थाडौ समाज कोण आहेत ?
Who are Thadou tribes ?
बातम्यांमध्ये : थाडौ समाजातील लोकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी थाडौ स्टुडंट्स असोसिएशन (TSA) द्वारे जागतिक व्यासपीठ तयार केले आहे.
Subject : GS- भूगोल/ अर्थशास्त्र - लोकसंख्या
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारा थाडौ (Thadou) समाज प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो.
1. मध्य प्रदेश
2. हिमाचल प्रदेश
3. मणिपूर
4. सिक्कीम
उत्तर : मणिपूर

थाडौ समाजाबद्दल थोडक्यात माहिती :
• थाडौ हे मणिपूर राज्यातील स्थानिक लोक आहेत.
• मणिपूर राज्यातील इंफाळ खोऱ्याला लागून असलेल्या डोंगराळ प्रदेशात ते राहतात.
• 2011 च्या मणिपूर राज्याच्या जनगणनेनुसार मणिपूरमधील लोकसंख्येच्या बाबतीत थाडौ लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मणिपूरमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या मैतेई या समुदायाची आहे.
• थाडौ समाज उदरनिर्वाहासाठी प्राण्यांचे संगोपन, शेती, शिकार आणि मासेमारी करतात.
• थाडौ वस्ती जंगलात वसलेली आहे ते प्रामुख्याने झुम प्रकार ची शेती करतात.
झूम शेती म्हणजे काय ?
• झूम शेती स्थलांतरित शेतीचा एक प्रकार आहे. यात जंगलातील झाडे- झुडपे तोडून शेतीसाठी योग्य जमिन बनवली जाते.
• जेव्हा जमिनीवरील सर्व वनस्पती तोडून जाळली जाते, तेव्हा राख मृदेत मिसळल्यामुळे पोटॅशचा भरपूर पुरवठा होतो आणि मृदेची सुपीकता वाढते.
• जमिनीची सुपीकता कमी झाल्यावर याच प्रकारे दुसरी जमीन निवडून पुन्हा झाडे- झुडपे तोडून शेती करतात.
• या पद्धतीत शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक शेती अवजारांचा वापर केला जात नाही.
• झूम शेती प्रमुखांनी भारताच्या ईशान्यकडील भागात केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
Axiom-4 मिशन काय आहे ?
What is Axiom-4 Mission ?
Subject : GS- विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेल्या एक्झिम-4 (Axiom-4) मिशन बाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
1. हे इस्त्रो आणि नासाचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका संबंधित मिशन आहे.
2. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर
Axiom-4 मिशन बद्दल महत्त्वाची माहिती :
• Axiom-4 मिशन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (International Space Station) जाणारे खाजगी अंतराळ उड्डाण आहे.
• या मिशनद्वारे काही लोकांना अंतराळ स्पेस स्टेशन मध्ये पाठवले जाणार आहे.
• यासाठी भारताकडून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे मुख्य अंतराळवीर (Pilot) असतील तर ग्रुप कॅप्टन प्रसन्न बाळकृष्ण नायर हे त्यांचे सह अंतराळवीर (Backup Pilot) असतील.
• 1984 मध्ये अवकाशात जाणारे पहिली भारतीय राकेश शर्मा हे आहेत.
Axiom-4 चे उद्दिष्ट काय आहे ?
• या मोहिमेत अवकाशातील व्यावसायिक प्रयोग सुलभ करणे, ज्यामध्ये वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक विकास आणि अवकाश पर्यटन यांचा समावेश आहे.
भारतासाठी Axiom-4 हे मिशन का महत्वाचे आहे ?
• Axiom-4 मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने त्यांच्या 4 प्रशिक्षित गगनयान अंतराळवीरांपैकी दोन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) प्रवास करण्यासाठी निवडले आहे.
• ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या दोन्ही अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे या प्रशिक्षणाला गगनयात्री असे म्हटले आहे.
• Axiom-4 ही मोहीम भारताच्या गगनयान मिशन साठी खूप महत्त्वाची आहे.
गगनयान मिशन काय आहे ?
• गगनयान मिशन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचे मानवयुक्त अंतराळ मिशन आहे.
• गगनयान मिशन 3 दिवसांचे असणार आहे. याद्वारे पृथ्वीच्या 400 किमीच्या कक्षेत मानव मिशन पाठवून पुन्हा त्यांना सुखरूप पृथ्वीवर परत आणले जाईल.
• गगनयान मिशनद्वारे भारताची मानवी अंतराळ उड्डाण क्षमता जगासमोर प्रदर्शित होणार आहे.
• जर गगनयान मिशन यशस्वी झाले तर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा अंतराळात मनुष्य पाठवणारा चौथा देश बनेल.
• गगनयान मोहिमेसाठी खर्च अंदाजे 9023 कोटी रुपये होणार आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक काय आहे ?
(International Space Station)
• आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले.
• अंतराळातील ही एक मोठी प्रयोगशाळा आहे जिथे अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील प्रयोग करतात.
• या स्पेस स्टेशन वर अंतराळवीरांना राहण्याचे, झोपण्याचे त्याचप्रमाणे शास्त्रीय प्रयोग करण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे.
हिरोशिमा दिवस काय आहे ?
Subject : GS- इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दुसरे जागतिक महायुद्ध केव्हा संपले ?
1. 1942
2. 1944
3. 1945
4. 1947
उत्तर : 1945
हिरोशिमा दिवस काय आहे ?
• 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा या ठिकाणी अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस आठवला जातो.
• दुसऱ्या महायुद्धादरम्यान, 6 ऑगस्ट 1945 रोजी, अमेरिकेने हिरोशिमावर "लिटल बॉय" नावाचा अणुबॉम्ब टाकला.
• सुमारे 70,000-80,000 लोक ताबडतोब मारले गेले आणि बरेच लोक नंतर जखमा आणि रेडिएशनमुळे मरण पावले.
• ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने ‘फॅट मॅन’ नावाचा दुसरा अणुबॉम्ब जपानच्याच नागासाकी या शहरावर टाकला.
• दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेल्या या अणुबॉम्ब हल्याचा परिणाम खूप भयानक होता.
• यामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले.
दुसरे महायुद्ध :
• दुसरे महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 ला सुरू झाले आणि 2 सप्टेंबर 1945 ला संपले.
• दुसरे महायुद्ध मित्र राष्ट्र (Allies power) आणि अक्ष शक्ती(Axis power) यांच्यात लढले गेले.
• मित्र राष्ट्रांचे नेतृत्व अमेरिका, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि सोव्हिएत रशिया करत होते तर अक्ष शक्तींचे नेतृत्व जर्मनी, इटली आणि जपान करत होते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब अनुक्रमे ----- तारखेला टाकला.
1. 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1943
2. 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945
3. 6 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 1945
4. 9 ऑगस्ट व 12 ऑगस्ट 1945
उत्तर : 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945
बेली ब्रिज म्हणजे काय ?
What is a Bailey bridge ?
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बेली ब्रिज संदर्भात खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे.
1. हा ब्रिज दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिल्यांदा बनवला गेला.
2. भारतीय लष्कराच्या मद्रास अभियंता गटाने केरळ भूस्खलन बचाव कार्यात याचा वापर केला.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर
केरळमधील वायनाड खेथे झालेल्या भूसखलनात बचाव कार्य करण्यासाठी भारतीय लष्कराच्या मद्रास अभियंता गटाने मुंडक्काई गावात जाण्यासाठी बेली ब्रिज बांधला.
बेली ब्रिज म्हणजे काय ?
• बेली ब्रिज हा एक मॉड्युलर पुल आहे. या प्रकारच्या पुलाचे भाग आधीच तयार केलेले असतात जेणेकरून त्यांना कमीत कमी बांधकामाची आवश्यकता असते आणि आवश्यकतेनुसार ते पटकन एकत्र केले जाऊ शकतात.
बेली ब्रिजची निर्मिती कोणी केली ?
• डोनाल्ड कोलमन बेली या स्थापत्य अभियंत्याने या नव्या प्रकारच्या पुलाची सर्वात पहिल्यांदा निर्मिती केली.
• 1941 मध्ये त्यांनी आपल्या या रचनेचा पहिला आराखडा ब्रिटिश वॅार ऑफिस कडे सादर केला.
• दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात बेली ब्रिजच्या उपयोग मोलाचा ठरला.
• अवघ्या काही तासात पुल तयार करणे, युद्धादरम्यान पुल मोडून पुन्हा दुसऱ्या जागी उभा देखील करता येणे हे या पुलाचे वैशिष्ट्य आहे.
• या पुलाचे भाग वजनाने हलके असल्यामुळे त्यांना हवे तिथे हलवता येतात आणि त्यासाठी कोणत्याही अवजड वाहनाची गरज भासत नाही.
• हा पुल फक्त युद्धातच नाही तर अचानक आलेल्या आपत्तीमध्ये मदतकार्यासाठीही या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
• 1971 साली झालेले भारत-पाकिस्तान युद्ध तसेच 2021 मध्ये अरूणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या गावांमधील लोकांना वाचवण्यासाठी या पुलाचा वापर केला गेला.
केरळमधील वायनाड भूसखलन बचाव कार्यात बेली ब्रिज कोणी तयार केला ?
• केरळमधील वायनाड खेथे झालेल्या भूसखलनात बचाव कार्य करण्यासाठी भारतीय लष्कराच्या मद्रास अभियंता गटाने हा पुल तयार केला.
मद्रास अभियंता गट (Madras Engineering Group) :
• मद्रास अभियंता गटाला अनौपचारिकपणे मद्रास सॅपर्स म्हणूनही ओळखले जाते.
• हा भारतीय लष्कराच्या अभियंता कॉर्प्सचा एक अभियंता गट आहे.
• मद्रास सॅपर्स चा उगम ब्रिटीश राजवटीच्या पूर्वीच्या मद्रास प्रेसिडेन्सी सैन्यात झाला.
• या रेजिमेंटचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे.