
चालू घडामोडी 30, ऑगस्ट 2024

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
बातम्यांमध्ये : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 बद्दल बरोबर पर्याय निवडा.
1. महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके आणि सागर बागडे या दोन शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला.
2. पुरस्कारात प्रशस्ती पत्र, रु.५०,००० रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर

• केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी ५० शिक्षकांची निवड केली आहे.
• यात महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके आणि सागर बागडे या दोन शिक्षकांचा समावेश आहे.
• यंदा या पुरस्कारासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची निवड केली जाईल.
• शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
पुरस्काराचे स्वरूप :
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात प्रशस्ती पत्र, रु.५०,००० रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्याचे उद्दिष्ट काय आहे ?
• देशातील काही सर्वोत्तम शिक्षकांच्या असामान्य योगदानाचा गौरव करणे, तसेच आपल्या वचनबद्धतेने आणि कार्यक्षमतेने शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना आपल्या विद्यार्थ्यांचे जीवनही समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांचा सन्मान करणे, हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील शिक्षक :

श्री मंतैय्या बेडके यांच्याविषयी थोडक्यात माहिती :
• श्री. मंतैय्या बेडके हे गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत.
• श्री. मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या ८ वरून १३८ पर्यंत वाढवली आहे
• . त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत.
• त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.

श्री सागर बागडे यांच्याविषयी थोडक्यात माहिती :
• श्री. सागर बागडे गेल्या ३० वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
• त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.
RHUMI-1
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारे RHUMI -1 काय आहे ?
1. लढाऊ नौका
2. मशीन गण
3. रॅाकेट
4. यांपैकी नाही
उत्तर : रॅाकेट
बातम्यांमध्ये : भारताने नुकतेच पहिले पुन: वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट RHUMI-1 लाँच करून भारतीय अंतराळ प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

RHUMI -1 रॉकेट :
तामिळनाडू-आधारित स्टार्टअप स्पेस झोन इंडिया यांनी मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने हे हायब्रीड रॉकेट विकसित केलेलं आहे.
RHUMI -1 रॉकेट चेन्नईतील तिरुविदंधाई येथून प्रक्षेपित करण्यात आले.
RHUMI -1 रॉकेट, 3 घन (क्यूब) उपग्रह आणि 50 PICO उपग्रह अवकाशात वाहून नेत आहे.
भारतातील पहिली हायड्रॉलिक मोबाईल लॉन्च सिस्टीम वापरून प्रक्षेपण करण्यात आले.
अवकाशात सोडलेले उपग्रह काय काम करतील ?
• घन (क्यूब) उपग्रह वैश्विक किरणोत्सर्गाची तीव्रता, अतिनील किरणोत्सर्गाची तीव्रता आणि हवेच्या गुणवत्तेसह वातावरणातील परिस्थितींवरील डेटाचे निरीक्षण आणि संकलन करतील.
• पिको उपग्रह पर्यावरणीय घटकांचे विश्लेषण करण्यावर लक्ष केंद्रित करेल जसे की कंपन, एक्सेलेरोमीटर रीडिंग, उंची, ओझोन पातळी आणि विषारी पदार्थ इत्यादी.
पुन्हा वापरण्यायोग्य रॉकेट्स म्हणजे काय ?
What are Reusable Rockets ?
पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट पेलोड (उपग्रह) सोडतात, पृथ्वीवर परत येतात आणि पुन्हा नवीन पेलोडसह लॉन्च केले जाऊ शकतात.
Reusable Rockets चे फायदे काय ?
• पुन्हा वापर केल्यामुळे प्रत्येक प्रक्षेपणासाठी नवीन रॉकेट तयार करावे लागत नाही त्यामुळे नवीन प्रक्षेपणाचा खर्च 65% पर्यंत कमी होऊ शकतो.
• साधारणतः रॉकेट अवकाशात गेल्यावर तेथील कचरा वाढवतात, Reusable Rockets वापरल्यामुळे अवकाशातील कचरा (स्पेस डेब्रिज) कमी करता येईल.
• रॉकेट पुन्हा वापरल्यामुळे नवीन मिशन साठी पुन्हा रॉकेट बनवण्याचा वेळ वाचवला जातो त्यामुळे प्रक्षेपण लवकर आणि जास्त प्रमाणात करता येईल.
एकीकृत निवृत्तीवेतन योजना काय आहे ?
Unified Pension Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) एकीकृत निवृत्तीवेतन योजना (युनिफाइड पेन्शन स्कीम) केव्हा पासून लागू करण्यात येणार आहे ?
1. 1 डिसेंबर 2024
2. 1 जानेवारी 2025
3. 1 एप्रिल 2025
4. 1 मे 2025
उत्तर : 1 एप्रिल 2025
बातम्यांमध्ये : केंद्र सरकारने ‘एकीकृत निवृत्तीवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे.
तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

काय आहे एकीकृत निवृत्तीवेतन योजना ?
• केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एकीकृत निवृत्तीवेतन योजना’ (UPS) मंजूर केली, जी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन देईल.
• ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल.
• केंद्र सरकारचे कर्मचारी सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधून UPS मध्ये स्थलांतरित होतील.
पेन्शनचे प्रकार :
• खात्रीशीर निवृत्ती वेतन (Assured Pension) :
या योजनेत सेवानिवृत्तीपूर्वी किमान 25 वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या 50 टक्के रक्कम मिळण्याची हमी दिली जाते.
• खात्रीशीर किमान निवृत्तीवेतन (Assured Minimum Pension) :
किमान 10 वर्षापर्यंतच्या सेवेच्या स्थितीत कर्मचाऱ्याला दरमहा किमान 10 हजार रुपये दिले जातील.
• खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तीवेतन (Assured Family Pension) :
सेवानिवृत्त व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्यांचे जवळचे कुटुंब निवृत्त व्यक्तीने शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या 60 टक्के रक्कम निवृत्ती वेतनाच्या स्वरुपात मिळेल.
• महागाई निर्देशांक (Inflation Indexation) :
• वर नमूद केलेल्या तीन प्रकारच्या पेन्शनवर महागाई सवलत मिळेल.