
चालू घडामोडी 4, सप्टेंबर 2024

4 नव्या सरकारी कंपन्यांना नवरत्न दर्जा
'Navratna' status for 4 CPSEs
बातम्यांमध्ये : अलिकडेच सरकारने 4 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना ‘नवरत्न’ दर्जा दिला.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच सरकारने 4 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना ‘नवरत्न’ दर्जा दिला. खालील पैकी कोणत्या कंपनीचा त्यात समावेश नाही ?
1. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel)
2. सतलज जल विद्युत निगम (SJVN)
3. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
4. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
उत्तर : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हि महारत्न दर्जा असलेली कंपनी आहे.
नवरत्न दर्जा देण्यात आलेल्या 4 कंपन्या कोणत्या आहेत ?
1. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel)
2. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI)
3. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC)
4. सतलज जल विद्युत निगम (SJVN)

• भारत सरकारचे स्वतःचे असे व्यवसाय आहेत. ते सरकारच्या मालकीचे आहेत, त्यांना केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Central Public Sector Undertakings) असे म्हणतात.
• या कंपन्यांचे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनानुसार महारत्न कंपनी, नवरत्न कंपनी आणि मिनीरत्न कंपनी असे वर्गीकरण केले जाते.
नवरत्न कंपनी म्हणजे काय ?
• १९९७ मध्ये भारतातील मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना सरकारने नवरत्नांच्या श्रेणीत आणले.
• त्यात जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक कंपन्यांचा समावेश होता.
• देशातील कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत दर्जा मिळावा, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या त्यांच्या मोहिमेत त्यांना पाठिंबा देणे हा कंपन्यांना दर्जा देण्यामागचा उद्देश आहे.
• नवरत्न कंपनीचा दर्जा मिळवण्यासाठी आधी मिनीरत्नाचा दर्जा मिळवावा लागतो.
• सध्या 25 कंपन्यांना नवरत्न दर्जा आहे.
(नोट : सध्या भारतात 13 महारत्न आणि 25 नवरत्न कंपन्या आहेत.)
राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024
National Nutrition Week 2024
Subject : GS - दिनविशेष , सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरी करतात ?
1. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान
2. १ ते ७ जानेवारी दरम्यान
3. १ ते ७ डिसेंबर दरम्यान
4. १ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान
उत्तर : १ ते ७ सप्टेंबर दरम्यान

राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणजे काय ? तो का साजरी करतात ?
• दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरी करतात.
• मंत्रालय : महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे सन १९८२ पासून दरवर्षी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो.
उद्देश :
• पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे.
• तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या सप्ताहादरम्यान भर दिला जातो.
राष्ट्रीय पोषण माह म्हणजे काय ?
• याला राष्ट्रीय पोषण महिना असे देखील म्हणतात.
• दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरी केला जातो.
• यंदाचा हा 7 वा राष्ट्रीय पोषण माह (महिना) आहे.
• राष्ट्रीय पोषण माह हा पोशन अभियानांतर्गत एक उपक्रम आहे.
राष्ट्रीय पोषण माह 2024 चा संकल्पना :
• राष्ट्रीय पोषण माह 2024 चा संकल्पनेचा (थीमचा) फोकस ॲनिमिया, ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोशन भी पढाई भी, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान आणि एक पेड माँ के नाम यासारख्या थीमचा समावेश आहे.
पोशन अभियान काय आहे ? ते केव्हा सुरू करण्यात आले ?
0-6 वर्षे वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान माता यांचे पोषण वाढविण्यासाठी पोशन अभियान, मार्च 2018 मध्ये सुरू करण्यात आले.
प्रोजेक्ट नमन
Project NAMAN
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणत्या सशस्त्र दलाकडून प्रोजेक्ट नमन सुरू करण्यात आले आहे ?
1. भारतीय लष्कर
2. भारतीय नौदल
3. भारतीय हवाईदल
4. भारतीय तटरक्षक
उत्तर : भारतीय लष्कर

प्रोजेक्ट नमन बद्दल थोडक्यात माहिती :
• अलीकडेच भारतीय लष्कराने नमन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केला.
• नमन प्रकल्प हा लष्करातील पेन्शनरधारकांना, माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबांसाठी एक समर्पित प्रोजेक्टआहे.
• हे SPARSH (पेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन डिफेन्स सिस्टीम), या डिजिटल पेन्शन सिस्टीमच्या अंमलबजावणीभोवती केंद्रित आहे.
• ही संरक्षण पेन्शन धारकांसाठी पेन्शनची संबंधित प्रक्रिया सुलभ करते.
• सुविधा आणि तक्रार निवारण केंद्रे स्थापन केली जातील जी देशभरातील लष्करातील दिग्गज आणि नातेवाईकांसाठी सेवा प्रदान करतील.
8 वी महिला आशियायी चॅम्पियन ट्रॉफी हॅाकी स्पर्धा 2024
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 च्या महिला आशियायी चॅम्पियन ट्रॉफी हॅाकी स्पर्धेचे आयोजन ---- --- येथे करण्यात आले आहे ?
1. भारत
2. पाकिस्तान
3. जपान
4. चीन
उत्तर : भारत

• 8 वी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा (महिला आशियायी चॅम्पियन ट्रॉफी हॅाकी) भारतात होणार आहे.
• हॉकी इंडिया आणि बिहार राज्य सरकार संयुक्तपणे याचं आयोजन करत असून बिहारमधल्या राजगीर इथं 11 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
• या स्पर्धेत भारतासह विद्यमान चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंड संघांचा सहभाग अपेक्षित आहे
• बिहार राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असल्यानं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की यांनी सांगितलं. .
• गेल्या वर्षी झारखंडमधल्या रांची इथं झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ विजयी झाला होता.
स्पर्धा परीक्षेसाठी वनलाईनर संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न :
प्रश्न) आशियाई हॉकी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : दातो फ्युमियो ओगुरा
प्रश्न) 2024 च्या महिला आशियायी चॅम्पियन ट्रॉफी हॅाकी स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?
उत्तर : बिहार