
चालू घडामोडी 9, सप्टेंबर 2024

चंडीपूरा व्हायरस
CHANDIPURA VIRUS
बातम्यांमध्ये : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (GBRC) ने चंडीपूरा व्हेसिक्युलोव्हायरस (CHPV) चे जीनोम मॅपिंग प्रकाशित केले आहे.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारा चंडीपूरा विषाणू सर्व प्रथम खालील पैकी कोणत्या भागात आढळून आला ?
1. मुंबई
2. नागपूर
3. पुणे
4. सातारा
उत्तर : नागपूर

• महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंडीपूरा हा मेंदूज्वर आहे.
• सर्वात आधी 1965 मध्ये तो नागपूर परिसरातील चंदीपूर या भागात रुग्णांच्या रक्तजल नमुने सर्वेक्षणात आढळून आला. त्यावरुन त्याचे नाव चंडीपूरा ठेवण्यात आलेले आहे.
• चंडीपूरा विषाणूला चांदीपुरा असेही म्हणतात.
रोगप्रसाराचे माध्यम काय आहे ?
• हा आजार दुषित सॅन्डफ्लाय मादी माशीच्या चावल्यामुळे होतो.
• फक्त मादी सॅन्डफ्लाय माशीला अंडीच्या पोषणाकरीता रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे तिने चावा घेतल्याने विषाणूचा प्रसार होतो.
• सॅन्डफ्लाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. माशीचा आकार १.५ ते २.५ मिलीमिटर असतो.
• सॅन्डफ्लाय या माश्या राञीच्या वेळी जास्त क्रियाशील असतात व त्यांचा चावा अत्यंत वेदनादायक असतो. त्या क्वचितच दृष्टीपथास पडतात. दिवसा सॅन्डफ्लाय माश्या घरातील अंधा-या जागा, भिंतीमधील भेगा व खड्डे यामध्ये राहतात.
चंडीपूरा आजार कोठे आढळतो ?
• हा आजार १४ वर्षाखालील मुलांमध्ये विशेष करुन आढळून येतो.
• हा आजार मुख्यतः ग्रामीण व आदिवासी भागात आढळतो.
• सदयस्थितीस शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्णांचे प्रमाण आढळून येत आहे.
रोगाची लक्षणे काय आहे ?
• तीव्र डोकेदुखी, उलटी, झटके येणे, अर्धबेशुध्दावस्था अशी लक्षणे आढळतात.
• या आजारामध्ये रोगाची लक्षणे अचानक सुरु होतात.
आजारा वरील औषधोपचार काय आहे ?
या आजारावर निश्चित असा उपचार नाही. परंतु रुग्णाच्या लक्षणानुसार वेळेत केलेला उपचार महत्त्वाचा ठरतो.
प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना काय करु शकतो ?
या आजाराची सॅन्डफ्लाय (Sandflies) माशी ही वाहक आहे व ती उत्पत्ती स्थानापासून फार दूर जाऊ शकत नाही. खालीलप्रमाणे सॅन्डफलाय माशीचे नियंत्रण करता येते-
• किटकनाशकाची फवारणी घरामध्ये, गोठयामध्ये व इतर अंधार असलेल्या जागेवर करावी.
• राहत्या घराच्या परिसरातील झाडे - झुडपे, खड्ड्यांची स्वच्छता करावी.
• घरातील भिंतीच्या भेगा बुजविणे तसेच पाळीव प्राण्यांचा गोठा व कोंबडयांची खुराडे राहत्या घरापासून दूर ठेवावी.
• शेणखताचे ढिगारे गावापासून दूर ठेवावे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2024 | International Literacy Day 2024
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरी केला जातो ?
1. 4 सप्टेंबर
2. 8 सप्टेंबर
3. 14 सप्टेंबर
4. 2 ऑक्टोंबर
उत्तर : 8 सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरी केला जातो ?
• व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं शिक्षण तसेच साक्षरतेचे महत्त्व काय आहे ते स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
• शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव लोकांना व्हावी आणि शिक्षणाबद्दल जागरुकता वाढावी, हा साक्षरता दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे.
• देशातील साक्षरतेचे प्रमाण अथवा साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो.
• आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे 1966 मध्ये घोषित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
“ बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन : परस्पर सामंजस्य आणि शांततेसाठी साक्षरता ” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे.
" Promoting Multilingual Education: Literacy for Mutual Understanding and Peace ".
स्वच्छ वायु सर्वेक्षण पुरस्कार 2024
Swachh Vayu Survekshan Award 2024
बातम्यांमध्ये : अलीकडेच, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी जयपूर येथे 2024 चे स्वच्छ वायु सर्वेक्षण पुरस्कार प्रदान केला.
Subject : GS - पर्यावरण, पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वच्छ वायु सर्वेक्षण पुरस्कार खालील पैकी कोणत्या शहराला देण्यात आला ?
1. मुंबई
2. भोपाळ
3. सुरत
4. रांची
उत्तर : सुरत

• सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छ वायु अभियान (NCAP) शहरांना लोकसंख्येवर आधारित स्वच्छ वायु सर्वेक्षण पुरस्कार देण्यात येतो.
• स्वच्छ वायु सर्वेक्षण पुरस्कार, 2024, लोकसंख्येवर आधारित तीन श्रेणींमधील विजयी शहरे पुढीलप्रमाणे :
1. श्रेणी-1 (लोकसंख्या 10 लाखांहून अधिक): सुरत, जबलपूर आणि आग्रा.
2. श्रेणी-2 (3-10 लाख लोकसंख्या): फिरोजाबाद, अमरावती आणि झाशी.
3. श्रेणी-३(३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या): रायबरेली, नलगोंडा आणि नालागड.
स्वच्छ वायु सर्वेक्षण काय आहे ?
• स्वच्छ वायु सर्वेक्षण हा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचा (MoEFCC) उपक्रम आहे.
• 131 गैर-प्राप्ती शहरांमध्ये शहर कृती आराखडा (NCAP) अंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणी आणि हवेच्या गुणवत्तेच्या आधारावर शहरांची क्रमवारी या उपक्रमद्वारे लावली जाते.
गैर-प्राप्ती शहर म्हणजे नेमकं काय ?
जर शहरे 5 वर्षांच्या कालावधीत हवेतील तरंगते कण - पर्टिक्युलेट मॅटर 10 (PM 10) किंवा NO2 साठी राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानके (NAAQS) ची पूर्तता करत नसतील तर त्यांना गैर-प्राप्ती शहर घोषित केले जाते.