
चालू घडामोडी 10, सप्टेंबर 2024

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य
Tungareshwar Wildlife Sanctuary
बातम्यांमध्ये : राज्य वन्यजीव मंडळाने तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वन जमिनीवर वसलेले आश्रम नियमित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Subject : GS- पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. पालघर
2. पुणे
3. नाशिक
4. रत्नागिरी
उत्तर : पालघर

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याबद्दल थोडक्यात माहिती :
• तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याला तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते.
• तुंगारेश्वरला 2003 मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले.
• तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य पालघर जिल्ह्यातील वसई आणि विरारच्या पूर्वेला एका पठारावर स्थित आहे .
• तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा वन्यजीव अभयारण्य दरम्यान एक कॉरिडॉर बनवते.
• हे अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे. वनस्पतींच्या सुमारे 600 प्रजाती, पक्ष्यांच्या 250 हून अधिक प्रजाती, फुलपाखरांच्या 150 प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 36 प्रजातींची नोंद या अभयारण्यात झाली आहे.
अभयारण्य म्हणजे काय ?
• जैविक जातींसाठी राखीव असणाऱ्या क्षेत्रास अभयारण्य म्हणतात.
• अभयारण्य म्हणजे असे क्षेत्र जे केवळ प्राण्यांच्या संवर्धनासाठी राखीव आहे मात्र येथे प्राण्यांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही इतक्या स्तरापर्यंत लाकूडतोड, मध गोळा करणे यांसारख्या कामांना संमती दिली जाते.
• उदाहरणार्थ : पक्षी, वाघ , सिंह इत्यादींसाठी अभयारण्य राखीव असतात.
आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव 2024
International Solar Festival 2024
बातम्यांमध्ये : इंटरनॅशनल सोलर अलायन्स द्वारे पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
Subject : GS- पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले ?
1. नवी दिल्ली
2. मुंबई
3. चेन्नई
4. बंगळूर
उत्तर : नवी दिल्ली

• इंटरनॅशनल सोलर अलायन्स द्वारे पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले.
• उद्दिष्ट : इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या सदस्य देशांमध्ये सौरऊर्जेच्या परिवर्तनीय शक्तीवर प्रकाश टाकणे हे आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA- इंटरनॅशनल सोलर अलायन्स) बद्दल महत्त्वाची माहिती :
• सौरऊर्जा सोल्यूशन्सच्या उपयोजनाद्वारे हवामान बदलाविरूद्ध प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी भारत आणि फ्रान्सने संयुक्त प्रयत्न म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्सची कल्पना मांडली होती.
• स्थापना : आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन वरील पक्षांच्या 21 व्या परिषदेदरम्यान करण्यात आली.
• मुख्यालय : इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुरुग्राम (हरियाणा) येथे आहे.
• उद्देश : जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या आघाडीचा उद्देश आहे.
• ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याच्या सदस्य देशांमध्ये ऊर्जा संक्रमणास प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्स सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रचार करते.
निलगिरी माउंटेन रेल्वे
Nilgiri Mountain Railway
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) निलगिरी माउंटन रेल्वेला UNESCO चा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता केव्हा मिळाली ?
1. 2000
2. 2002
3. 2005
4. 2014
उत्तर : 2005

• निलगिरी माउंटन रेल्वे (Nilgiri Mountain Railway), ज्याला स्थानिक लोक ऊटी टॉय ट्रेन (Ooty Toy Train) म्हणतात.
• ही मीटर गेज रेल्वे आहे.
• ही रेल्वे दक्षिण रेल्वेद्वारे चालविली जाते आणि भारतातील एकमेव रॅक रेल्वे आहे.
• रेल्वे आपल्या वाफेच्या इंजिनच्या ताफ्यावर अवलंबून असते.
• 1854 मध्ये मेट्टुपलायम ते निलगिरी हिल्सपर्यंत पर्वतीय रेल्वे (Nilgiri Mountain Railway) बांधण्याची योजना आखण्यात आली.
• ही रेल्वे लाईन जून १८९९ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
• मद्रास रेल्वेने सरकारशी केलेल्या करारानुसार ती प्रथम चालवली गेली.
• दक्षिण भारतीय रेल्वे कंपनीने नंतर ती विकत घेतली.
• 2005 मध्ये, निलगिरी माउंटन रेल्वेला UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली.
भारताच्या माउंटन रेल्वेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
भारताच्या माउंटन रेल्वेमध्ये तीन रेल्वे आहेत:
1. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
2. निलगिरी माउंटन रेल्वे
3. कालका - शिमला रेल्वे