
चालू घडामोडी 27, ऑगस्ट 2024

मुंबई महानगर प्रदेशाचा GDP 300 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचा रोड मॅप
Roadmap to increase Mumbai Metropolitan Region’s GDP to $300 billion
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) निती आयोगाने सादर केलेल्या अहवालात मुंबई महानगर प्रदेशाची GDP 300 अब्ज डॉलर बनवण्यासाठी किती वर्षांचा रोड मॅप बनवला आहे ?
1. तीन
2. पाच
3. सात
4. नऊ
उत्तर : पाच
![[ 2030 paryant mumbai chi gdp honar 300 abja dollar mhanjech 300 Billion Dollar, Mumbai Mahanagar Pradeshcha Vikas, niti ayog nea mumbai mahanagar cha road map 5 varshacha banavla ahe, 9 mahanagarpalika, bruhanmumbai, thane, kalyan, dombivali, navi mumbai, ulhasnagar, bhiwandi, nijamapur, vasai - virar, mira - bhayndar, panvel ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Mumbai_GDP_2030_$300_Billion_1724941027842.webp)
• निती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या (Mumbai Metropolitan Region’s -MMR) विकासासाठी एक विकास योजना तयार केली आहे.
• ज्याचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत या प्रदेशाचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP दुप्पट करण्याचे आहे.
• सध्या या प्रदेशाचा GDP १२ लाख कोटी ($१४० अब्ज) आहे आणि २०३० पर्यंत तो २६ लाख कोटी ($३०० अब्ज) पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असेल.
• मुंबई आणि त्याच्या उपग्रह शहरांना जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचे लक्ष्य नियोजन संस्थेने ठेवले आहे.
निती आयोगाने अहवालात राज्य सरकारने लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रांवर प्रकाश टाकला :
• मुंबईला जागतिक सेवा केंद्र म्हणून विकसित करणे
• परवडणारी घरे उपलब्ध करून देणे
• MMR चे जागतिक पर्यटन केंद्रात रूपांतर करणे
• MMR मधील बंदरांचा (Ports)एकात्मिक विकास
• औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब तयार करणे
• जागतिक दर्जाच्या शाश्वत, सर्वसमावेशक पायाभूत सुविधांसह शहरांचा विकास
मुंबई महानगर प्रदेश काय आहे ?
• मुंबई महानगर प्रदेश (MMR) 6,328 चौरस किमीमध्ये पसरलेला आहे.
• यात 9 महानगरपालिका, 9 नगर परिषदा आणि काही गावांचा समावेश आहे.
• 9 महानगरपालिका - बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी- निजामापूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल
• 9 नगर परिषदा - अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग आणि पालघर
• गावे - ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील 1,000 हून अधिक गावे.
• MMR च्या संतुलित विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) जबाबदार आहे.
निती आयोग
NITI Aayog ( National Institute for Transforming India)
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) निती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
( महाराष्ट्र पोलीस भरती - नागपूर, यवतमाळ, नागपूर SRPF 2023...)
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती
3. पंतप्रधान
4. यांपैकी नाही
उत्तर : पंतप्रधान
![[ National Institute for Transforming India, Niti Aayogache adyaksh Pantpradhan, 1 January 2015, Think Tank mhanun stapna, asanvednik anni avedhanik, planning commission]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/NITI_Aayog_1724941067156.webp)
निती आयोग
NITI Aayog
• स्थापना: 1 जानेवारी 2015 रोजी
• मुख्यालय: नवी दिल्ली
• निती आयोग ही संस्था भारत सरकारची थिंक टॅंक (Think -Tank) म्हणून स्थापन झाली.
• प्रमुख कार्य : देशाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणे आणि त्यासाठी धोरणे आखणे.
• निती आयोगाची स्थापना एक असंवैधानिक आणि अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.
• निती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. (नियोजन आयोगाला पर्याय म्हणून दुसरी संस्था)
• निती आयोग केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणात्मक बाबींवर सल्ला देते.
• 1 जानेवारी 2015 पासून नियोजन आयोगाची (Planning commission) जागा निती आयोग या नवीन संस्थेने घेतली.
• अध्यक्ष : पंतप्रधान हे निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्याचे अध्यक्ष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) निती आयोगाचे विस्तारित रूप काय ?
(महाराष्ट्र पोलीस भरती :भंडारा चालक 2021)
1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया
2. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मरमिंग इंडिया
3. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजीनियरिंग
4. यांपैकी नाही
उत्तर : नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मरमिंग इंडिया
प्रश्न) भारताच्या निती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : मुंबई 2018)
1. डॉ. मनमोहन सिंग
2. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया
3. श्री अर्जुन सिंग
4. श्री नरेंद्र मोदी
उत्तर : श्री नरेंद्र मोदी