
चालू घडामोडी 31, ऑगस्ट 2024

राजकोट किल्ला
बातम्यांमध्ये : किल्ले राजकोट येथे भारतीय नौदलामार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे.
Subject : GS - इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राजकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. पुणे
2. सिंधुदुर्ग
3. रत्नागिरी
4. ठाणे
उत्तर : सिंधुदुर्ग

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथे भारतीय नौदलामार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे.
• भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली.
• ही समिती किल्ले राजकोट, जि. सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी कारणीमीमांसा शोधणे आणि या दुर्घटनेमागील दोषी निश्चित करणे याबाबींवर विचार करुन शिफारशी सादर करेल.
राजकोट किल्ला :
• राजकोट किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे.
• राजकोट किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली.
• छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले.
• राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले.
• परकीय वसाहती करणाऱ्यांच्या म्हणजेच इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणे हा देखील राजकोट किल्ला उभारण्यामागचा उद्देश होता.
• राजकोट किल्ला, सर्जेकोट किल्ल्याप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपकिल्ला मानला जातो.
कातळशिल्पं म्हणजे काय ?
What are Geoglyphs ?
Subject : GS - इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच महाराष्ट्र सरकारने " संरक्षित स्मारक " म्हणून घोषित केलेले कातळ शिल्प कोठे सापडले आहेत ?
1. रत्नागिरी
2. पुणे
3. नाशिक
4. नागपूर
उत्तर : रत्नागिरी

• अलीकडेच महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील 210-चौरस किलोमीटर परिसरात 70 ठिकाणी पसरलेल्या 1,500 कातळ शिल्पांना " संरक्षित स्मारक " म्हणून घोषित केले आहे.
• कोकणात विखुरलेल्या कातळशिल्पांचा कालखंड हा अश्मयुगीन काळापर्यंत मागे जातो.
• कोकणात उघडकीस आलेल्या या कातळशिल्पांचा प्रवास मध्याश्मयुगापासून (२०,००० ते १०,०००) ते प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडापर्यंत झाल्याचे दिसते.
कातळशिल्पं म्हणजे काय ?
• कातळशिल्पं म्हणजे खडकांच्या पृष्ठभागावर कोरलेली चित्रं. त्यांना खोदशिल्पं आणि इंग्रजीत 'पेट्रोग्लिफ्स' किंवा 'जिओग्लिफ्स' असंही म्हटलं जातं.
• या आकृत्या प्रचंड मोठ्या असतात किंवा लहान प्रतिमांच्या साहाय्याने मोठी प्रतिमा तयार केलेली असते.
• कातळशिल्पं सहसा चार मीटरपेक्षा जास्त लांब असतो.
• कातळशिल्पं जमिनीवर पाहणे किंवा ओळखणे कठीण आहे परंतु आकाशातून ते सहज दिसतात.
• पुरातत्वशास्त्राला गवसलेला हा एक मोठा खजिना आहे.
• या प्रतिमांमध्ये निसर्गात आढळणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने चा शासन निर्णय प्रसिद्ध
बातम्यांमध्ये : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते, त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पैकी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने बद्दल चुकीचे विधान कोणते ?
1. ही योजना 50 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा योजना आहे.
2. या योजनेअंतर्गत 139 धार्मिक स्थळे येतात.
3. या योजनेअंतर्गत प्रवास, निवास आणि भोजन खर्चासाठी 30 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
4. वरील पैकी सर्व बरोबर
उत्तर : ही योजना 50 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा योजना आहे. हे चुकीचे विधान आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना :
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत 139 स्थळे येतात.
योजनेसाठी पात्रता :
• ही योजना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा योजनेची तरतूद करते.
• योजनेसाठी पात्र व्यक्तींची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपर्यंत असावी.
• पात्र व्यक्तींना प्रवास, निवास आणि भोजन खर्चासाठी 30,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
• मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 139 धार्मिक स्थळे येतात.
• यात देशभरातील 73 स्थळे तर महाराष्ट्रातील 66 स्थळे आहेत.
• काही प्रमुख तीर्थक्षेत्र पुढीलप्रमाणे :
• वैष्णोदेवी मंदिर
• अमरनाथ लेणी
• सुवर्ण मंदिर (अमृतसर)
• चारधाम यात्रा
• राम मंदिर (अयोध्या)
• सोमनाथ मंदिर (द्वारका)
• जगन्नाथ पुरी (ओडिशा))
• महाराष्ट्रातील प्रमुख स्थळे :
त्यात सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, विपश्यना पगोडा, एक सभास्थान, माउंट मेरी चर्च (वांद्रे), सेंट अँड्र्यूज चर्च नाशिक मधील जैन मंदिर, दीक्षाभूमी (नागपूर) यांचाही समावेश आहे.
• त्याचबरोबर तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक मधील धार्मिक स्थळांचा आणि लक्षणीय बौद्ध आणि जैन स्थळांचा देखील समावेश या योजनेत आहे.