
चालू घडामोडी 10, ऑक्टोबर 2024

जागतिक टपाल दिन
World Post Day
बातम्यांमध्ये : जागतिक टपाल दिनानिमित्त, भारत सरकारच्या टपाल विभागाने युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकिटांच्या विशेष संचाचे अनावरण केले.
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक टपाल दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 5 सप्टेंबर
2. 9 ऑक्टोबर
3. 14 ॲागस्ट
4. 10 जुलै
उत्तर : 9 ऑक्टोबर

जागतिक टपाल दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन (World Post Day) साजरी करण्यात येतो.
जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबरलाच का साजरी करतात ?
• 9 ऑक्टोबर 1874 मध्ये स्वित्झर्लंड ची राजधानी बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना करण्यात आली.
• युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिवस (World Post Day) साजरा केला जातो.
युनिव्हर्सल पोस्टल युनियन (Universal Postal Union) बद्दल महत्त्वाची माहिती :
• स्थापना : 9 ऑक्टोबर 1874 मध्ये स्वित्झर्लंड ची राजधानी बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना करण्यात आली.
• ही संयुक्त राष्ट्रांची (United Nations) विशेष एजन्सी आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी टपाल क्षेत्राचा प्राथमिक मंच आहे.
• युनिव्हर्सल पोस्टल युनियन हे आधुनिक टपाल सहकार्याचा एक आधारस्तंभ आहे.
• सदस्य देश : युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये सध्या 192 सदस्य देश आहेत.
• भारत हा या युनियनचा सर्वात जुना आणि सक्रिय सदस्यांपैकी एक आहे.
• मुख्यालय (Headquarters) : स्वित्झर्लंड ची राजधानी बर्न (Bern) येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे मुख्यालय आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियन काय काम (कार्ये) करते ?
• हे युनियन जगभरातील सदस्य राष्ट्रांमधील पोस्टल धोरणांचे समन्वय साधते.
• हे युनियन आंतरराष्ट्रीय मेल एक्सचेंजसाठी नियम तयार करते आणि मेल, पार्सल आणि वित्तीय सेवांमध्ये वाढ होण्यासाठी आणि ग्राहकांसाठी सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिफारसी करते.
• हे युनियन सल्लागार, मध्यस्थी आणि संपर्काची भूमिका पार पाडते आणि जिथे आवश्यक आहे तिथे तांत्रिक सहाय्य पुरवते.
भारताने उभारली आशियातील सर्वात मोठी दुर्बीण
Major Atmospheric Cherenkov Experiment Observatory
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताने आशियातील सर्वात मोठी दुर्बीण खालील पैकी कोणत्या ठिकाणी उभारली आहे.
1. चेन्नई
2. महाराष्ट्र
3. हिमाचल प्रदेश
4. लडाख
उत्तर : लडाख
बातम्यांमध्ये : अलिकडेच अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष यांनी लडाख मधील हान्ले येथे प्रमुख वातावरणीय चेरेन्कोव्ह एक्सपिरीमेंट वेधशाळेचे (Major Atmospheric Cherenkov Experiment Observatory) उद्घाटन केले.

प्रमुख वातावरणीय चेरेन्कोव्ह एक्सपिरीमेंट वेधशाळा बद्दल महत्त्वाची माहिती :
Key facts of Major Atmospheric Cherenkov Experiment (MACE) Observatory :
• ही आशियातील सर्वात मोठी इमेजिंग चेरेन्कोव्ह दुर्बीण (Telescope) आहे.
• स्थान : ही दुर्बीण लडाख मधील हानले या ठिकाणी 4,300 मीटर उंचीवर आहे. ही जगातील सर्वात उंचावर असणारी दुर्बीण आहे.
• ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.
• ही भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन (ECIL), हैदराबाद आणि इतर भारतीय उद्योग भागीदारांच्या समर्थनासह भाभा अणु संशोधन केंद्र (BARC - Bhabha Atomic Research Center) ने बनवलेली आहे.
MACE प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे ?
आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, अंतराळ संशोधनात भारताचे योगदान वाढवणे आणि जागतिक वैज्ञानिक समुदायात भारताचे स्थान मजबूत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
MACE दुर्बिण नक्की काय करणार आहे ?
• कॉस्मिक-रे म्हणजेच अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणाऱ्या शक्तीशाली किरणांचे संशोधन करेल.
• ही दुर्बिण उच्च-ऊर्जा गॅमा किरणांचे निरीक्षण करेल,ज्यामुळे सुपरनोव्हा, कृष्ण विवर आणि गॅमा-रे स्फोटांसारख्या विश्वातील सर्वात ऊर्जावान घटना समजून घेण्याच्या जागतिक प्रयत्नांना हातभार लागेल.
• यामुळे जागतिक वेधशाळांनाही त्याचा लाभ होईल आणि मल्टी मेसेंजर खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे स्थान मजबूत होईल.
प्रकल्पाचे इतर फायदे काय आहेत ?
• लडाख येथील या प्रकल्पामुळे लडाखच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही मदत होईल.
• हा प्रकल्प भारतीय खगोलशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देईल.
• विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रात करिअर करण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल.