
चालू घडामोडी 28, ऑगस्ट 2024

प्रधानमंत्री जन धन योजना काय आहे ?
Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY)
Subject : GS - सरकारी योजना
बातम्यांमध्ये : प्रधानमंत्री जन धन योजनेला 10 वर्ष पूर्ण.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रधानमंत्री जन धन योजना कधी सुरू केली ?
1. 28 ऑगस्ट 2013
2. 28 ऑगस्ट 2014
3. 28 ऑगस्ट 2019
4. 28 ऑगस्ट 2024
उत्तर : 28 ऑगस्ट 2014

प्रधानमंत्री जन धन योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
28 ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली.
उद्दिष्ट : बँकिंग/बचत खाती, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेन्शन यासह आर्थिक सेवांमध्ये परवडणाऱ्या दरात लोकांना प्रवेश प्रदान करणे आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे.
जन धन खाते :
• एखादी व्यक्ती या योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये खाते उघडू शकते.
• PMJDY अंतर्गत उघडलेली खाती शून्य शिल्लक (Zero Balance) ठेवून उघडता येतात.
• या योजनेतील खातेदारांना एक RuPay डेबिट कार्ड दिले जाईल जे सर्व एटीएममधून रोख पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते.
जन धन बॅंक खात्याचे महत्व काय आहे ?
जन धन बॅंक खात्यात अनेक सरकारी आर्थिक उपक्रमांचा थेट लाभ हस्तांतरण (DBTs) सुलभ होते.( म्हणजे लाभार्थ्यांच्या जनधन बँक खात्यात सरकारी योजनांमार्फत पैसे जमा केले जातात.)
योजनेसाठी कोण पात्र असेल ?
• अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
• अर्जदाराचे वय १८ ते ५९ वर्षे दरम्यान असावे.
• 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलांनी अर्ज केल्यास, त्यांना त्यांचे PMJDY खाते व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांकडून समर्थन आवश्यक असेल.
स्पर्धा परिक्षेत विचारले जाणारे योजनेतील महत्वाचे मुद्दे:
• झिरो-बॅलन्स खाती : बॅंक खाते शिल्लक आवश्यकता नसताना उघडता येतात.
• RuPay डेबिट कार्ड : अपघात विमा संरक्षणासह विनामूल्य RuPay डेबिट कार्ड प्रदान करते.
• अपघात विमा : 2 लाख रुपयांपर्यंत
(नोट : झिरो-बॅलन्स खाते, डेबिट कार्ड, ॲक्सिडन्ट विमा, ओव्हरड्रफ्ट सुविधा, 5000 पर्यंत लोन -एवढे मुद्दे लक्षात असू द्या)
2015 पासून 2024 पर्यंत ची अपडेट्स :
• मार्च 2015 मधील 72 कोटींवरून ऑगस्ट 2024 पर्यंत 53.13 कोटी खाती वाढली.
• PMJDY खात्यांमधील ठेवी (मार्च 2015) 15,670 कोटी रुपयांवरून 2.31 लाख कोटी (ऑगस्ट 2024) रुपयांपर्यंत वाढल्या.
• सरकारचे उद्दिष्ट : अतिरिक्त 3 कोटी PMJDY खाती आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उघडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
H1N1 म्हणजे काय ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
बातम्यांमध्ये : यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रात H1N1 म्हणजेच स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वाइन फ्लू हा एक ----- चा प्रकार आहे.
1. जीवाणू
2. विषाणू
3. बुरशी
4. यांपैकी नाही
उत्तर : विषाणू

• H1N1 हा इन्फ्लुएंझा A विषाणूचा एक उपप्रकार आहे. ज्याला सामान्यतः स्वाइन फ्लू म्हणून ओळखले जाते.
• हे मानव आणि डुक्कर दोघांनाही संक्रमित करू शकते.
• स्वाइन फ्लू मुळे प्रामुख्याने श्वसनाचे आजार होऊ शकतात.
स्वाइन फ्लूचे संक्रमण कसे होते ?
• जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलतो तेव्हा श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे विषाणू प्रसार होतो.
• दूषित पृष्ठभागांना स्पर्श करून देखील स्वाइन फ्लूचे संक्रमण होऊ शकते.
भारतात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण केव्हा आढळून आला ?
• मे 2009 मध्ये भारतात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण केव्हा आढळून आला.
• 2021, 2022 आणि 2023 मध्ये या विषाणूंच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.
काय आहे लखपती दीदी योजना ?
बातम्यांमध्ये : जळगाव येथील लखपती दीदी संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लखपती दीदी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ?
1. 2014
2. 2019
3. 2023
4. 2024
उत्तर : 2023

लखपती दीदी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती :
• योजनेची सुरूवात : 2023 रोजी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली.
• उद्देश : महिलांना त्यांच्या गावात सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
• या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना बचत गटांमध्ये (SHGs) प्रशिक्षित करणे हा आहे जेणेकरून त्यांना प्रति कुटुंब किमान 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकेल.
• लखपती दीदी योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि संसाधने प्रदान करणे.
• लखपती दीदी योजने अंतर्गत महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे, ड्रोन ऑपरेशन आणि दुरुस्ती आणि शिवणकाम आणि विणकाम यासारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
• प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना त्यांच्या कौशल्याचा वापर करून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
• या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळेल.
• योजनेची अंमलबजावणी : बचत गटांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.
• योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना बचत गटाचे सदस्य असणे बंधनकारक आहे.
• मंत्रालय : ग्रामीण विकास मंत्रालय
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लखपती दीदी योजनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. हि योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली.
2. महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन लखपती बनवणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर