
चालू घडामोडी 3, सप्टेंबर 2024

आसना चक्रीवादळ
Cyclone Asna
Subject : GS - भूगोल - हवामान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच गुजरातमधील कच्छ किनारपट्टीच्या भागात आसना चक्रीवादळ तयार झाले, चक्रीवादळाला आसना हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
1. भारत
2. पाकिस्तान
3. ओमान
4. श्रीलंका
उत्तर : पाकिस्तान

• अलीकडेच, भारतीय हवामान विभाग (IMD) ने अहवाल दिला आहे की गुजरातमधील कच्छ किनारपट्टी आणि पाकिस्तानच्या लगतच्या भागात आसना चक्रीवादळ तयार झाले आहे.
• आसना चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे 26 जणांचा मृत्यू झाला, 18,000 लोकांचे स्थलांतर झाले आणि 1,200 लोकांना पुरापासून वाचवण्यात आले.
• 1891 पासून, अरबी समुद्रात ऑगस्टमध्ये फक्त तीन चक्रीवादळ आले आहेत, 1976 नंतर अरबी समुद्रात ऑगस्टमध्ये आलेले हे पहिले चक्रीवादळ आहे.
• चक्रीवादळ आसना हे नाव पाकिस्तानने दिले आहे, याचा अर्थ " मान्यता किंवा स्तुती करणे " असा होतो.
चक्रीवादळाला नाव का देण्यात येते ?
• सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं त्याचप्रमाणे हवामान तज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण केले जाते.
चक्रीवादळांना नाव कोण देतात ?
• WMO (वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन) ही संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे.
• एखाद्या प्रदेशातील सदस्य देश त्यांच्यातर्फे नावं सुचवतात आणि विशिष्ठ क्रमानं त्याच नावांमधून चक्रीवादळाला नावं दिलं जातं.
• नावे उच्चारायला बऱ्याचदा सोपी असतात, सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित असतात.
चक्रीवादळ म्हणजे काय ? आणि ते कसे तयार होतात ?
• काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिली जातात, त्याच आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात.
• चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (anti-clockwise) फिरतात
• आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने (clockwise) फिरतात.
चक्रीवादळांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते ते पुढीलप्रमाणे :
• हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ (Cyclone) म्हटले जाते.
• वेस्ट इंडिज आणि अटलांटिकमधील वादळाला हरिकेन (Hurricane) नावाने ओळखले जाते
• पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून (Typhoon) या नावाने ओळखले जाते.
• ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते.
(नोट : वरील ठिकाणे आणि चक्रीवादळांना तेथे काय म्हणतात हे लक्षात ठेवा पेपर ला बरोबर जोडी कोणती असे प्रश्न विचारले जातात.)
पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण बंदराची पायाभरणी
Prime Minister Lays Foundation Stone for Vadhvan Port
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच पंतप्रधानांनी वाढवण बंदराची पायाभरणी केली, तर हे बंदर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. रत्नागिरी
2. रायगड
3. मुंबई शहर
4. पालघर
उत्तर : पालघर

• नुकतेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सागरमाला कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराची पायाभरणी केली.
• हे बंदर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जाईल.
• हे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड संयुक्तपणे तयार करतील
• या प्रकल्पात जवाहरलाल नेहरू बंदराची 74 % भागीदारी असेल आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची 26 % भागीदारी असेल.
• जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) बंदराच्या बांधकामासाठी जबाबदार आहे.
• बंदराच्या बांधकामानंतर, हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल.
• तसेच ते विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर, तिरुवनंतपुरम नंतर भारतातील सर्वात खोल सागरी बंदरांपैकी एक असेल.
वाढवण बंदरामुळे काय फायदा होईल ?
• या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार असून 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार आहे.
• वाढवण बंदराच्या उभारणीमुळे देशाच्या विकासाला नवी चालना मिळणार
• आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांशी थेट कनेक्टिव्हिटी असल्याने पारगमन वेळा आणि खर्च कमी होईल.
• नवीन व्यवसाय आणि वेअरहाउसिंगसाठी संधी उपलब्ध होतील.
" हर घर दुर्गा " अभियान
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेले हर घर दुर्गा अभियान कशाच्या संदर्भात आहे ?
1. महिला स्वयंरोजगार
2. बचतगट कुटीर उद्योग
3. विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण
4. यांपैकी नाही
उत्तर : विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण

• हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये (ITI's) विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे.
• ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात असे प्रतिपादन आहे.
• शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी 2 तासिका घेण्यात येणार आहे.
• हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार अहे.
• उद्देश : महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी, या उद्देशाने ‘घर घर दुर्गा अभियान’ सुरु करण्यात आले आहे.
हर घर दुर्गा अभियानाचे महत्व काय आहे ?
• हर घर दुर्गा अभियानाद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांमध्ये निर्माण होईल.
• त्याचप्रमाणे या अभियानाद्वारे मुलींचे शारीरिक बळ वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल सोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ सुद्धा सुधारेल.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024
Ramon Magsaysay Award 2024
बातम्यांमध्ये : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायाओ मियाझाकी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) हायाओ मियाझाकी यांना 2024 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
1. ॲनिमेटेड चित्रपट
2. पत्रकारिता
3. खेळ
4. यांपैकी नाही
उत्तर : ॲनिमेटेड चित्रपट

हायाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) बद्दल थोडक्यात माहिती :
• हायाओ मियाझाकी , एक प्रसिद्ध जपानी चित्रपट निर्माता आणि स्टुडिओ Ghibli चे सह-संस्थापक आहे.
• ॲनिमेटेड चित्रपटांमधील योगदानासाठी त्यांना 2024 चा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• पर्यावरण संवर्धन आणि सुसंवाद यांसारख्या आव्हानात्मक विषयांना संबोधित करणारे असंख्य ॲनिमेटेड चित्रपट त्यांनी तयार केले.
रॅमन मॅगसेसे पुरस्कारा बद्दल महत्त्वाची माहिती :
• रॅमन मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो.
• फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जातो.
• फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
• रॅमन मॅगसेसे पुरस्काराला आशियाचा नोबेल म्हणून ओळखलं जातं.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोण - कोणत्या क्षेत्रांमध्ये देण्यात येतो ?
• सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय कोण आहेत ?
1. महात्मा गांधी
2. आचार्य विनोबा भावे
3. मदर तेरेसा
4. जयप्रकाश नारायण
उत्तर : आचार्य विनोबा भावे
आचार्य विनोबा भावे यांना 1958 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.