
चालू घडामोडी 27, सप्टेंबर 2024

जागतिक पर्यटन दिन 2024
World Tourism Day 2024
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक पर्यटन दिनाबद्दल योग्य पर्याय निवडा.
1. दरवर्षी जागतिक पर्यटन दिन 5 जून रोजी साजरी करतात.
2. पर्यटन आणि शांतता ही या वर्षीची संकल्पना आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : पर्यटन आणि शांतता ही या वर्षीची संकल्पना आहे. म्हणून पर्याय 2 बरोबर आहे.
दरवर्षी जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरी करतात. म्हणून पर्याय 1 चूकीचा (अयोग्य) आहे.
नोट : 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असतो.

जागतिक पर्यटन दिनाबद्दल महत्त्वाची माहिती :
दरवर्षी जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरी करतात
जागतिक पर्यटन दिन सर्व प्रथम केव्हा साजरी करण्यात आला ?
संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटने (UNWTO) द्वारे 1980 मध्ये पहिल्यांदा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.
जागतिक पर्यटन दिन का साजरी करतात ?
• पर्यटन हे जगातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक क्षेत्र आहे. हे पृथ्वीवरील दर दहा लोकांपैकी एकाला रोजगार देते आणि आणखी लाखो लोकांना उपजीविकेचे साधन पुरवते.
• "इतरांना भेटणे", विविध संस्कृतींबद्दल शिकणे, परदेशी भाषा ऐकणे, विदेशी चव चाखणे, इतर मानवांशी संबंध आणि सहिष्णुता निर्माण करणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या घटना पर्यटनामुळे घडून येतात.
• देशा - देशांतील सलोखा आणि संस्कृतींमधील शांतता आणि समजूतदारपणा यांना पाठिंबा देण्यासाठी.
• संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी, खासकरून दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनासाठी, इको-टूरिझमचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना ( United Nations World Tourism Organization ) बद्दल थोडक्यात माहिती :
• संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संघटना आहे.
• ही संघटना जबाबदार , शाश्वत आणि सर्वत्र प्रवेश करण्यायोग्य पर्यटनाला प्रोत्साहन देते .
• मुख्यालय : UNWTO चे मुख्यालय माद्रिद (स्पेन) येथे आहे.
• UNWTO मध्ये 160 सदस्य देश आहेत, 6 सहयोगी सदस्य, 2 निरीक्षक आणि 500 हून अधिक संलग्न सदस्यांचा समावेश आहे.
• नोट : भारत संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचा सदस्य देश आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न वनलाईनर प्रश्न -उत्तरे
प्रश्न) जागतिक पर्यटन दिन 2024 चा यजमान देश कोणता ?
जॉर्जिया (Georgia)
प्रश्न) जागतिक पर्यटन दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
जागतिक पर्यटन दिन 2024, ची संकल्पना " पर्यटन आणि शांतता " (Tourism and Peace) ही आहे.
प्रश्न) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक (World Economic Forum's Travel and Tourism Development Index) 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत 39 व्या क्रमांकावर आहे.
पर्यटनाला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे :
• राष्ट्रीय पर्यटन धोरण, 2022
• देखो अपना देश कार्यक्रम
• स्वदेश दर्शन योजना
• एक भारत श्रेष्ठ भारत
• ई-व्हिसा सुविधा
• क्रूझ पर्यटन
• मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (महाराष्ट्र राज्य)
जीवितपुत्रिका उत्सव म्हणजे काय ?
What is the Jivitputrika Festival ?
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जीवितपुत्रिका उत्सव प्रामुख्याने खालील पैकी कोठे साजरा केला जातो ?
1. महाराष्ट्र
2. बिहार
3. गुजरात
4. तमिळनाडू
उत्तर : बिहार
बातम्यांमध्ये : नुकत्याच झालेल्या 'जीवितपुत्रिका' उत्सवादरम्यान बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या आणि तलावांमध्ये पवित्र स्नान करताना किमान 46 जण बुडाले यात 37 मुलांचाही समावेश आहे.

जीवितपुत्रिका उत्सव काय आहे ?
• जीवितपुत्रिका, किंवा जितिया व्रत, हा एक हिंदू सण आहे.
• आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी उपवास करणाऱ्या मातांनी हा उत्सव साजरा केला जातो.
• हा सण तीन दिवसांचा असतो, मुख्य विधीमध्ये कठोर ‘निर्जल’ उपवास असतो, म्हणजे उपवासात पाणी सुद्धा पिले जात नाही.
• पहिला दिवस - उत्सवाची सुरुवात न्हाई-खाईने होते, जिथे माता शुद्ध आंघोळ करतात आणि पौष्टिक जेवण खातात.
• दुसरा दिवस - कठोर उपवासाच्या विधीद्वारे साजरी केला जातो.
• तिसरा दिवस - तिसऱ्या दिवशी या सणाची सांगता पारणने होते, जिथे उपवास जेवणाने सोडला जातो.
जीवितपुत्रिका उत्सव कोठे साजरा केला जातो ?
हा सण प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड त्याचप्रमाणे नेपाळमध्येही साजरा केला जातो.
जीवितपुत्रिका उत्सवाची पौराणिक कथा काय आहे ?
• या सणाचे मूळ हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे, विशेषतः राजा जीमुतवाहनची कथा, ज्याने इतरांच्या कल्याणासाठी केलेल्या बलिदानाचे या वेळी स्मरण केले जाते.
• एके दिवशी जंगलात जिमुतवाहनाला एक वृद्ध स्त्री रडताना दिसली. जीमुतवाहनने त्या स्त्रीला तिच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की मी नागवंशाची स्त्री आहे आणि मला एकुलता एक मुलगा आहे.
• पक्ष्यांचा राजा गरुड याला दररोज खाण्यासाठी सापांना स्वाधीन करण्याचे वचन दिले आहे.
• आज रोजच्या त्यागाच्या क्रमाने माझ्या मुलाची शंखचूडची पाळी आहे.
• तेव्हा जीमुत वाहनाने त्या महिलेला सांगितले, घाबरू नकोस, मी तुझ्या मुलाचे रक्षण करीन. आज मी त्याच्या जागी बलिदान द्यायला जाईन. तेव्हा गरुडाने जीमुतवाहनाला विचारले, तू कोण आहेस ? जीमुतवाहनने त्यांना सर्व प्रकार सांगितला.
• जीमूत वाहनाच्या शौर्याने गरुड खूप प्रसन्न झाला आणि मग त्याने त्याला जीवदान दिले. तसेच भविष्यात सापांचा बळी न घेण्याचे वचनही दिले.
• यानंतर पुत्राच्या रक्षणासाठी जीमूतवाहनाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात.
Llama 3.2 काय आहे ?
What is Llama 3.2 ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच Llama 3.2 नावाचे नवीन मोफत आणि मुक्त-स्रोत लार्ज लँग्वेज मॉडेल कोणत्या कंपनीने लॉन्च केले ?
1. Apple
2. Meta
3. Microsoft
4. Telegram
उत्तर : Meta
Llama 3.2 काय आहे ?
• Meta ने Meta Connect 2024 दरम्यान त्याचे नवीन मोफत आणि मुक्त-स्रोत लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM), Llama 3.2 ची घोषणा केली आहे.
• मेटा चे CEO मार्क झुकरबर्गने स्पष्ट केले की लामा 3.2 चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मजकूर आणि प्रतिमा दोन्ही समजून घेण्याची क्षमता.
• ही "मल्टीमॉडल" क्षमता मॉडेलला व्हिज्युअल डेटावर आधारित अभिप्राय प्रदान करण्यास अनुमती देते.
• यात व्हॉईस इंटरॅक्शन फिचर आहे जे वापरकर्त्यांना व्हॉईस कमांडचा वापर करून AI सोबत संभाषण खेळण्यास मदत करते.
• उदाहरणार्थ: एखाद्या वापरकर्त्याने पक्ष्याचा फोटो अपलोड केल्यास, Llama 3.2 प्रतिमेचे (Image) विश्लेषण करू शकतो आणि प्रजाती ओळखू शकतो.
• मोठे मॅाडेल ईमेज पासून कॅपशन बनवू शकतात.
Llama 3.2 चा उपयोग कसा होऊ शकतो ?
• मॉडेल्स डेव्हलपरना अधिक प्रगत AI ॲप्लिकेशन्स तयार करण्यात मदत करतील जसे की व्हिडिओची रिअल-टाइम समज असलेले AR ॲप्स.
• जास्त डेटा, मजकूर याचा सारांश बनवून ईमेज तयार करणे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न वनलाईनर प्रश्न -उत्तरे
प्रश्न) मेटा (META) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे सीईओ कोण आहेत ?
उत्तर : मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg)
४५ वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारताची ऐतिहासिक विजय
45th Chess Olympiad
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ४५ वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेबद्दल अयोग्य विधान निवडा.
1. ही स्पर्धा भारतात पार पडली.
2. भारताने खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले.
3. या स्पर्धेत डी. गुकेशने संपूर्ण विश्वात सर्वोत्तम कामगिरी केली.
4. वरील सर्व विधाने योग्य आहे.
उत्तर : ही स्पर्धा भारतात पार पडली. हे अयोग्य विधान आहे.
योग्य विधान : 10 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत बुडापेस्ट , हंगेरी येथे ही स्पर्धा पार पडली.

४५ वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स :
• 10 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत बुडापेस्ट , हंगेरी येथे इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE) द्वारे आयोजित केलेला 45 वा बुद्धिबळ ऑलिम्पियाड हा आंतरराष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ स्पर्धा पार पडली.
• या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली.
• भारताने खुल्या (Open) आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले.
• 2018 नंतर प्रथमच एकाच देशाने दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले.
• एकाच देशाने दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकणारा भारत हा तिसरा देश बनला. या आधी माजी सोव्हिएत युनियन आणि चीनने असे केले होते.
• खुल्या स्पर्धेत, भारतीय संघाने संभाव्य 22 पैकी 21 सामना गुण मिळवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ ठरला.
• भारतीय अव्वल-बोर्ड खेळाडू गुकेश डोम्माराजूने ओपन स्पर्धेत वैयक्तिक खेळाडूसाठी 3056 च्या रेटिंगसह सर्वोच्च कामगिरी केली. त्याने 10 पैकी 9 गुण मिळवले.
• ४५ व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशने संपूर्ण विश्वात सर्वोत्तम कामगिरी करत भारताचे नाव मोठे केले.
