
चालू घडामोडी 12, सप्टेंबर 2024

मिशन मौसम ला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
Mission Mausam
बातम्यांमध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या दोन वर्षांमध्ये 2,000 कोटी रुपये खर्चासह ‘मिशन मौसम’ ला मंजुरी दिली आहे.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेले मिशन मौसम खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. नौदल युद्ध अभ्यास
2. नक्षलविरोधी कारवाई
3. हवामान संबंधित विज्ञान आणि संशोधन
4. यांपैकी नाही
उत्तर : हवामान संबंधित विज्ञान आणि संशोधन

काय आहे मिशन मौसम ?
• भारताला सर्व प्रकारच्या हवामानासाठी तयार करण्यासाठी तसेच क्लायमेट -स्मार्ट भारत निर्मितीसाठी मिशन मौसम.
• मिशन मौसम हा भारताच्या हवामान आणि हवामानाशी संबंधित विज्ञान, संशोधन आणि सेवांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी एक बहुआयामी आणि परिवर्तनशील उपक्रम ठरेल अशी अपेक्षा आहे.
• अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी नागरिक आणि वापरकर्त्यांसह संबंधितांना अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करण्यात हे मिशन मदत करेल.
• मान्सूनचा अंदाज, हवेच्या गुणवत्तेसाठी माहिती, अत्यंत प्रतिकूल हवामान घटना आणि चक्रीवादळे, धुके, गारपीट आणि पाऊस यासंदर्भात अचूक आणि वेळेवर माहिती प्रदान करण्यासाठी क्षमता निर्माण करणे.
• मिशन मौसमचा एक भाग म्हणून, भारत वातावरणीय विज्ञान, विशेषत: हवामान निरीक्षण, मॉडेलिंग, अंदाज आणि व्यवस्थापन यातील संशोधन आणि विकास तसेच क्षमता यात वेगाने विस्तार करेल.
• प्रगत सेन्सर्स आणि उच्च-कार्यक्षमतेच्या सुपर कॉम्प्युटर सह नव्या पिढीचे रडार आणि उपग्रह प्रणाली यासाठी समाविष्ट केले जातील.
• मंत्रालय : मिशन मौसम प्रामुख्याने भू विज्ञान मंत्रालयाद्वारे (Ministry of Earth Sciences) राबविण्यात येणार आहे.
संसदीय राजभाषा समिती
Parliamentary Committee on Official Language
Subject : GS - राज्यशास्त्र, नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली ?
1. श्री नरेंद्र मोदी
2. श्री अमित शहा
3. श्री राजनाथ सिंग
4. श्री जगदीप धनखर
उत्तर : श्री अमित शहा

संसदीय राजभाषा समिती म्हणजे काय ? ती कशासाठी असते ?
• स्थापना : राजभाषा अधिनियम, 1963 अंतर्गत संसदीय राजभाषा समितीची स्थापना 1976 मध्ये करण्यात आली होती.
• सदस्य : संसदीय राजभाषा समितीमध्ये एकूण संसदेच्या 30 सदस्यांचा (खासदारांचा) समावेश असतो.
त्यापैकी 20 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे सदस्य (खासदार) असतात.
• अध्यक्ष : 1963 च्या कायद्याच्या तरतुदीनुसार, संसदीय राजभाषा समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) असतात.
• मुख्य उद्देश : या समितीचा मुख्य उद्देश सरकारी कामकाजात हिंदी भाषेच्या वापराच्या प्रगतीचा आढावा घेणे हा आहे.
राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024
National Florence Nightingale Award 2024
बातम्यांमध्ये : 11 सप्टेंबर, 2024 रोजी, राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात परिचारिकांना 2024 या वर्षासाठीचे फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
1. साहित्य
2. चित्रपट
3. खेळ
4. नर्सिंग कर्मचारी
उत्तर : नर्सिंग कर्मचारी

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारा बद्दल महत्त्वाची माहिती :
• स्थापना : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती.
• केंद्र, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत उत्कृष्ट परिचारिकांना (नर्सिंग कर्मचाऱ्यांना) हा पुरस्कार दिला जातो.
• परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
• पुरस्काराचे स्वरूप : प्रत्येक पुरस्कारामध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, रोख पुरस्कार एक लाख रुपये आणि पदक असते.
फ्लोरेन्स नाइटिंगेल कोण होत्या ?
• फ्लोरेन्स नाइटिंगेल या एक इंग्लीश समाजसुधारक, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या.
• क्रिमियन युद्धादरम्यान कॉन्स्टँटिनोपल येथे जखमी सैनिकांची काळजी घेतांना त्या प्रसिद्ध झोतात आल्या. त्या इथे परिचारिकांचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून काम करत.
• त्यांनी लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये पहिली वैज्ञानिकदृष्ट्या आधारित नर्सिंग स्कूल-नाइटिंगेल स्कूल ऑफ नर्सिंगची स्थापना केली.
इंटरनॅशनल सोलर अलायन्स - नेपाळ नवीन सदस्य
Nepal Becomes new Member Of International Solar Alliance
बातम्यांमध्ये : नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडी-ISA मध्ये पूर्ण सदस्य देश म्हणून नुकताच सामील झाला.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडी(इंटरनॅशनल सोलर अलायन्स) मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा कितवा देश बनला आहे ?
1. 99
2. 100
3. 101
4. 102
उत्तर : 101

• नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडी-ISA मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा 101 वा देश बनला आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA- इंटरनॅशनल सोलर अलायन्स) बद्दल महत्त्वाची माहिती :
• सौरऊर्जा सोल्यूशन्सच्या उपयोजनाद्वारे हवामान बदलाविरूद्ध प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी भारत आणि फ्रान्सने संयुक्त प्रयत्न म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्सची कल्पना मांडली होती.
• स्थापना : आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन वरील पक्षांच्या 21 व्या परिषदेदरम्यान करण्यात आली.
• मुख्यालय : इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुरुग्राम (हरियाणा) येथे आहे.
• उद्देश : जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या आघाडीचा उद्देश आहे.
• ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याच्या सदस्य देशांमध्ये ऊर्जा संक्रमणास प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्स सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रचार करते.