
चालू घडामोडी 17, ऑगस्ट 2024

रामसर स्थळांच्या यादीत आणखी 3 पाणथळ जागा
+3 wetland to the list of ramsar sites
बातम्यांमध्ये : अलीकडेच, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी माहिती दिली की भारतातील आणखी 3 पाणथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
Subject : GS- पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच नंजरायन पक्षी अभयारण्य आणि काझुवेली पक्षी अभयारण्य यांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले हे कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. तामिळनाडू
3. मध्य प्रदेश
4. आंध्र प्रदेश
उत्तर : तामिळनाडू

नुकतीच तामिळनाडूमधील 2 तर मध्य प्रदेशातील 1 अशा 3 नविन पाणथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या.
1. नंजरायन पक्षी अभयारण्य (तामिळनाडू)
2. काझुवेली पक्षी अभयारण्य (तामिळनाडू)
3. तवा जलाशय (मध्य प्रदेश)
पाणथळ क्षेत्र (जागा) म्हणजे काय ?
• पाणथळ जमीन ही अशी क्षेत्रे आहेत जिथे पाणी हे पर्यावरण आणि संबंधित वनस्पती आणि प्राणी जीवन नियंत्रित करणारे प्राथमिक घटक आहे.
• पाणथळ जमीन हे एक भूभाग आहे जेथे परिसंस्थेचा एक मोठा भाग कायमस्वरूपी किंवा वार्षिक पाण्याने भरलेला असतो किंवा काही हंगामासाठी त्यात बुडलेला असतो. अशा भागात जलीय वनस्पतीं मोठ्या प्रमाणात असतात.
पाणथळ क्षेत्र इतकी महत्त्वाची का असतात ?
• जलशुद्धीकरण, परिसंस्थांचे पुरापासून संरक्षण, जमिनीची धूप आटोक्यात ठेवणे, भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा सामावून घेणे, त्यातील खनिजे विघटनाद्वारे मुक्त करून जीव-जंतूस उपलब्ध करून देणे, कार्बन डायऑक्साइड स्टोरी करणे अशी अतिमहत्त्वाचे कार्य करून पर्यावरणाचा समतोल पाणथळ क्षेत्रामुळे राखला जातो.
• त्याचबरोबर सृष्टि-वातावरण सौंदर्यात भर घालणे, पर्यटन स्थळे म्हणून आणि सामाजिक कार्यक्रमातही पाणथळ जागा महत्त्वाच्या ठरतात.
रामसर ठराव म्हणजे काय ?
रामसर स्थळ म्हणजे काय ?
• इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
• या ठरावा अंतर्गत पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी एखादे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात येते.
• हा ठराव 1975 सालापासून अंमलात आला.
• भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला.
• स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न - उत्तरे
प्रश्न) भारतात किती रामसर स्थळे आहेत ?
उत्तर : 85 ( ऑगस्ट 2024 पर्यंत)
प्रश्न) भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : तामिळनाडू - तामिळनाडूमध्ये 18 रामसर स्थळे आहेत.
प्रश्न) जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस ( World Wetland Day) केव्हा असतो ?
उत्तर : 2 फेब्रुवारी
• इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
प्रश्न) महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत ?
1. 3
2. 5
3. 7
4. 9
उत्तर : 3
1. लोणार सरोवर
2. नांदूर मध्यमेश्वर
3. ठाणे खाडी
डॉ. राम नारायण अग्रवाल
Dr. Ram Narain Agarwal
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न - उत्तरे
प्रश्न) शास्त्रज डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे निधन झाले त्यांना खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राचे जनक म्हटले जात होते ?
1. पृथ्वी
2. अग्नी
3. त्रिशूल
4. आकाश
उत्तर : अग्नी

प्रख्यात शास्त्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे 15 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले.
डॉ. राम नारायण अग्रवाल यांबद्दल थोडक्यात माहिती :
• डॉ. राम नारायण अग्रवाल हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ होते.
• त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि डॉ. अरुणाचलम यांच्या सोबत अग्नी आणि इतर क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर काम केले होते.
• डॉ. राम नारायण अग्रवाल यांनी 1983 मध्ये सुरू करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
• DRDO चे प्रकल्प संचालक म्हणून दोन दशकांवर अधिक काळ देशाच्या महत्त्वकांशी अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व त्यांनी केले होते.
• डॉ. राम नारायण अग्रवाल यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1990 मध्ये पद्मश्री आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.