
चालू घडामोडी 07, ऑक्टोबर 2024

राणी दुर्गावती
Who was Rani Durgavati ?
बातम्यांमध्ये : राणी दुर्गावती यांचे स्मारक आणि उद्यान विकसित करण्यासाठी मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने अलीकडेच एक पॅनेल तयार करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी अंदाजे 100 कोटी रुपयांचे बजेट असणार आहे.
Subject : GS - इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राणी दुर्गावतीने मध्य प्रदेशातील कोणत्या प्रदेशावर राज्य केले ?
1. गोंडवाना
2. महाकौसल
3. विंध्य प्रदेश
4. ग्वाल्हेर
उत्तर : गोंडवाना

राणी दुर्गावती कोण होत्या ?
• राणी दुर्गावती सोळाव्या शतकातील गोंडवाना (गडामंडला) साम्राज्याच्या कर्तृत्ववान व पराक्रमी राणी होत्या.
• त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ रोजी चंदेलवंशीय महोबा येथील राजपूत घराण्यात झाला.
विवाह :
• राणी दुर्गावती यांचा राजा दलपत शाह याच्याशी विवाह झाला.
• ती चंदेला राजपूत कुटुंबातील सदस्य होती आणि तिने गोंडवानाचा राजा संग्राम शाह यांचा मुलगा राजा दलपत शाह याच्याशी विवाह केला, या विवाहाने महोबाच्या चंदेलांना आणि गढ-मंडलाच्या राजगोंडांना एकत्र केले आणि त्यांचे राज्य अधिक मजबूत केले.
राणी दुर्गावती शासक बनल्या :
• 1550 मध्ये जेव्हा राजा दलपत शाह मरण पावले तेव्हा मुलगा वीर नारायण यास गादीवर बसवून राणी दुर्गावतीने राज्याचा कारभार हाती घेतला.
• राणी दुर्गावतीने गोंडवानामध्ये शांतता, व्यापार आणि सद्भावना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले.
• राज्याच्या संरक्षणात सुधारणा करण्यासाठी त्यांनी सिंगोरगड किल्ल्यावरून राजधानी सातपुडा पर्वतरांगेतील चौरागड किल्ल्याकडे हलवली.
मुघलांशी संघर्ष :
• 1562 मध्ये, , मुघल सम्राट अकबरने माळव्याचा शासक बाज बहादूरचा पराभव केल्यानंतर, गोंडवानाच्या दिशेने चाल केली.
• मुघल सेनापती ख्वाजा अब्दुल मजीद असफ खान यांना राणी दुर्गावतीचे राज्य जिंकायचे होते.
• जेव्हा राणी दुर्गावतीला आक्रमणाची माहिती मिळाली तेव्हा सल्लागारांनी त्यांना मुघलांच्या सामर्थ्याबद्दल सावध केले, परंतु शरण जाण्यापेक्षा राणी दुर्गावतीने मुघलांशी लढणे पसंत केले.
• राणी दुर्गावतींनी मुघलांशी निकराने लढा दिला परंतु बलाढ्य मुघलांच्या सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
• राणी दुर्गावतींनी शत्रूच्या हातून मृत्यू न पत्करता पोटात खंजीर खुपसून वीरांगनेचे मरण पत्करले.
• 24 जून 1564 रोजी त्यांचा मृत्यू दिवस "बलिदान दिवस" म्हणून स्मरण केला जातो.
राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ :
• 1983 मध्ये, मध्य प्रदेशने जबलपूर विद्यापीठाचे नाव बदलून त्यांच्या सन्मानार्थ राणी दुर्गावती विद्यापीठ असे केले.
• 1988 मध्ये, भारत सरकारने राणी दुर्गावती यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले.
• 2018 मध्ये, भारतीय तटरक्षक दलाने भारतीय तटरक्षक जहाज (ICGS) राणी दुर्गावती, जहाज लाँच केले.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
Who is the President of 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ?
Subject : GS - साहित्य संमेलन
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?
1. रवींद्र शोभणे
2. जयंत नारळीकर
3. भारत सासणे
4. तारा भवाळकर
उत्तर : तारा भवाळकर
• आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे.
• पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे संमेलन होणार आहे.
• ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
• तारा भवाळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्याचा अभ्यास, लेखन, संशोधन आणि चिंतन यामध्ये व्यतीत केलं असून त्यांनी 36 पेक्षा जास्त पुस्तकं लिहीली आहेत.
• लेखनकार्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे.
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आणि केव्हा पार पडले ? त्याचा हेतू काय होता ?
• ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्या सहकार्याने 11 मे 1878 रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले.
• याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते.
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
• पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते.
97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले ? त्याचे अध्यक्ष कोण होते ?
• 4 फेब्रुवारी 2024 जळगावच्या अमळनेरमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक रवींद्र शोभणे हे होते.
अहमदनगरच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजूरी
बातम्यांमध्ये : अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल ट्विट करून ही माहिती दिली.
Subject : GS - इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल खालील विधानांवर विचार करा
1) यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला.
2) 1867 मध्ये त्या इंदोरच्या शासक बनल्या.
3) त्यांना द फिलॉसॉफर क्वीन असे म्हटले जाते.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे ?
1. फक्त एक
2. फक्त दोन फक्त
3. एक आणि तीन
4. वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व

अहमदनगरला अहमदनगर हे नाव कसे पडले ?
• 1486 मध्ये मलिक अहमद निजाम शाह हा बहमनी साम्राज्यात सुबेदार झाला.
• कालांतराने त्याने बहमनी साम्राज्याविरोधी त्याने बंड केले.
• बहमनी सैन्य आणि मलिक अहमद निजाम शाह यांमध्ये युद्ध झाले.
• मलिक अहमद याने 1490 मध्ये जनरल जहांगीर खानच्या नेतृत्वाखालील बहमनी सैन्याचा पराभव केला.
• मलिक अहमद यांनी जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले.
• 1494 मध्ये त्याने सीना नदीच्या तीरावर, शहराचा पाया घातला आणि त्याला स्वतःचे नाव दिले- अहमदनगर.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांबद्दल माहिती :
जन्म : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील, जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.
विवाह :
• सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव मल्हाराव होळकरांशी अहिल्यादेवी यांचा विवाह १७३३ मध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी झाला.
• मल्हारराव होळकर हे मावळ प्रांताचे जहागीरदार होते.
• 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर धारातीर्थी पडले.
• पतीच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यास निघाली परंतु सासरे मल्हारराव होळकर आणि त्यांना सती जाऊ दिले नाही.
• 11 डिसेंबर 1767 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मावळाच्या सिंहासनावर बसल्या.
सामाजिक आणि राजकीय कारकीर्द :
1767 ते 1795 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मावळाचा राज्यभार सांभाळला.,त्यांनी अनेक सुधारणाही केल्या त्या पुढील प्रमाणे -
पायाभूत सुविधांचा विकास :
• प्रजेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंदिरे, घाट, विहिरी, रस्ते यांचे बांधकाम व नूतनीकरण करण्यात आले.
• लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिक धोरण राबविण्यात आले.
सामाजिक विकास :
• विधवा, अनाथ, सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना त्यांनी आधार दिला.
न्यायिक सुधारणा :
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायाधनासाठी प्रसिद्ध होत्या.
• न्यायला प्राधान्य देणारी आणि व्यक्ती हक्कांचे संरक्षण करणारी निष्पक्ष न्यायव्यवस्था त्यांनी स्थापन केली.
मंदिरांचे जीर्णोद्धार व कला आणि संस्कृतीचे संरक्षण :
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केला.
• त्यांनी अनेक तीर्थस्थानी धर्मशाळांचे बांधकाम केले.
• त्यांनी महेश्वर, इंदौर अशा गावांचा विकास करून कला आणि संस्कृतीचे संरक्षण केले.
मृत्यू :
13 ऑगस्ट 1795 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी इंदोर (मध्य प्रदेश) येथे त्यांचे निधन झाले.
पदव्या :
• ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना द फिलॉसॉफर क्वीन असे म्हटले आहे.
• इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या कॅथिन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट असे म्हटले आहे.
(कॅथिन द ग्रेट - रशियाची राणी
एलिझाबेथ- इंग्लंडची राणी
मार्गारेट - डेन्मार्कची राणी)
