
चालू घडामोडी 22, ऑगस्ट 2024

मन्याचीवाडी : महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा असलेले गाव
Manyachiwadi : Maharashtra's first solar village
बातम्यांमध्ये : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मन्याचीवाडी या राज्यातील पहिले सौर गांवाचे उद्घाटन केले.
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्रातील पहिले सौर गांव (सोलर व्हिलेज) कोणते ?
1. मन्याचीवाडी
2. भिलार
3. पाटोदा
4. अंतरवाली सराटी
उत्तर : मन्याचीवाडी

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मन्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर गांव (सोलर व्हिलेज) ठरले आहे.
• पंतप्रधान सूर्यघर मोफत विज योजने अंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
• घराच्या छतावर सोलर पॅनल बसवलेली आहेत त्याद्वारे वीज निर्मिती केली जाईल.
• जर ग्राहकांनी अतिरिक्त सौरऊर्जा निर्माण केली तर ते महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.
पंतप्रधान सूर्यघर मोफत विज (बिजली) योजना काय आहे ?
What is PM Surya Ghar Muft Bijlee Yojana?
• पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना भारतातील घरांना छतावरील सौर पॅनलच्या बसवून मोफत वीज उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे.
• ही योजना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.
• 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
• या योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येईल.
• जर ग्राहकांनी अतिरिक्त सौरऊर्जा निर्माण केली तर ते महावितरणला विकून अतिरिक्त पैसे मिळवू शकतात.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्रातील पहिले सौर गांव (सोलर व्हिलेज) मन्याचीवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. सिंधुदुर्ग
2. सांगली
3. सातारा
4. कोल्हापूर
उत्तर : सातारा
मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ?
CM Vayoshri Yojna
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल बरोबर असणारा पर्याय निवडा.
1. ही योजना 65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
2. या योजनेअंतर्गत मासिक 3000 रुपये दिले जातात.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
• उत्तर : ही योजना 65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. हा पर्याय बरोबर आहे.
• या योजनेअंतर्गत वार्षिक 3000 रुपये दिले जातात.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
• मुख्यमंत्री वयोश्री योजना ही 65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी आहे.
• योजनेचा उद्देश : ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक सहाय्य आणि उपकरणे खरेदी करण्यास मदत करणे.
• या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते. यामध्ये चष्मा, वॉकर, श्रवण यंत्र यांसारखे वस्तूंचा समावेश आहे.
• आर्थिक मदत : पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन हजार रुपये मिळतात ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात
शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा विधेयक) 2020 काय आहे ?
Shakti Criminal Laws (Maharashtra Amendment) Bill, 2020
Subject : GS - कायदा
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा विधेयक) 2020 हे ------ राज्यातील दिशा कायद्याच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.
1. उत्तर प्रदेश
2. मध्य प्रदेश
3. आंध्र प्रदेश
4. तामिळनाडू
उत्तर : आंध्र प्रदेश

शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा विधेयक) 2020 काय आहे ?
• शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा विधेयक) 2020, याला शक्ति विधेयक म्हणूनही ओळखले जाते हे भारतीय दंड संहिता(IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा, (POCSO कायदा) मध्ये सुधारणा करण्यासाठी सादर करण्यात आले होते.
• आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याचा अभ्यास करून लहान मुलं आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात वेगाने आणि कठोर कारवाई व्हावी यासाठी " महाराष्ट्र शक्ती फौजदारी सुधारणा कायदा 2020 आणि विशेष कोर्ट आणि महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल कायद्याची अंमलबजावणीसाठीची व्यवस्था 2020 " ही दोन विधेयक राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना डिसेंबर 2020 मध्ये मांडण्यात आली होती.
• ही दोन्ही विधेयक महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाल्यानंतर ही विधेयके केंद्र सरकारकडे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली होती पण राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी अभावी या विधेयकांचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेलं नाही त्यामुळे हा कायदा राज्यात लागू झालेला नाही.
• या विधेयकात महिला आणि मुलांवरील बलात्कारासारख्या अमानुष आणि दुर्मिळ गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
• खोटी माहिती देणे आणि ॲसिड फेकणे यासारख्या काही गुन्ह्यांसाठी शिक्षेत वाढ करण्यात आली आहे.
• ई-मेल, सोशल मीडिया, तसंच मेसेजद्वारे महिलेचा छळ, धमकी, बदनामी करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
• विशेष कोर्टांची निर्मिती करण्यात येणार आहे.
• महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या तपासासाठी जिल्हा अधीक्षक, महिला अधिकाऱ्यासह विशेष पोलीस पथकाचा समावेश
यांसारख्या तरतूदी या विधेयकात आहे.