
चालू घडामोडी 20, ऑगस्ट 2024

पायतोंगटार्न शिनावात्रा
Paetongtarn Shinawatra
Subject : GS - भारत आणि भारताचे शेजारील देश
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पायतोंगटार्न शिनावात्रा नुकतीच यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?
1. म्यानमार
2. थायलंड
3. श्रीलंका
4. मलेशिया
उत्तर : थायलंड

बातम्यांमध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायतोंगटार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पायतोंगटार्न शिनावात्रा :
• पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत.
• पायतोंगटार्न शिनावात्रा या माजी पंतप्रधान आणि अब्जाधीश ताक्सिन चिनावत यांची 37 वर्षीय मुलगी आहे.
• पायतोंगटार्न या थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.
थायलंड देशाबद्दल थोडक्यात माहिती :
• थायलंड हा आग्नेय आशियातील एक देश आहे.
• थायलंडची राजधानी बॅंकॅाक ही आहे.
• राष्ट्रीय चलन : थाई बात (THB)
• अधिकृत भाषा : थाई
• बौद्ध धर्म हा थायलंड देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) आहे. थायलंड मधील ९2.5% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.
• पर्यटन हा या देशाचा मुख्य व्यवसाय आहे.
प्रश्न) ____ देशाला बौद्ध भिक्खूंचा देश असे म्हणतात.
उत्तर : थायलंड
जियो पारशी योजना काय आहे ?
What is Jiyo Parsi Scheme ?
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेली जियो पारशी योजनेबद्दल योग्य पर्याय निवडा.
1. ही योजना 2013 - 14 मध्ये सुरू करण्यात आली होती.
2. पारशी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रात आहे.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर

बातम्यांमध्ये : अल्पसंख्याक व्यवहार मंत्री यांनी अलीकडेच जिओ पारसी योजना पोर्टल लाँच केले.
• भारतातील पारशी समुदायाची कमी होत चालले लोकसंख्येचे प्रमाण रोखण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने लागू केलेली ही एक केंद्र सरकारची योजना आहे.
• केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या मते, पारशी समाजाची लोकसंख्या 1941 मध्ये अंदाजे 1,14,000 वरून 2011 मध्ये 57,264 वर घसरली.
• जियो पारशी योजना 2013-14 मध्ये सुरू करण्यात आली होती.
जियो पारशी योजनेची उद्दिष्टे :
• वैज्ञानिक प्रोटोकॉल आणि सर्वसमावेशक उपक्रमांचा अवलंब करून पारशी लोकसंख्येच्या घटत्या प्रवृत्तीला मागे टाकणे हे मुख्य ध्येय आहे.
• पारशी लोकसंख्या स्थिर करणे आणि भारतात त्यांची संख्या वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
पारशी समाजाबद्दल थोडक्यात माहिती :
• पारशी समाजाचे लोक सुमारे 1,000 वर्षांपूर्वी पर्शियातून भारतीय उपखंडात आले.
• भारतात राहून या समाजाने आपल्या वेगळ्या चालीरीती आणि परंपरा जपत भारतीय समाजात एकरूप झाले.
• पारशी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रात असून दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे.
अक्षय ऊर्जा दिवस
Akshay Urja Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 20 ऑगस्ट हा अक्षय ऊर्जा दिवस म्हणून खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ?
1. इंदिरा गांधी
2. राजीव गांधी
3. अटलबिहारी वाजपेयी
4. लालकृष्ण अडवाणी
उत्तर : राजीव गांधी

• दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो.
• हा दिवस अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भारताने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर आणि विकास कार्यात केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो.
अक्षय ऊर्जा दिवस 20 ऑगस्ट लाच का साजरी करतात ?
• अक्षय ऊर्जा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरी केला जातो.
• भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी शाश्वत विकास आणि नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पहिला अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरी केला गेला ?
नवीन व पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकाराने 20 ऑगस्ट 2004 रोजी पहिला अक्षय ऊर्जा दिवस साजरी केला गेला.
नैसर्गिक साधन स्त्रोतांची दोन गटात विभागणी केली जाते
1) अनविकरणीय ऊर्जा साधने (non-renewable resource)
2) नवीकरणीय / अक्षय ऊर्जा साधने (renewable resource)
1) अनविकरणीय ऊर्जा साधने म्हणजे काय ?
• अनविकरणीय म्हणजे त्यांची निर्मिती पुन्हा करता येत नाही किंवा पुन्हा निर्माण होण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो.
• कोळसा, पेट्रोलियम (क्रूड ऑइल) आणि नैसर्गिक वायू यांसारखी नैसर्गिक संसाधने नैसर्गिकरीत्या तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि ते जास्त प्रमाणात वापरल्यामुळे त्यांचे साठे कधीतरी संपून जाऊ शकतात.
2) नवीकरणीय (अक्षय) ऊर्जा साधने म्हणजे काय ?
• अक्षय हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कधीही न संपणारा असा होतो.
• सूर्य, हवा, सागरी लाटा इत्यादी न संपणारी ऊर्जेचे स्त्रोत आहे.
• सौर ऊर्जा ,पवन ऊर्जा, सागरी लाटा, भूऔष्णिक ऊर्जा यांना नवीकरणीय (अक्षय) ऊर्जा साधने म्हणतात.
अभ्यास प्रश्न
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरी केला जातो ?
1. 8 मे
2. 15 ऑगस्ट
3. 20 ऑगस्ट
4. 14 सप्टेंबर
उत्तर : 20 ऑगस्ट