
चालू घडामोडी 23, सप्टेंबर 2024

तिरुपती बालाजी मंदिर | Tirupati Balaji Temple
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेले तिरूपती बालाजी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे ?
1. केरळ
2. तमिळनाडू
3. आंध्र प्रदेश
4. तेलंगणा
उत्तर : आंध्र प्रदेश

बातम्यांमध्ये : जुलै 2024 मध्ये, तिरूपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपावर केलेल्या प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून बाहेरील चरबीची उपस्थिती आढळून आली.
ज्यात तुपात डुकराची चरबी, गोमांस टॅलो आणि फिश ऑइल यांचा समावेश होता. या निष्कर्षांमुळे प्रसादाच्या पावित्र्याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली.
तिरुपती बालाजी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती :
• तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर, ज्याला तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथील तिरुमला या डोंगराळ शहरामध्ये वसलेले हिंदू मंदिर आहे.
• हे मंदिर विष्णूचे अवतार भगवान श्री व्यंकटेश्वर यांना समर्पित आहे.
• हे मंदिर समुद्रसपाटीपासून 853 मीटर उंचीवर वसलेले आहे आणि तिरुमला टेकडीच्या सात टेकड्यांपैकी एक असलेल्या वेंकट टेकडीवर स्थित आहे.
• गरुड पुराण, ब्रह्म पुराण आणि इतर अनेक पवित्र ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे.
• देणग्या आणि संपत्तीच्या बाबतीत हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
• देवाला प्रसन्न करण्यासाठी केस आणि विविध संपत्ती दान करणे ही मंदिरातील लोकप्रिय प्रथा आहे.
• मंदिराची प्राचीन मुळे पल्लव राजवंशात सापडतात, ज्याचा 9व्या शतकात या प्रदेशावर प्रभाव होता.
• त्यानंतर, चोल राजघराण्याने मंदिराचा विकास आणि संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
• नंतरच्या काळात, विजयनगर साम्राज्याच्या काळात, मंदिराला महत्त्वपूर्ण योगदान आणि देणगी मिळाली.
• प्रसिद्ध संत रामानुज यांनी 12 व्या शतकात मंदिर आणि त्याच्या विधींचे पुनरुज्जीवन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
• GI Tag : प्रसिद्ध गोड, तिरुपती लाडू, मंदिरात प्रसाद म्हणून दिला जातो, त्याला भौगोलिक संकेतांक (GI टॅग) देण्यात आला आहे.
पाश्मिना शॉल्स एवढी महाग का आहे ? | PASHMINA SHAWL
बातम्यांमध्ये : अमेरिकेत सुरु असलेल्या क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना दिल्ली-डेलावेअर सिल्व्हर ट्रेनचे मॉडेल आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना पाश्मिना शाल भेट दिली.
Subject : GS - GI Tag
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भौगोलिक संकेतांक असलेली पाश्मिना शाल प्रामुख्याने कोणत्या प्रदेशातील आहे ?
1. महाराष्ट्र
2. काश्मिर
3. उत्तर प्रदेश
4. आसाम
उत्तर : काश्मिर

पाश्मिना शॉल्स बद्दल थोडक्यात माहिती :
• पाश्मिना शाल हे भौगोलिक संकेतांक (GI Tag) प्रमाणित लोकर आहे. ते भारतातील काश्मीर प्रदेशातून आहे.
• काश्मीर खोऱ्यातील स्थानिक कारागिरांनी वापरलेल्या अनोख्या पारंपारिक प्रक्रियेमुळे काश्मीरच्या पाश्मिना शॉल्स ने G.I टॅग मिळवला आहे.
• काश्मिरी लोक हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी पश्मिना शॉल वापरत.
• पाश्मिना' हा शब्द पर्शियन शब्द "पश्म" वरून आला आहे, ज्याचा अर्थ विणता येण्याजोगा तंतू असा होतो.
• पाश्मिना शॉल्स त्यांच्या लोकरच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे आणि एकच तुकडा बनवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे खूप महाग आहेत.पश्मिना शाल विणण्यासाठी वापरली जाणारी लोकर लडाखमधील पाळीव चांगथंगी बकऱ्यांकडून (कॅपरा हिर्कस) मिळवले जाते.
भौगोलिक संकेतांक म्हणजे काय ?
GI Tag (Geographical Indication)
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
• 2004 मध्ये दार्जिलिंग टी (दार्जिलिंग चहा) GI टॅग मिळवणारा पहिले भारतीय उत्पादन होते.
GI टॅग असणारे महाराष्ट्रातील काही उत्पादक :
• सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, कोल्हापुरी चप्पल, पुरंदर अंजीर, मराठवाडा केसर आंबा, नाशिकचे द्राक्ष, नाशिक व्हॅली वाईन, वारली चित्रकला इत्यादी.
जागतिक नदी दिवस | World River Day
बातम्यांमध्ये : जागतिक नदी दिनानिमित्त नदी पुनर्वसन आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून, महाराष्ट्र सरकारने रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'नदी पाठशाळा' आणि 'नदी शपथ' समारंभाचे आयोजन केले होते.
पर्यावरणीय संतुलन आणि शाश्वत भविष्यासाठी नद्यांच्या संरक्षणाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाने ‘चला जानुया नदीला’ या मोहिमेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा कार्यक्रम आयोजित केला होता.
Subject : GS - पर्यावरण, दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक नदी दिवस केव्हा साजरी करतात ?
1. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी
2. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी
3. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी
4. सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी
उत्तर : सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी

जागतिक नदी दिनाबद्दल महत्त्वाची माहिती :
• जागतिक नदी दिन 2005 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो.
• 2024 मध्ये जागतिक नदी दिन 22 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येत आहे.
जागतिक नदी दिनाची सुरुवात कोणी केली ?
मार्क अँजेलो हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅनेडियन नदी संवर्धनवादी आणि जागतिक नद्या दिनाचे संस्थापक आहेत. जगभरातील नद्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
जागतिक नदी दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
2024 सालासाठी जागतिक नदी दिनाची संकल्पना (थीम) ‘शाश्वत भविष्यासाठी जलमार्ग’ (Waterways for a Sustainable Future) अशी ठेवण्यात आली आहे.
आपण जागतिक नद्या दिन का साजरा करतो ?
• नद्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
• नद्या मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ते गोड्या पाण्याचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. नद्या आपल्याला फक्त ताजे पिण्याचे पाणीच पुरवत नाहीत तर घरगुती गरजा (उदा. अन्न, ऊर्जा, स्वच्छता) आणि शेतीसाठी (उदा. सिंचन) पाणी देखील पुरवतात.
• ते लोक आणि वस्तूंना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी मार्ग देखील प्रदान करतात.
• भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.
• अलिकडच्या दशकांमध्ये, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे चालणाऱ्या मानवी हस्तहस्तक्षेपामुळे जगभरातील असंख्य नद्यांचे प्रदूषण आणि नुकसान झाले आहे.
• प्रत्येक देशातील नद्यांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे नद्यांचे शाश्वत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
नद्यांबद्दल वनलाईनर पॉईंट्स :
• दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. ॲमेझॉन नदीचे पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
• आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. नाईल नदी सुमारे 6650 किलोमीटर पसरलेली आहे.
• (नोट : मोठी नदी आणि लांब नदी यात फरक आहे.)
• चीनमधील यांगत्झे (Yangatze) नदी ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. ती आशियातील सर्वात लांब नदी देखील आहे.
• आसाम येथिल मजुली हे जगातील सर्वात मोठे नदीवरील बेट आहे. हे बेट ब्रम्हपुत्रा नदीवर आहे.
आंतरराष्ट्रीय गेंडा दिवस | World Rhino Day
बातम्यांमध्ये : जागतिक गेंडा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (ट्विटरवर) वर एका पोस्टमध्ये, पृथ्वीवरील सर्वात प्रतिष्ठित प्रजातींपैकी एक असलेल्या गेंड्याच्या संरक्षणासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली.
Subject : GS - पर्यावरण, दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पैकी कोणता गेंडा भारतात आढळतो ?
1. पांढरा गेंडा
2. काळा गेंडा
3. एक शिंगी गेंडा
4. सुमात्रन गेंडा
उत्तर : एक शिंगी गेंडा

• दरवर्षी गेंड्याच्या संरक्षणासाठी 22 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गेंडा दिवस साजरा केला जातो.
• गेंड्यांबाबत जनजागृती निर्माण करणे, गेंड्याची शिकार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक गेंडा दिवस (world Rhino Day)साजरा केला जातो.
• वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF) - दक्षिण आफ्रिका द्वारे 2010 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय गेंडा दिवस जाहीर केला गेला.
• पाच लुप्तप्राय गेंड्यांच्या प्रजातींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
गेंड्याच्या पाच प्रजाती पुढीलप्रमाणे :
1. काळा गेंडा ( Black Rhino )
2. पांढरा गेंडा ( White Rhino )
3. एक शिंगी गेंडा ( Greater One-Horned Rhino )
4. जावन गेंडा ( Javan Rhino )
5. सुमात्रन गेंडा ( Sumatran Rhino )

जागतिक गेंडा दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"पाच जिवंत ठेवा." ही थीम सर्व पाच गेंड्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावर जोर देते.
Keep the Five Alive, emphasising the importance of protecting all five rhino species.
एक शिंगी गेंडा Greater One-Horned Rhino :
• एक शिंगी गेंडा याला भारतीय गेंडा (Indian Rhino) म्हणूनही ओळखला जातो.
• भारत हा जगातील सर्वाधिक एक शिंगी गेंड्याची लोकसंख्या असलेला देश आहे
• हा गेंड्याच्या प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे. हा गेंडा त्याच्यावर असलेल्या एका काळ्या शिंगाने आणि त्वचेच्या पटींसह तपकिरी रंगाने ओळखला जातो. .
• ते प्रामुख्याने गवत, पाने, झुडुपे आणि झाडे, फळे आणि जलचरांच्या फांद्या चरतात.
• गेंड्याची शिकार रोखण्यासाठी आणि गेंड्यांच्या संख्येचे संवर्धन करण्यासाठी प्रोजेक्ट राइनो हा भारतात सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे
• संवर्धनाच्या चालू असलेल्या प्रयत्नांमुळे भारतातील गेंड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
• देशात एक-शिंगे गेंडे प्रामुख्याने आसाम राज्यात आढळतात.
• काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम), मानस राष्ट्रीय उद्यान (आसाम) आणि पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य (आसाम) या ठिकाणी एक-शिंगी गेंड्यांचे संवर्धन केले जात आहे.
• संवर्धन स्थिती : IUCN Red list : असुरक्षित (Vulnerable)