
चालू घडामोडी 08, ऑगस्ट 2024

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य :
Bhimashankar Wildlife Sanctuary
बातम्यांमध्ये : पावसामुळे अपघाताचा धोका टाळण्यासाठी वन्यजीव अभयारण्य पर्यटनासाठी 30 सप्टेंबर पर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्याचे वनपरीक्षक अधिकाऱ्यांनी दिली.
भSubject : GS- पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. मुंबई
2. पुणे
3. नाशिक
4. रत्नागिरी
उत्तर : पुणे

अभयारण्य म्हणजे काय ?
• जैविक जातींसाठी राखीव असणाऱ्या क्षेत्रास अभयारण्य म्हणतात.
• उदाहरणार्थ : पक्षी, वाघ , सिंह इत्यादींसाठी अभयारण्य राखीव असतात.
ीभीमाशंकर वन्यजीव अभयारण्य महत्वाची माहिती :
• भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे
• भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य पुणे, ठाणे आणि रायगड जिल्हय़ात पसरलेले आहे.
• भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात आहे.
• भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे 3000 फूट उंच कडय़ांनी दोन भागांत विभागले गेले आहे.
• भीमाशंकर अभयारण्य क्रमांक 1 : मध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो.
• भीमाशंकर अभयारण्य क्रमांक 2 : मध्ये ठाणे आणि रायगड जिल्हय़ातील जंगलाचा समावेश आहे.
• अतिशय दुर्मिळ असणाऱ्या शेकरू या प्राण्याच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे.
• शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे त्याला भारतीय महाकाय गिलहरी (उडती खार) म्हणून ही आोळखतात. तिचे शास्त्रीय नाव रातुफा इंडिका (Ratufa Indica) असे आहे.
• भीमाशंकर अभयारण्य हे पानझडी वनांच्या प्रकारात मोडते.
• भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी असणारे भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरून या अभयारण्याला हे नाव देण्यात आले आहे.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काय आहे ?
बातम्यांमध्ये : केंद्र सरकारने अलीकडेच प्रथम राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 मधील विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर केली.
Subject : GS- पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार खालील पैकी कोणास देण्यात येणार आहे ?
1. विवेक पोलशेट्टीवार
2. गोविंदराजन पद्मनाभन
3. जयंत भालचंद्र उदगांवकर
4. यांपैकी नाही
उत्तर : गोविंदराजन पद्मनाभन

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार
• राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा पुरस्कारांचा एक प्रतिष्ठित गट आहे जो भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवोदितांच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल देण्यात येणार आहे.
• हा पुरस्कार भारतीय वंशाच्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. ते भारतात किंवा परदेशात काम करत असले तरी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
• 2024 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देण्यात येणार आहे.
• 23 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या दिवशी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार खालील 13 विद्याशाखांसाठी दिला जाणार आहे, त्या पुढीलप्रमाणे :
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, वसुंधरा विज्ञान, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, अणु ऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि अन्य.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 4 श्रेणीमध्ये प्रदान केले जाणार आहेत:
1. विज्ञान रत्न : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आजीवन कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त 3 विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान केले जातील.
2. विज्ञान श्री : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानासाठी दरवर्षी जास्तीत जास्त २५ विज्ञान श्री पुरस्कार दिले जातील.
3. विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या ४५ वर्षांखालील तरुण शास्त्रज्ञांच्या प्रतिभेला ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त २५ विज्ञान युवा: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिले जातील.
4. विज्ञान संघ पुरस्कार : 3 किंवा अधिक वैज्ञानिक/संशोधक/नवीनसंशोधकांचा समावेश असलेल्या संघाला दरवर्षी जास्तीत जास्त 3 पुरस्कार दिले जातील ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असामान्य सांघिक योगदान दिले आहे.
काही महत्त्वाचे वनलाईनर पॉईंट्स
• विज्ञान रत्न पुरस्कार विजेता : गोविंदराजन पद्मनाभन यांना दिला जाणार आहे.
जीवशास्त्रातील त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी, विशेषतः मलेरियाच्या परजीवींवर केलेल्या कामासाठी त्यांनानओळखले जाते. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
• विज्ञान संघ पुरस्कार विजेता : 2023 मध्ये चंद्रावर भारताचे पहिले अंतराळ यान यशस्वीरीत्या उतरवल्याबद्दल चांद्रयान-3 टीमला विज्ञान संघाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय अंतराळ दिन केव्हा असतो ?
1. 10 जुलै
2. 15 जून
3. 23 ऑगस्ट
4. 12 सप्टेंबर
उत्तर : 23 ऑगस्ट
• 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं.
• 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला.
• या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस "राष्ट्रीय अंतराळ दिवस" म्हणून घोषित केला.
भारत छोडो आंदोलन दिवस : 8 ऑगस्ट
Quit India Movement Day : 8 August
Subject : GS- भारताचा इतिहास - भारत छोडो आंदोलन
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
(महाराष्ट्र पोलीस भरती कोल्हापूर बँड्समन 2021)
1. 1940
2. 1942
3. 1944
4. 1946
उत्तर : 1942

भारत छोडो आंदोलन
• काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या वर्धा येथील बैठकीत महात्मा गांधींनी भारत छोडोचा ठराव मांडला.
• 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींजींनी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. म्हणून 8 ऑगस्ट हा दिवस भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून ओळखला जातो.
• 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या 'गोवालिया टँक' येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन भरले.
• या अधिवेशनातील आपल्या भाषणात महात्मा गांधींनी भारतीयांना 'करेंगे या मरेंगे' असा मंत्र दिला
• भारत छोडो आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा इशारा देण्यात आला होता.
राष्ट्रीय तटीय अभियान योजना
National Coastal Mission Scheme
बातम्यांमध्ये : नुकतीच पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्र्यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय तटीय अभियान योजनेची माहिती दिली.
Subject : GS- पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय तटीय अभियान योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
1. 2012
2. 2014
3. 2018
4. 2024
उत्तर : 2014

राष्ट्रीय तटीय अभियान योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
• ही योजना 2014 मध्ये लाँच करण्यात आली होती.
• राष्ट्रीय तटीय व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय तटीय अभियान योजना राबवण्यात येत आहे.
• हवामान बदलाचा किनारी आणि सागरी परिसंस्था, पायाभूत सुविधा आणि किनारी भागातील समुदायांवर होणाऱ्या परिणामांवर उपाय योजना करणे आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांसाठी तयारी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
ममंत्रालय : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय
राष्ट्रीय तटीय व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत खालील घटकांसह राष्ट्रीय तटीय अभियान योजना राबवण्यात येत आहे:
• खारफुटी वने आणि प्रवाळ खडकांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती योजना
• सागरी तसेच किनारपट्टीवरील परिसंस्थेचे संशोधन आणि विकास
• तटीय /किनारी पर्यावरण आणि सौंदर्यीकरण व्यवस्थापन सेवेअंतर्गत समुद्र किनाऱ्यांचा शाश्वत विकास