
चालू घडामोडी 11, सप्टेंबर 2024

आशियाई किंग गिधाड
Asian King Vultures
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आशियायी किॅग गिधडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे ?
1. महाराष्ट्र
2. मध्य प्रदेश
3. उत्तर प्रदेश
4. बिहार
उत्तर : उत्तर प्रदेश
बातम्यांमध्ये : अलीकडेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन केले.

• उत्तर प्रदेश वन विभागाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने महाराजगंजमध्ये (उत्तर प्रदेश) जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्राची स्थापना केली आहे.
• 2.8 कोटी रुपये खर्चून बांधलेले, जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र गोरखपूर वन विभागात 1.5 हेक्टर जागेवर पसरलेले आहे.
• या गिधाडांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची सतत काळजी घेण्यासाठी या केंद्रात उच्च तंत्रज्ञानाची उपकरणे आहेत.
• येथे २४ तास गिधाडांवर नजर ठेवली जाते.
• या जटायू केंद्राचे उद्दिष्ट पुढील 8 ते 10 वर्षांत केंद्रातून गिधाडांच्या 40 जोड्या जंगलात सोडण्याचे आहे.
आशियाई किंग गिधाड बद्दल महत्त्वाची माहिती :
• भारतात आढळणाऱ्या गिधाडांच्या ९ प्रजातींपैकी ही एक प्रजाती आहे.
• आशियाई किंग गिधाड याला लाल डोके असलेले गिधाड देखील म्हणतात
• हे गिधाड पूर्वी भारतात मोठ्या प्रमाणावर आढळून आले परंतु डायक्लोफेनाक विषबाधानंतर त्यांची संख्या खूपच कमी झाली.
• पाळीव प्राण्यांमध्ये डायक्लोफेनाक (Diclofenac), या दाहविरोधी औषधाचा अतिरेकी वापर केला गेला, हे पाळीव प्राणी मेल्यांनंतर गिधाडांनी खाल्ले त्यामुळे या विषारी औषधांमुळे गिधाडांना विषबाधा झाली.
• आशियाई किंग गिधाडांचा 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत (IUCN Red List) गंभीरपणे धोक्यात (Critically Endangered) या श्रेणींमध्ये नोंद करण्यात आली आहे.
• आशियाई किंग गिधाडांची वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मध्ये अनुसूची १ मध्ये नोंद आहे.
पॅरिस पॅरालिंपिक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
बातम्यांमध्ये : पॅरिस पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांमधल्या पदकविजेत्या भारतीय खेळाडूंना क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पारितोषिक वितरण करण्यात आलं.
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिंपिक 2024 क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?
1. 7 पदके
2. 9 पदके
3. 18 पदके
4. 29 पदके
उत्तर : 29 पदके

• पॅरिसमध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 29 पदकं भारताने जिंकली. पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
• पॅरिस पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांमधल्या पदकविजेत्या भारतीय खेळाडूंना क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पारितोषिक वितरण करण्यात आलं.
त्यांना मिळालेली पारितोषिक पुढीलप्रमाणे :
• सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये
• रौप्य पदक विजेत्याला ५० लाख रुपये
• कांस्यपदक विजेत्याला ३० लाख रुपये
• मिश्र सांघिक स्पर्धांमधल्या पदक विजेत्या खेळाडूंना 22.5 लाख (साडेबावीस लाख) रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिंपिक 2024 क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली ?
उत्तर : चीन (220 पदके)
प्रश्न) पॅरिस पॅरालिंपिक 2024 क्रीडा स्पर्धांमध्ये भारत 29 पदके जिंकून पदतालिकेत कितव्या स्थानावर आहे ?
उत्तर : 18 व्या क्रमांकावर
प्रश्न) पॅरिस पॅरालिंपिक 2024 क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदके जिंकणारे पहिले तीन देश कोणते ?
उत्तर :
1. चीन - 220 पदके
2. ग्रेट ब्रिटन - 124 पदके
3. अमेरिका - 105 पदके
अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम 2024
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे ?
(महाराष्ट्र पोलीस - पुणे SRPF भरती मध्ये 2023 तसेच ठाणे भरती मध्ये 2021 चे विजेते विचारले होते)
1. सेरेना विल्यम्स
2. आर्यना सबालेन्का
3. जेसिका पेगुला
4. एम्मा राडूकानू
उत्तर : आर्यना सबालेन्का
2024 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे
• विजेती : आर्यना सबालेन्का ( देश - बेलारूस)
• उपविजेता : जेसिका पेगुला

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या आर्यना सबालेन्का हिने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ७-५, ७-५ असा पराभव केला.
अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम बद्दल थोडक्यात माहिती :
• ही वर्षातील चौथी आणि अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे.
• ही स्पर्धा प्रथम 1881 मध्ये आयोजित करण्यात आले होती.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 सालच्या अमेरिकन ओपन पुरूष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता कोण आहे ?
1. राफेल नदाल
2. नोव्हाक जोकोविच
3. टेलर फ्रिट्झ
4. जॅनिक सिनर
उत्तर : जॅनिक सिनर
2024 अमेरिकन ओपन पुरूष एकेरी टेनिस स्पर्धेचे
• विजेता : जॅनिक सिनर ( देश - इटली)
• उपविजेता : टेलर फ्रिट्झ
जागतिक क्रमवारी प्रथम स्थानावर असलेल्या जॅनिक सिनर हा अमेरिकन ओपन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष टेनिसपटू खेळाडू ठरला आहे.
(नोट : नोव्हाक जोकोविच याने 4 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदक जिंकले.)
त्याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇