
चालू घडामोडी 07, ऑगस्ट 2024

राष्ट्रीय हातमाग दिवस 2024
National Handloom day 2024
Subject : GS- दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय हातमाग दिवसाबद्दल योग्य पर्याय निवडा.
1. राष्ट्रीय हातमाग दिवस दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरी करतात.
2. पहिला राष्ट्रीय हातमाग दिवस 2010 साली साजरा करण्यात आला.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : राष्ट्रीय हातमाग दिवस दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरी करतात. हे उत्तर बरोबर आहे.
पहिला राष्ट्रीय हातमाग दिवस 2015 साली साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय हातमाग दिना बद्दल महत्त्वाची माहिती :
• 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला गेला.
• पहिला राष्ट्रीय हातमाग दिवस 2015 साली साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय हातमाग दिन का साजरी करतात ?
• हातमाग क्षेत्राचे महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक विकासातले त्याचे योगदान याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.
• हा दिवस देशातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि देशाच्या सांस्कृतिक, पारंपारिक आणि आर्थिक घटकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा आहे.
• भारतातील हातमाग क्षेत्र हे सर्वात मोठ्या असंघटित आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे.
• कृषी क्षेत्रानंतर हातमाग क्षेत्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे.
• 2019-20 च्या हातमाग क्षेत्रातील जनगणनेनुसार, हातमाग उद्योगात अंदाजे 35.22 लाख कामगार कार्यरत आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.
• हे क्षेत्र ग्रामीण विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
• भारताच्या GDP आणि निर्यात कमाईमध्ये हातमाग क्षेत्राचे योगदान उल्लेखनीय आहे.
• 2023-24 आर्थिक वर्षात, हातमाग उत्पादनांनी निर्यात कमाईमध्ये (Export Income) $1802.36 दशलक्ष योगदान दिले.
राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्टलाच का साजरी करतात ?
• राष्ट्रीय हातमाग दिवसाचा इतिहास 1905 च्या स्वदेशी चळवळीतील आहे.
• 19 जुलै 1905 रोजी लॅार्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.
• याला विरोध म्हणून 7 ऑगस्ट 1905 ला स्वदेशी व बहिष्काराची चळवळ सुरू करण्यात आली.
• बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून करण्यात आलेल्या या चळवळीला वंगभंग चळवळ किंवा स्वदेशी चळवळ असेही म्हणतात.
• 7 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे सुरू झालेल्या या चळवळीत स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि ब्रिटिश वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
• स्वावलंबन आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या हातमाग कापडाने या चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली म्हणून राष्ट्रीय हातमाग दिनासाठी 7 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली.
राष्ट्रीय भालाफेक दिन 2024
National Javelin day 2024
Subject : GS- दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय ॲथलेटिक्स महासंघाकडून राष्ट्रीय भालाफेक दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 12 जुलै
2. 2 ऑगस्ट
3. 7 ऑगस्ट
4. 10 सप्टेंबर
उत्तर : 7 ऑगस्ट
राष्ट्रीय भालाफेक दिन
• नीरज चोप्रा यांनी ७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ओलंपिक मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते.
• नीरज चोप्राचे हे सुवर्णपदक भारतीय ऑलिंपिक इतिहासातील ॲथलेटिक्स या प्रकारातील पहिले सुवर्णपदक आहे.
• या कामगिरीचे महत्त्व लक्षात घेऊन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
• जागतिक स्तरावर भारताला अभूतपूर्व वैभव मिळवून देणारा खेळ साजरा करण्याचा हा दिवस शिस्त, निष्पक्ष खेळ आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा या मूलभूत मूल्यांना प्रोत्साहन देतो.
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया(AFI) बद्दल थोडक्यात माहिती :
• ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतातील ॲथलेटिक्स चालवणारी आणि व्यवस्थापित करणारी सर्वोच्च संस्था आहे.
• स्थापना : ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1946 मध्ये करण्यात आली.
• अध्यक्ष : आदिल सुमारीवाला हे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहे.
पॅरिस ओलंपिक 2024 :
• नीरज चोप्रा यांनी पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये रौप्य पदक (Silver medal) पटकाविले.
• नीरज चोप्रा यांनी 89.45 मीटर भाला फेकला.
• पॅरिस ओलंपिक 2024 पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक (Silver medal) पाकिस्तानच्या अर्शद नदिम याने पटकावले
• याने 92.97 मीटर भाला फेकून नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी
Companion of the Order of Fiji
Subject : GS- पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच फिजी सरकारने खालीलपैकी कोणाला "कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" हा त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले ?
1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2. उपराष्ट्रपती जगदीप धनकड
3. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
4. यांपैकी नाही
उत्तर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
• अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
• राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या फिजीच्या दौऱ्यावर आहे.
• हा पुरस्कार भारत-फिजीच्या मजबूत संबंधांना अधोरेखित करतो.
फिजी देशाबद्दल थोडक्यात माहिती :
• फिजी हा प्रशांत महासागरातील बेटांचा समूह असणारा देश आहे.
• यात 300 पेक्षा जास्त बेटांचा समूह आहे.
• राजधानी : सुवा ही फिजी ची राजधानी आहे.
• फिजी ही संसदीय लोकशाही आहे.
• फिजी देश स्थानिक फिजी, भारतीय, युरोपियन आणि इतर जातींचे लोक असा मिश्र लोकसंख्या असलेला देश आहे.
• दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठे हिंदू मंदिर, श्री शिव सुब्रमण्यम स्वामी मंदिर फिजीमध्ये आहे.
अस्त्र मिसाईल
Astra Missile
बातम्यांमध्ये : भारतीय वायुसेनेने DRDO आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) ला त्यांच्या सुखोई-3O आणि LCA तेजस या लढाऊ विमानांसाठी 200 अस्त्र क्षेपणास्त्रे तयार करण्यास मंजुरी दिली आहे.
Subject : GS- संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारे अस्त्र क्षेपणास्त्र हे -------- मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
1. पाण्यातून हवेत मारा करणारे
2. जमिनीवरून हवेत मारा करणारे
3. हवेतून हवेत मारा करणारे
4. यांपैकी नाही
उत्तर : हवेतून हवेत मारा करणारे
• अस्त्र मिसाईल हे स्वदेशी बनावटीचे हवेतून हवेत मारा करणारे मिसाईल आहे.
• अस्त्र मिसाईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले आणि भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेले आहे.
• अस्त्र मिसाईल हवाई हल्ल्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी तयार केले आहे.
• हे एक उच्चतम कुशलता आणि सुपरसॉनिक वेग असणारे मिसाईल आहे.
• अस्त्र मिसाईल MK -I हे 3.6 मीटर लांब, 178 मिमि. व्यास आणि 154 किलो वजनाचे मिसाईल आहे.