
चालू घडामोडी 5, सप्टेंबर 2024

शिक्षक दिन
Teachers Day
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरी केला जातो ?
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. सरदार वल्लभभाई पटेल
4. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
उत्तर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतात शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, एक विख्यात विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांबद्दल थोडक्यात माहिती :
• जन्म : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला.
• डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, एक विख्यात विद्वान, तत्त्वज्ञ आणि उत्कृष्ट शिक्षक होते.
• डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांनी १९५२ ते १९६२ पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले.
• १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केले.
• त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
• १९५४ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न ’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन साजरी करण्यामागील गोष्ट काय आहे ?
• जेव्हा डॉ. राधाकृष्णन यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले तेव्हा शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी विनंती केली तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
• डॉ. राधाकृष्णन यांच्या सूचनेनुसार 5 सप्टेंबर 1962 रोजी भारतात पहिला अधिकृत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिन 2024 ची संकल्पना (थीम ) काय आहे ?
"शाश्वत भविष्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण" ही 2024 शिक्षक दिनाची थीम आहे.
“Empowering Educators for a Sustainable Future.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई दौरा
PM’S Visit To BRUNEI
बातम्यांमध्ये : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 3 ते 4 सप्टेंबर 2024 या काळात ब्रुनेई दारूसलामचा अधिकृत दौरा केला.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ब्रुनेई देशाला भेट दिली. ब्रुनेई देश कोणत्या खंडात येतो ?
1. आशिया
2. आफ्रिका
3. युरोप
4. दक्षिण अमेरिका
उत्तर : आशिया

ब्रुनेई दारूसलाम देशाबद्दल थोडक्यात माहिती :
स्थान : ब्रुनेई दारूसलाम हे आग्नेय आशियातील बोर्नियो बेटाच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर स्थित देश आहे.
राजधानी : बंदर सेरी बेगवान ही ब्रुनेई देशाची राजधानी आहे.
भारतासाठी ब्रुनेई दारुसलामचे महत्त्व :
• धोरणात्मक महत्त्व : भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनमधील ब्रुनेई महत्त्वाचा भागीदार आहे.
• ब्रुनेईही ASEAN सदस्य आहे.
• भारतीय डायस्पोरा : ब्रुनेईमध्ये अंदाजे 14,000 भारतीय राहतात.
• ऊर्जा सुरक्षा : भारत ब्रुनेईमधून कच्च्या तेलाची आयात करतो.
वरूण नौदल युद्ध अभ्यास
Exercise Varuna
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वरूण युद्ध अभ्यास हा भारत आणि ----- देशांमधील नौदल युद्ध अभ्यास आहे ?
1. इंडोनेशिया
2. फ्रान्स
3. युनायटेड किंग्डम
4. बांगलादेश
उत्तर : फ्रान्स

• वरूण युद्ध अभ्यास भाग घेण्यासाठी भारतीय नौदलाचे P-8I विमान फ्रान्समधील उतरले आहे.
• 2024 चा हा भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यास भूमध्य समुद्रात होणार आहे.
वरुण युद्ध अभ्यासाबद्दल महत्त्वाची माहिती :
• भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा द्विपक्षीय नौदल सराव आहे.
• 1993 मध्ये दोन्ही नौदलांमधील हा द्विपक्षीय सराव सुरू झाला होता.
• 2001 मध्ये याला 'वरुणा' असे नाव देण्यात आले आणि ते भारत फ्रान्सच्या धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ट्य बनले आहे.
पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये योगेश कथुनिया यांना रौप्यपदक मिळाले
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1. थाळीफेक
2. तिरंदाजी
3. नेमबाजी
4. बॅडमिंटन
उत्तर : थाळीफेक

• डिस्कस थ्रो म्हणजे थाळीफेक स्पर्धेत F56 प्रकारात योगेश कथुनिया यांनी रौप्यपदक पटकावलं.
• त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 42.22 मीटर अंतरावर थाळीफेक केली.
• 9 वर्षांचा असताना योगेशला गियान- बारे सिंड्रोम (Guillain-Barre syndrome) नामक दुर्धर ऑटोइम्युन आजारानं ग्रासलं.
• या आजारात स्नायू कमजोर होत जातात आणि त्यातून पुढे पॅरालिसिसही होऊ शकतो.
• योगेश कथुनिया हे हरियाणाचे रहिवासी आहे.