
चालू घडामोडी 29, ऑगस्ट 2024

राष्ट्रीय क्रीडा दिन
National Sports Day
Subject : GS - दिनविशेष, खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ?
1. मिल्खा सिंग
2. मेजर ध्यानचंद
3. सचिन तेंडुलकर
4. यांपैकी नाही
उत्तर : मेजर ध्यानचंद
अलीकडेच, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी 29 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) साजरा करण्यात आला.

मेजर ध्यानचंद
• मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला.
• मेजर ध्यानचंद हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एक प्रमुख हॉकीपटू होते.
• त्याच्या हॉकी खेळातील प्रभुत्व आणि खेळाची समज यामुळे त्यांना “हॉकीचा जादूगार” म्हणून आोळखले जाते.
• 1928, 1932 आणि 1936 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताने हॅटट्रिक साधत सलग तीन वर्षे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकली त्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
• 1926 ते 1948 दरम्यान त्यांनी भारतासाठी 185 सामने खेळून 400 हून अधिक गोल केले.
• 1956 मध्ये ते भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर म्हणून ते निवृत्त झाले.
• 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.
• 2012 मध्ये, भारत सरकारने त्यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
• त्यांचा सन्मान करण्यासाठी, भारत सरकारने 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरी करण्याचे महत्त्व काय आहे ?
• भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची ओळख करून, देशाच्या अभिमानासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
• भारतातील क्रीडा भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन हा एक विशेष दिवस आहे.
• सर्व वयोगटातील व्यक्तींना शारीरिक हालचालींचे महत्व सांगण्यासाठी, खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी, क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याचप्रमाणे क्रीडापटूंच्या कामगिरीचा सन्मान करणे हे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उद्दिष्ट आहे.
टेलिग्रामचा संस्थापक आणि CEO ला फ्रान्स मध्ये अटक
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) टेलिग्रामचे संस्थापक कोण आहे ?
1. मार्क झुकरबर्ग
2. इलॅान मस्क
3. पावेल दुरोव्ह
4. यांपैकी नाही
उत्तर : पावेल दुरोव्ह

टेलिग्रामचे संस्थापक आणि अध्यक्ष पावेल दुरोव्ह यांना अटक का करण्यात आली ?
बेकायदेशीर कृत्यांमध्ये टेलिग्राम ॲप'चा वापर आणि तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्याच्या आरोपानंतर टेलिग्रामचे संस्थापक आणि अध्यक्ष पावेल दुरोव्ह यांना फ्रान्स मध्ये अटक करण्यात आली.
कोण आहे पावेल दुरोव्ह ?
• पावेल दुरोव्ह (वय ३९) यांचा जन्म रशिया मध्ये झाला.
• त्यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेतले होते.
• टेलिग्राम तयार करण्यापूर्वी, पावेल दुरोव्हने रशियातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क " व्ही कंताक्ते " (VKontakte) नावाच्या सोशल मीडिया ॲपची स्थापना केली.
• रशियन सरकारने '" व्ही कंताक्ते "' या प्लॅटफॉर्मवरील विरोधकांची खाती बंद करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती परंतु ही बंदी झुगारल्यानंतर 2014 मध्ये त्यांना रशिया सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
• रशिया सोडण्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच 2013 मध्ये त्यांनी टेलिग्राम या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती.
• सध्या ते दुबईमध्येच राहत असून टेलिग्राम कंपनीचे कामकाजही तिथूनच चालवले जाते.
• पावेल दुरोव्ह यांच्याकडे UAE आणि फ्रान्सचे नागरिकत्व आहे.
टेलिग्राम ॲप काय आहे?
• फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, आयमेसेज यांच्या प्रमाणेच टेलिग्राम हेदेखील जगभरात प्रसिद्ध असलेले मोठे मेसेजिंग अॅप आहे.
• पावेल दुरोव्ह यांनी 2013 मध्ये टेलिग्राम या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती.
• व्हॉट्सअपमध्ये एकावेळी एका ग्रुपमध्ये 1024 सदस्य असू शकतात तर दुसरीकडे टेलिग्रामवर ही मर्यादा 2 लाखांपर्यंत आहे.
• त्यामुळेच, प्रचंड सदस्यसंख्या असलेल्या या ग्रुप्समधूनच दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याची टीका टेलिग्रामवर वारंवार होते.
टेलिग्राम ॲप वर काय आरोप आहे ?
• टेलिग्रामवर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर गोपनिय ठेवू शकता तसेच सीम कार्ड नसतानाही साइन अप करु शकता. युझर्सना टेलिग्रामवरील ग्रुप्स आणि चॅनेल्सवरील इतर सदस्यांचे मोबाइल नंबर्स दिसू शकत नाहीत.
• टेलीग्रामच्या यांसारख्या गोपनीयता वैशिष्ट्यांमुळे अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवादाचे समर्थन, सायबरस्टॉकिंग, ॲानलाईन घोटाळे यांसारखे बेकायदेशीर कामांसाठी टेलिग्रामचा वापर होत असल्याचा आरोप टेलिग्रामवर केला जातो.