
चालू घडामोडी 24, ऑगस्ट 2024

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती
Shivaram Hari Rajguru
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना विनम्र अभिवादन🙏🙏💐
Subject : GS - आधुनिक भारत - क्रांतिकारी
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सँडर्सचा वध खालील पैकी कोणी केला ?
1. अनंत कान्हेरे
2. राजगुरू
3. चाफेकर बंधू
4. यांपैकी नाही
उत्तर : राजगुरू
• अनंत कान्हेरे यांनी नाशिक चे कलेक्टर जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.
• चाफेकर बंधूंनी रँड आणि आयहर्स्ट यांना पुण्यात गोळ्या घालून ठार केले.
![[ hutatme shivram hari rajguru jayanti , rajguru jayanti ,24 August 1908 , hindustan socialist republican army , gunman , simon commission , lala lajpatray , rajguru chandrashekar azad bhagatsingh jaygopal , 23 march 1931 , bhagat singh rajguru ani sukhdev yana fasi denyat aali , 23 March , Sahid Din ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Rajguru_1724939452753.webp)
• हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक सशस्त्र क्रांतिकारक होते.
• जन्म : 24 ॲागस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावी एका मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला.
• (त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावचे राजगुरुनगर असे नामकरण करण्यात आले.)
• प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले. तेथील हनुमान व्यायाम शाळेत ते जात असत.
• त्या वातावरणात त्यांना देशभक्तीची मोठी प्रेरणा मिळाली.
• १९२३ साली म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी ते संस्कृत अध्ययनासाठी बनारसला गेले आणि येथे त्यांची सचिंद्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांशी ओळख झाली.
• पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले.
• संस्कृत व मराठीबरोबरच इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही त्यांना चांगल्या अवगत होत्या.
• त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यांना हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा (HSRA) " गनमॅन " म्हटले जात.
सायमन कमिशनला विरोध आणि लाला लजपतराय यांचा मृत्यू :
• ब्रिटीश सरकारने नोव्हेंबर 1927 मध्ये भारताच्या घटनात्मक प्रगतीचा अहवाल देण्यासाठी आणि पुढील घटनात्मक सुधारणा करण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती केली.
• परंतु या समितीच्या 7 सदस्यांमध्ये एकही भारतीय नव्हता.
• भारतातील लोकांसाठीच्या असलेल्या सुधारणांमध्ये एकही भारतीय नसणे यामुळे हे भारतीयांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे उल्लंघन आणि भारतीयांच्या स्वाभिमानाचा अपमान होता. त्यामुळे सायमन कमिशनला विरोध घेण्यात आला.
• सायमन कमिशन लाहोरमध्ये आल्याच्या निषेधार्थ लाला लजपतराय यांनी 30 ऑक्टोबर 1928 रोजी अहिंसक निदर्शनाचे नेतृत्व केले.
• जेम्स ए. स्कॉट, या पोलिस अधीक्षकाने आंदोलकांवर "लाठीचार्ज" करण्याची सूचना केली.
• लाला लजपतराय यांच्या छातीवर वार केले गेले यामुळे 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले.
सँडर्सचा वध :
• लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ज्या क्रांतिकारकांची नेमणूक झाली त्यात राजगुरू, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, जयगोपाल यांचा समावेश होता.
• १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरला ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सचा गोळ्या घालून ठार केले. त्यातील पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडलेल्या होत्या.
• ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली.
• 23 मार्च 1931 ला लाहोर येथे भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
• त्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
बातम्यांमध्ये : पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीसा जारी करून गणेशोत्सव दरम्यान ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले.
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) स्थापना कधी करण्यात आली ?
1. 1970
2. 1980
3. 1990
4. 2000
उत्तर : 1970
![[ maharashtra pradushan niyantran mandal , Maharashtra Pollution Control Board , 7 september 1970 madhe MPCB chi staphna jhali , jal kayda 1974 , hawa kayda 1981 , paryavarn kayda 1986 ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maharashtra_Pradushan_Niyantran_Mandal_1724939490135.webp)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) :
• 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली.
• हे मंडळ महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
• राज्यात विविध पर्यावरणीय कायदे लागू करण्यासाठी हे मंडळ जबाबदार आहे.
पर्यावरणासंबंधी महत्त्वाचे कायदे :
• जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४,
• हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९८१
• पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६
(नोट : कोणता कायदा कधी पारित केला त्याचे वर्ष लक्षात ठेवा, पेपर ला विचारतात.)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची काही महत्त्वपूर्ण कार्ये -
• प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तिचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.
• सांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व उपचार संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.
• प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांवर पुनर्प्रक्रिया करुन पुन्हा उपयोगात आणणे, पर्यावरणस अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.
• योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.
• स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात पर्यावरण (संरक्षण) कायदा कधी लागू करण्यात आला ?
1. 1964
2. 1975
3. 1986
4. 1992
उत्तर : 1986