
चालू घडामोडी 04, मार्च 2025 | ऑस्कर पुरस्कार 2025 | Oscar 2025

ऑस्कर पुरस्कार 2025
Oscar 2025
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला ?
1. इनसाइड आऊट
2. अनोरा
3. द सबस्टान्स
4. निकेल बॉईज
उत्तर : अनोरा (Anora)
97 वे ऑस्कर पुरस्कार संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• सेक्स वर्करच्या कथेवर आधारित 'अनोरा' हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
• अनोरा चित्रपटाला 5 श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.
• पॉल टाझवेल हे सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइन श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार प्राप्त करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले आहेत.
97 वे ऑस्कर पुरस्कार 2025 विजेत्यांची यादी :
(97th Academy Awards)
• सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture / Best Film) : अनोरा
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : शॉन बेकर (अनोरा)
• सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट : आय एम स्टिल हिअर (ब्राझील)
• सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म : फ्लो
• सर्वोत्कृष्ट माहितीपट : नो अदर लँड
• सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म : आय ॲम नॉट अ रोबोट
• सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट फिल्म : द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
अभिनय श्रेणी :
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिकी मॅडिसन (अनोरा)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अॅड्रियन ब्रॉडी (द ब्रुटलिस्ट)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: झोई सल्डाना (एमिलिया पेरेझ)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : किरन कल्किन (अ रिअल पेन)
ऑस्कर पुरस्काराची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• अकादमी पुरस्कारास ऑस्कर पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते.
• अकादमी पुरस्काराची स्थापना 1929 मध्ये करण्यात आली.
• ऑस्कर पुरस्कार संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स ( AMPAS ) कडून दरवर्षी देण्यात येतो.
ऑस्कर पुरस्कार कोणाला देण्यात येतो ?
• आंतरराष्ट्रीय फिल्म उद्योगात कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ऑस्कर पुरस्कार देण्यात येतो.
ऑस्कर विजेते भारतीय :
आतापर्यंत ( 2025 पर्यंत ) भारताला 7 ऑस्कर पुरस्कार मिळालेली आहेत.
ऑस्कर विजेते भारतीयांची यादी पुढीलप्रमाणे :
1. भानू अथैय्या ( 1983) - भानू अथैय्या यांना 1983 साली सर्वोत्कृष्ट कॅास्च्यूम डिझाईन साठी ऑस्कर पुरस्कार भेटला.
2. सत्यजीत रे (1992 ) - सत्यजीत रे यांना चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल 1992 ची ॲानरेरी ऑस्कर पुरस्कार भेटला.
3. रेसुल पुक्कुट्टी ( 2009 ) - रेसुल पुक्कुट्टी यांना सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग 2009 चा ऑस्कर पुरस्कार भेटला.
4. गुलजार ( 2009 ) - गुलजार यांना सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग 2009 चा ऑस्कर पुरस्कार भेटला.
5. ए. आर. रेहमान ( 2009 ) - ए. आर. रेहमान यांना सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर आणि सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग 2009 चा ऑस्कर पुरस्कार जय हो या गाण्यासाठी भेटला.
6. कार्तिकी गोन्साल्विस ( 2023 ) - कार्तिकी गोन्साल्विस बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म 2023 चा ऑस्कर पुरस्कार भेटला.हा पुरस्कार त्यांना द एलिफंट विस्परर्स या लघुपटासाठी भेटला.
7. एम. एम. कीरवानी आणि चंद्रबोस ( 2023 ) - एम. एम. कीरवानी आणि चंद्रबोस सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग 2023 चा ऑस्कर पुरस्कार भेटला. त्यांना हा पुरस्कार RRR फिल्म मधील नाटू- नाटू या गाण्यासाठी भेटला. एम. एम. कीरवानी हे नाटू- नाटू या गाण्याचे संगीतकार आहे तर नाटू- नाटू या गाण्याचे गीतकार चंद्रबोस हे आहेत.