
चालू घडामोडी 01, ऑक्टोबर 2024

दादासाहेब फाळके पुरस्कार
Dada Saheb Phalke Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केलेला ५४ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने खालील पैकी कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?
1. अमिताभ बच्चन
2. मिथुन चक्रवर्ती
3. अशोक सराफ
4. रजनिकांत
उत्तर : मिथुन चक्रवर्ती

• अलीकडेच, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केले आहे की 2022 चा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार मिथुन चक्रवर्ती यांना दिला जाईल.
• मिथुन चक्रवर्ती यांना ५४ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल महत्त्वाची माहिती :
• दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे .
• माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तो सादर केला जातो .
• भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढ आणि विकासासाठी केलेल्या महान आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?
• भारत सरकारने 1969 साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप कसे आहे ?
पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक , एक शाल, 10 लाख रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाण पत्र दिले जाते.
दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येतो ?
भारताचे राष्ट्रपती
पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
• अभिनेत्री देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार 1969 मध्ये देण्यात आला.
• देविका राणी यांना "भारतीय सिनेमाची फर्स्ट लेडी" म्हणून आोळखले जाते.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
• दादासाहेब फाळके यांना "भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक" ( (Father of Indian Cinema) म्हणून ओळखले जाते.
• दादासाहेब फाळके यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट बनवला.
इथेनॉल
Ethanol
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
1. भारत इथेनॉल उत्पादनात आणि वापरात जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला.
2. इथेनॉल हे जैविक इंधन आहे.
3. इथेनॉल मिश्रणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल.
4. सर्व पर्याय योग्य आहेत.
उत्तर : सर्व पर्याय योग्य आहेत.
बातम्यांमध्ये : अलीकडेच, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री म्हणाले की भारत इथेनॉल उत्पादनात आणि वापरात जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

इथेनॉल बद्दल महत्त्वाची माहिती :
• इथेनॉल हे जैविक इंधन आहे.
• हे एक कृषी उप-उत्पादन आहे जे प्रामुख्याने उसापासून साखर बनवण्याच्या प्रक्रियेतून मिळवले जाते.
• भारतात फक्त मळी (मोलॅसिस) पासून इथेनॉल उत्पादनास शासनाची मान्यता आहे.
• इथेनॉल तांदूळ किंवा मका यासारख्या इतर स्त्रोतांकडून देखील मिळते.
• वनस्पतींपासून म्हणजेच सूर्याच्या प्रकाशाचा पासून इथेनॉल तयार होत असल्याने ते अक्षय इंधन म्हणूनही ओळखले जाते.
• इथेनॉल हे वैशिष्ट्यपूर्ण आनंददायी गंध आणि जळजळीत चव असलेले स्पष्ट, रंगहीन द्रव आहे.
• ते अत्यंत ज्वलनशील आहे.
• इथेनॉलचा वापर इतर रासायनिक पदार्थ विरघळण्यासाठी केला जातो आणि ते पाणी आणि अनेक सेंद्रिय द्रवांमध्ये सहज मिसळते .
इथेनॉल मिश्रण म्हणजे काय ?
• इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याचा वापर इंधन म्हणून केला जातो.
• वाहने चालवताना कमी जीवाश्म इंधन जाळण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करणे याला इथेनॉल मिश्रण म्हणतात.
• इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असल्याने, ते इंधनाचे संपूर्ण ज्वलन करण्यास मदत करते. परिणामी हवेचे प्रदूषण कमी होईल.
• सध्या, पेट्रोल मध्ये 10% इथेनॉल मिश्रण आहे.
• 2025 पर्यंत हे प्रमाण 20% पर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
इथेनॉल मिश्रणाचे फायदे काय ?
• तेल (Oil) आयात कमी होईल
• शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी
• हवेचे प्रदूषण कमी होईल.
• CO2 उत्सर्जन कमी करा.
महाकालेश्वर मंदिर
Mahakaleshwar Temple
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाकालेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?
1. गोदावरी
2. गंगा
3. यमुना
4. शिप्रा
उत्तर : शिप्रा नदी

महाकालेश्वर मंदिराबद्दल थोडक्यात माहिती :
• हे भगवान शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे.
• स्थान : हे मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या प्राचीन शहरात आहे.
• हे मंदिर चंबळ नदीची उपनदी शिप्रा या पवित्र नदीच्या काठावर वसलेले आहे.
• हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
• हे भारतातील सात 'मोक्ष स्थळांपैकी' एक म्हणूनही ओळखले जाते.
• मंदिराचे एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे भस्म आरती, दररोज सकाळी केला जाणारा एक विधी ज्या दरम्यान लिंगाला पवित्र भस्मा मध्ये स्नान घातले जाते. हा विधी जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म या संकल्पनेचे प्रतीक आहे.
काझिंद संयुक्त लष्करी सराव
KAZIND JOINT MILITARY EXERCISE
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) काझिंद-2024 संयुक्त लष्करी सरावाबद्दल योग्य पर्याय निवडा.
1. हा भारत आणि कझाकस्तान या देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.
2. यंदाचा लष्करी सराव भारतात आयोजित करण्यात आला आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य

KAZIND संयुक्त लष्करी सरावाबद्दल थोडक्यात माहिती :
• भारत आणि कझाकस्तान या देशांच्या सेनांच्या काझिंद-2024 या 8 व्या संयुक्त लष्करी सराव उत्तराखंडमधील औली येथील सूर्य परदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली.
• दिनांक 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 या कालावधीत हा सराव होणार आहे.
• वर्ष 2016 पासून दर वर्षी दोन्ही देशांच्या लष्करांच्या सहकार्याने काझिंद (KAZIND) नामक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात येतो.
• लष्कराच्या कुमाऊ रेजिमेंट भारताचे प्रतिनिधित्व करेल.
• भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत लष्कराच्या कुमाऊ रेजिमेंटतर्फे इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यांसह भारतीय सशस्त्र दलांतील 120 जवानांसोबत भारतीय हवाई दलातील जवानांचा देखील समावेश आहे.
• कझाकस्तानच्या पथकाचे प्रतिनिधित्व मुख्यतः पायदळ आणि वायुदलाची पथके करतील.
काझिंद (KAZIND) संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश काय आहे ?
• संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत उप-पारंपारिक परिस्थितीत दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश आहे.
• या सरावादरम्यान निम-शहरी (Semi-Urban) आणि डोंगराळ प्रदेशांतील मोहिमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
• काझिंद-2024 या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्याला लढाऊ डावपेच, तंत्रे तसेच संयुक्त मोहिमा राबवणे शक्य होईल