी 'जयपूर जाहीरनामा' एकमताने स्वीकारला.
आशिया-पॅसिफिकमधील 12वा प्रादेशिक 3R आणि सर्कुलर इकोनॉमी फोरम कशासाठी आहे ?
• हे एक प्रादेशिक व्यासपीठ आहे जे आशिया-पॅसिफिक प्रदेशात 3R (Reduce, Reuse, Recycle) तत्त्वे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था पद्धतींना प्रोत्साहन देते.
• हे कचरा व्यवस्थापन आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर भर देते.
आशिया-पॅसिफिकमधील 12वा प्रादेशिक 3R आणि सर्कुलर इकोनॉमी फोरम कोठे आयोजित करण्यात आला होता ?
• आशिया आणि पॅसिफिकमधील 12 व्या प्रादेशिक 3R आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंच 3 मार्च ते 5 मार्च 2025 रोजी राजस्थान राज्यातील जयपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
• या मंचात 24 आशिया-पॅसिफिक सदस्य देशांचा प्रत्यक्ष सहभाग होता, ज्यात जपान, सोलोमन बेटे, तुवालू आणि मालदीवचे मंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते.
• सरकारी अधिकारी, तज्ञ आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींसह जवळजवळ 200 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले.

चक्रीय अर्थव्यवस्था (वर्तुळाकार अर्थव्यवस्था) म्हणजे काय ?
What is the Circular Economy ?
• चक्रीय अर्थव्यवस्था (Circular Economy) म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा (Resources) अधिकाधिक वापर करणे, कचरा कमी करणे आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या संसाधनांना पुन्हा-पुन्हा वापरण्यावर भर देणारी एक प्रणाली (System) आहे.

3R म्हणजे नेमकं काय ?
• 3R हे Reduce, Reuse, Recycle यासाठी वापरले जाते.
• कचरा व्यवस्थापनाचे 3R तत्व म्हणजे कमी करा (Reduce), पुनर्वापर करा (Reuse) आणि पुनर्चक्रीकरण करा (Recycle).
• हे तीनही घटक कचरा व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मदत करतात.
कमी करा (Reduce) :
• कचरा निर्माण होण्यापासून रोखणे म्हणजे कमी करणे.
• उदा. प्लास्टिकचा वापर कमी करणे, जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करणे टाळणे, इत्यादी.
पुनर्वापर करा (Reuse) :
• कचऱ्याला नवीन स्वरूपात वापरणे म्हणजे पुनर्वापर करणे.
• उदा. प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा वापरणे, कपड्यांना नविन रूप देणे, इत्यादी.
पुनर्चक्रीकरण करा (Recycle) :
• कचऱ्यापासून नवीन उत्पादने तयार करणे म्हणजे पुनर्चक्रीकरण करणे.
• उदा. प्लास्टिक किंवा कंपनीतील लोखंडाचा बारीक कचरा, वितळवून पुन्हा वापरणे.
