
चालू घडामोडी 24, सप्टेंबर 2024

क्वाड कॅन्सर मूनशॉट इनिशिएटिव्ह काय आहे ?
Quad Cancer Moonshot Initiative
बातम्यांमध्ये : अलीकडेच क्वाड देशांनी कर्करोगाशी सामना करण्यासाठी क्वाड कॅन्सर मूनशॉट इनिशिएटिव्ह नावाचा एक प्रोग्राम सुरु केला आहे.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच कर्करोगाशी सामना करण्यासाठी क्वाड कॅन्सर मूनशॉट इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला. हा उपक्रम खालील पैकी कोणत्या देशांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला ?
1. भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
2. भारत, संयुक्त अमेरिका, चीन आणि फ्रान्स
3. भारत, रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया
4. भारत, रशिया, जपान आणि चीन
उत्तर : भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया

अलीकडेच क्वाड देशांनी कर्करोगाशी सामना करण्यासाठी क्वाड कॅन्सर मूनशॉट इनिशिएटिव्ह नावाचा एक प्रोग्राम सुरु केला आहे.
• उद्दिष्ट : कर्करोगाचे निदान करणे, त्यावर उपचार करणे आणि कर्करोगाचा रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम कमी करणे यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे राबविणे हे क्वाड कॅन्सर मूनशॉट प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या उपक्रमात आपले निवेदन दिले ते पुढीलप्रमाणे :
• भारत आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी तत्पर आहे. कर्करोग उपचारासंबंधी काम करत असणारे भारतातले अनेक तज्ञ या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत.
• ‘एक वसुंधरा एक आरोग्य, हा भारताचा दृष्टिकोन आहे. याच भावनेतून आपण क्वाड मूनशॉट उपक्रमाच्या अंतर्गत 75 लाख डॉलरच्या नमुना उपकरणे तपास उपकरणे आणि लस यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याची घोषणा करीत आहोत. रेडिओ थेरपी उपचार आणि क्षमता बांधणीतही भारत आपले सहकार्य करेल.
क्वाड ( Quad) म्हणजे नेमकं काय ?
• क्वाड ला 'क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' असेही म्हणतात.
• क्वाड हे चार देशांचा समावेश असलेला एक धोरणात्मक मंच आहे.
• क्वाड मध्ये भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश आहे.
• २००७ मध्ये, तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या युतीला क्वाड संघटना असे नाव दिले.
• उद्दिष्ट्ये : क्वाड चे प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा, हवामान बदलाच्या जोखमींना तोंड देणे, प्रदेशात गुंतवणुकीसाठी परिसंस्था (इकोसिस्टम) तयार करणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे यांचा समावेश आहे.
कूडिअट्टम
Koodiyattom
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कूडिअट्टम नाट्य प्रकार खालील पैकी कोणत्या राज्यातील पारंपरिक नाट्य प्रकार आहे ?
1. कर्नाटक
2. केरळ
3. तमिळनाडू
4. आंध्र प्रदेश
उत्तर : केरळ

कूडिअट्टम बद्दल महत्त्वाची माहिती :
• हे केरळमधील सर्वात जुने पारंपारिक नाट्य प्रकारांपैकी एक आहे आणि संस्कृत नाट्यपरंपरेवर आधारित आहे.
• मल्याळम भाषेतील “कुटी” या शब्दाचा अर्थ “एकत्रित” असा होतो आणि “अट्टम” याचा अर्थ “अभिनय” असा होतो.
• "कूडिअट्टम " या शब्दाचा अर्थ एकत्रित येऊन केलेला अभिनय असा होतो.
• कूडिअट्टम नाट्यभाषेत, डोळ्यांचा अभिनय आणि हस्त अभिनय (हावभावांची भाषा) प्रमुख आहेत.
• कूडिअट्टमचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते संस्कृत नाटकांतील एकांकिकेला पूर्ण नाटक मानते.
• ते संस्कृत नाटकाच्या पूर्ण मजकुरावर नव्हे तर संस्कृत नाटकांच्या वैयक्तिक कृतींवर आधारित आहे.
• 2001 मध्ये युनेस्कोचा मौखिक आणि अमूर्त हेरिटेज ऑफ ह्युमनिटीचा उत्कृष्ट नमुना म्हणून कूडिअट्टमला ओळखले जाऊ लागले.
• (UNESCO Masterpiece of the Oral and Intangible Heritage of Humanity)
भारतीय हवाई दलाचे नविन प्रमुख कोण झाले ?
Chief of the Air Staff ?
Subject : GS - नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच भारतीय हवाई दलाचे प्रमुख पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. राकेश कुमार सिंग भदोरीया
2. अमर प्रीत सिंग
3. प्रदिप वसंत नाईक
4. यांपैकी नाही
उत्तर : अमर प्रीत सिंग

• एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची देशाच्या हवाई दल प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
• ३० सप्टेंबर रोजी ते हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
• एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे 28 वे प्रमुख असणार आहे.
• 27 ऑक्टोबर 1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांना डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिक शाखेत नियुक्त करण्यात आले होते.
• सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी कमांड, स्टाफ, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्ती अशा विविध पदांवर काम केले आहे.
• नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहे.
• एअर मार्शल अमर प्रीत सिंग, फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक टेस्ट पायलट असून त्यांना विविध प्रकारच्या फिक्स्ड आणि रोटरी विंग विमानाच्या 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.
• टेस्ट पायलट म्हणून, त्यांनी रशियामध्ये मॉस्को येथे MiG-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले.
युरोपा क्लिपर मिशन
Europa Clipper Mission
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेले युरोपा क्लिपर मिशन खालील पैकी कोणाचे महत्त्वाकांक्षी मिशन आहे ?
1. NASA
2. ISRO
3. European Space Agency
4. China National Space Administration
उत्तर : NASA

युरोपा काय आहे ?
• जसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे त्याचप्रमाणे युरोपा हा गुरू (Jupiter) या ग्रहाचा चंद्र आहे.
• युरोपा पृथ्वीच्या चंद्रापेक्षा किंचित लहान आहे. त्याचा पृष्ठभाग बर्फापासून बनलेला आहे.
• त्याच्या बर्फाळ कवचाच्या खाली खाऱ्या पाण्याचा महासागर आहे, ज्यामध्ये पृथ्वीवरील सर्व महासागरांच्या मिळून दुप्पट पाणी आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
काय आहे युरोपा क्लिपर मिशन ?
• गुरू या ग्रहाचा चंद्र युरोपाचा अभ्यास करण्यासाठी युरोपा क्लिपर मिशन हे NASA चे महत्वकांक्षी मिशन आहे.
• उद्दिष्ट : या मिशन चे उद्दिष्ट युरोपाच्या बर्फाळ पृष्ठभागावरील रहस्ये उलगडणे आणि बाह्य जीवनाची संभाव्य चिन्हे शोधणे हे आहे.
• लॉन्च (प्रक्षेपण) तारीख : हे अंतराळयान फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ऑक्टोबर 2024 मध्ये प्रक्षेपित केले जाईल.
• कालावधी : 2031 पर्यंत युरोपा येथे लक्ष्यित आगमनासह मिशन पाच वर्षांपर्यंत चालण्याची अपेक्षा आहे.
• हे मिशन गुरु ग्रहाची प्रदक्षिणा करेल आणि युरोपाच्या गोठलेल्या कवचाखाली जीवन शक्य आहे की नाही हे शोधण्यासाठी आवश्यक डेटा गोळा करेल.
गुरू ग्रहाबद्दल महत्त्वाची माहिती :
• गुरू (बृहस्पती किंवा Jupiter) हा अंतरानुसार सूर्यापासून 5 व्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे.
• गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून यांना जोव्हियन ग्रह किंवा गॅस जायंट ग्रह म्हणतात.
• गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियम चा बनला आहे.
• प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव ज्युपिटर याच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव दिले होते.
• गुरू चा परिवलन काळ म्हणजे स्वतःभोवती एक फेरी फिरण्याचा वेळ 10 तासांपेक्षा किंचित कमी आहे.
• परंतु सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी गुरू ला सुमारे १२ पृथ्वी वर्षे लागतात.
• गुरू ग्रहाला 79 उपग्रह (चंद्र) आहे.