
चालू घडामोडी 2, सप्टेंबर 2024

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण
बातम्यांमध्ये : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण केले.
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले तर नव्याने अनावरण केलेल्या या ध्वजात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश आहे ?
1. भारताचे संविधान
2. अशोक चक्र
3. सर्वोच्च न्यायालयाची इमारत
4. वरील सर्व
उत्तर : वरील सर्व

नवीन ध्वज आणि बोधचिन्हा बाबत महत्त्वाची माहिती :
• नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी न्याय आणि लोकशाहीचे प्रतीक असलेला हा नवा ध्वज आणि बोधचिन्हाची कल्पना सादर केली आहे.
• या नवीन ध्वजात अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि संविधानाचे पुस्तक दाखविण्यात आले आहे.
• सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज निळ्या रंगाचा आहे.
• त्यावर " भारताचे सर्वोच्च न्यायालय ( Supreme Court of India ) " आणि देवनागरी लिपीत " यतो धर्मस्ततो जयः " असे लिहिलेले आहे.
• " यतो धर्मस्ततो जयः " हा संस्कृत श्लोक महाभारतातून घेतला आहे. या श्लोकाचा अर्थ " जिथे धर्म आहे तेथे विजय आहे " असा होतो.
• अशोक चक्र हे धर्मचक्र किंवा "कायद्याचे चाक" दर्शवते. हे चिन्ह सारनाथ येथील सिंहाच्या प्रतिकृतीपासून प्रेरित आहे, जे इ.स.पू. तिसऱ्या शतकातील मौर्य सम्राट अशोकांनी तयार केले होते.
सर्वोच्च न्यायालय :
• भारत सरकार कायदा 1935 नुसार भारताच्या फेडरल कोर्टाची निर्मिती करण्यात आली.
• पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1935 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ची जागा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने घेतली.
• राज्यघटनेच्या कलम १२४ मध्ये असे म्हटले आहे की "भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल."
• भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना २८ जानेवारी १९५० रोजी झाली.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ?
उत्तर : श्री धनंजय चंद्रचूड
प्रश्न) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती आहे ?
उत्तर : 34 आहे.
(1 सरन्यायाधीश + 33 न्यायाधीश = 34)
पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये रुबीना फ्रान्सिस यांना कांस्यपदक मिळाले
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रुबिना फ्रान्सिसने कांस्यपदक जिंकले आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1. उंच उडी
2. तिरंदाजी
3. नेमबाजी
4. बॅडमिंटन
उत्तर : नेमबाजी

• पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पॅरा नेमबाज रुबिना फ्रान्सिसने नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
• तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे.
• रुबिना ही मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे.
• रुबिना फ्रान्सिस आपल्या पायावर नीट उभी राहू शकत नाही पण तिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवले आहे.
ग्लोबल फिनटेक महोत्सव 2024
Global Fintech Fest 2024
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ग्लोबल फिनटेक महोत्सव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते ?
1. मुंबई
2. पुणे
3. दिल्ली
4. चेन्नई
उत्तर : मुंबई

बातम्यांमध्ये : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 ला संबोधित केले.
• पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे ग्लोबल फिनटेक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
• फिनटेकमधील भारताच्या प्रगतीचे प्रदर्शन करणे आणि क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणणे हे ग्लोबल फिनटेक महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
फिनटेक (Fintech) म्हणजे काय ?
• Fintech हा दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. Finance आणि Technology म्हणजेच आर्थिक तंत्रज्ञान किंवा वित्तीय तंत्रज्ञान
• फिनटेक म्हणजे आर्थिक सेवा प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक सेवा अधिक कार्यक्षम, प्रवेशयोग्य आणि ग्राहकांना सोपी, सुटसुटीत आणि सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यात येते.
उदाहरणार्थ : मोबाईल बॅंकिंग -
• मोबाइल बँकिंग ग्राहकांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसेस, जसे की स्मार्टफोन आणि टॅब्लेट वापरून बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते.
• हे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासण्याची, पेमेंट करण्याची, बिले भरण्याची आणि त्यांच्या मोबाइल डिव्हाइसच्या सोयीनुसार कर्जासाठी अर्ज करण्याची क्षमता प्रदान करते.
• मोबाईल बँकिंगने ग्राहकांसाठी बँकिंग अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवले आहे आणि यामुळे पारंपारिक बँकिंग सेवांशी संबंधित खर्च देखील कमी झाला आहे.
जागतिक नारळ दिन 2024
(World Coconut Day 2024)
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक नारळ दिन केव्हा साजरी करतात ?
1. 4 जून
2. 12 ऑगस्ट
3. 2 सप्टेंबर
4. 20 ऑक्टोंबर
उत्तर : 2 सप्टेंबर

• जागतिक नारळ दिन, दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
• हा दिवस आपल्या जीवनात नारळाच्या झाडाचे महत्त्व सांगतो आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देतो.
जागतिक नारळ दिन का साजरी करतात ?
नारळाच्या विविध उपयोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या जागतिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरी करतात.
पहिला जागतिक नारळ दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
आशियाई आणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ने 2 सप्टेंबर 2009 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला.
जागतिक नारळ दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
' चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी नारळ : जास्तीत जास्त मूल्यासाठी भागीदारी निर्माण करणे .'
“ Coconut for a Circular Economy: Building Partnership for Maximum Value. ”
तुम्हाला हे माहित आहे का ?
• इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे, त्यानंतर फिलिपाइन्सचा क्रमांक लागतो.
• भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे.
• भारतात केरळ हे सर्वात मोठे नारळ उत्पादक राज्य आहे, त्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडू हे राज्य आहे.
नारळाचे महत्त्व :
• नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो म्हणून नारळाच्या झाडाला कल्पतरू सुद्धा म्हणतात.
• आर्थिक फायदे : लाखो शेतकऱ्यांसाठी, विशेषत: उष्णकटिबंधीय प्रदेशातील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून नारळाची भूमिका महत्त्वाची आहे.
• आरोग्यासाठी उपयुक्त : नारळ आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. नारळात प्रथिने आणि खनिजांव्यतिरिक्त सर्व पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
• सांस्कृतिक महत्त्व : विविध परंपरा, विधी आणि सणांमध्ये नारळाचे सांस्कृतिक महत्त्व दिसून येते.
• पर्यावरणीय फायदे : मातीची धूप रोखण्यासाठी आणि मातीची सुपीकता राखण्यासाठी, पर्यावरणीय टिकाव धरण्यात नारळाचे झाड महत्त्वाचे आहे.