
चालू घडामोडी 13, सप्टेंबर 2024

ग्राम न्यायलये म्हणजे काय ?
What are the Gram Nyayalayas ?
बातम्यांमध्ये : सुप्रीम कोर्टाने अलीकडेच म्हटले आहे की, देशभरात ग्राम न्यायलयांची स्थापना केल्याने सोईस्कर रीतीने न्याय मिळण्यास मदत होईल.
Subject : GS - राज्यशास्त्र, ग्रामपंचायत
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ग्राम न्यायलय अधिनियम (कायदा) केव्हा पारीत करण्यात आला ?
1. 1994
2. 2000
3. 2008
4. 2024
उत्तर : 2008

ग्राम न्यायलये :
• ग्राम न्यायलय अधिनियम, 2008 अंतर्गत भारताच्या ग्रामीण भागात ग्राम न्यायलयांची स्थापन करण्यात आली.
• हा कायदा ग्रामन्यायालये स्थापन करणे बंधनकारक करत नाही.
ग्राम न्यायलये स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे ?
• एक किंवा अधिक ग्राम न्यायलये स्थापन करण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.
• राज्य सरकार संबंधित उच्च न्यायालयाशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर ग्राम न्यायलये स्थापन करतात.
ग्राम न्यायलये स्थापन का करण्यात आली ?
• भारताच्या ग्रामीण भागात जलद आणि सुलभ पद्धतीने न्याय व्यवस्था उपलब्ध व्हावी.
• लोकांना कमीत कमी खर्चात, त्यांच्या दारात न्याय मिळण्यासाठी ग्राम न्यायलये स्थापन करण्यात आली आहेत.
• कायद्याच्या कलम 4 मध्ये असे सांगितले आहे की, ग्राम न्यायलयाचे मुख्यालय संबंधित पंचायतीमध्ये किंवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या इतर ठिकाणी स्थापन केली जातील.
• राज्य सरकार संबंधित उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून ग्राम न्यायलयांचे पीठासीन अधिकारी (न्यायाधीशांची) नियुक्ती करतात.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana (PM-KMY)
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रधानमंत्री किसान मानधन योजना केव्हा सुरू करण्यात आली होती ?
1. 12 सप्टेंबर 2019
2. 12 सप्टेंबर 2021
3. 12 सप्टेंबर 2023
4. 12 सप्टेंबर 2024
उत्तर : 12 सप्टेंबर 2019

प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे ?
• या योजनेतून शेतकऱ्यांना वृद्धापकाळात निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन दिली जाते.
• शेतकऱ्यांना वृद्धापकाळात दर महिन्याला 3000 रूपये पेंशन देऊन त्यांना सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 12 सप्टेंबर 2019 रोजी ही योजना सुरू केली होती.
• ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना (ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना) सामाजिक सुरक्षा प्रदान करते.
• पात्रता : प्रधानमंत्री किसान मान-धन योजना 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या आणि 18 ते 40 वयोगटातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे.
योजनेचे स्वरूप कसे आहे ?
• 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी साधारणपणे दर महिन्याला 55 रूपये ते 200 रूपये ते 60 वर्षांचे होईपर्यंत योगदान देणे आवश्यक आहे.
• शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदाना इतकाच निधी केंद्र सरकारकडून दिला जातो.
• शेतकऱ्याचे वय 60 वर्ष झाले की, या योजनेत नावनोंदणी केलेल्या आणि एक्सल्युजन निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक 3,000 रूपये पेन्शन सुरू होणार आहे.
• LIC म्हणजेच आयुर्विमा महामंडळ या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करीत आहे.
सीताराम येचुरी यांचे निधन
Indian Communist Leader Sitaram Yechury No More - Rest in Peace 💐💐
बातमी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं गुरुवारी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं.
Subject : GS - व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सिताराम येचुरी यांचे नुकतेच निधन झाले ते 2005 ते 2017 पर्यंत कोणत्या मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार होते ?
1. महाराष्ट्र
2. पश्चिम बंगाल
3. उत्तर प्रदेश
4. तमिळनाडू
उत्तर : पश्चिम बंगाल

सीताराम येचुरी यांबद्दल थोडक्यात माहिती :
• जन्म : 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास येथील एका तेलुगू कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
• सीताराम येचुरी जेएनयूमध्ये विद्यार्थी असताना त्यांना 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात अटक करण्यात आली होती.
• सीताराम येचुरी भारतीय राजकारणातील दिग्गज नेते होते.
• विशेषत: डाव्या चळवळीमधील राष्ट्रीय स्तरावरील मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं.
• सीताराम येचुरी हे भारतीय मार्क्सवादी, राजकारणी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस होते.
• सीताराम येचुरी 2005 पासून 2017 पर्यंत पश्चिम बंगाल मधून राज्यसभेचे खासदार राहिले.
कोठे होणार आदिवासी विद्यापीठाची स्थापना ?
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे ?
1. नाशिक
2. पालघर
3. नंदुरबार
4. गोंदिया
उत्तर : नाशिक

• आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
• हे विद्यापीठ बालवाडी (KG) ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे (PG) महत्त्वाचे दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करेल.
• या विद्यापीठात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकूण 80% जागा राखीव असतील.
• या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान इत्यादी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील.
• नाशिक औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश ??
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?
1. नेपाळ
2. कॅनडा
3. पोलंड
4. मेक्सिको
उत्तर : मेक्सिको

• नुकतेच मेक्सिको देशाने लोकांमार्फत न्यायाधीश निवडण्याची परवानगी दिली.
• या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च-स्तरीय न्यायाधीश तसेच स्थानिक पातळीवरील न्यायाधीशांची निवड लोकांमार्फत निवडणूक प्रक्रियेसारखी केली जाईल.
• न्यायालयीन कर्मचारी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसह विरोधकांनी या योजनेच्या विरोधात निषेधाची मालिका आयोजित केली आहे.