
चालू घडामोडी 14, सप्टेंबर 2024

राष्ट्रीय हिंदी दिवस
Rashtriya Hindi Diwas
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो ?
1. 10 सप्टेंबर
2. 14 सप्टेंबर
3. 18 सप्टेंबर
4. 24 सप्टेंबर
उत्तर : 14 सप्टेंबर

बातम्यांमध्ये : भारताने 14 सप्टेंबर 2024 रोजी हिंदी भाषा देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंदी दिवस साजरा केला.
हिंदीला अधिकृत भाषा म्हणून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्री यांनी टपाल तिकीट जारी केले.
राष्ट्रीय हिंदी दिवसाबद्दल महत्त्वाची माहिती :
• ‘ हिंद ’ या पर्शियन शब्दावरून हिंदी असे या भाषेचे नाव पडले. याचा अर्थ 'सिंधू नदीची भूमी' असा होतो. हिंदी भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झाली आहे.
• 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदीला भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली.
• हिंदी ही भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध 22 भाषांपैकी एक आहे.
• हिंदी भाषा अभिजात भाषा नाही.
भारतीय राज्यघटनेचे कलम 351 काय आहे ?
कलम 351 केंद्र सरकारला हिंदी भाषेचा प्रसार आणि विकास करण्यास प्रोत्साहन देते. इतर भारतीय भाषा आणि लिप्यांमधील घटक आत्मसात करून हिंदी समृद्ध करण्याचे कर्तव्य ते स्पष्ट करते.
भारतीय राज्यघटनेत कलम ३५१ का समाविष्ट करण्यात आले?
कलम 351 चा समावेश सर्व भारतीयांसाठी समान भाषा म्हणून हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील विविध भाषिक क्षेत्रांसोबत प्रभावी संवाद साधण्यासाठी करण्यात आला.
पहिला राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला गेला ?
पहिला राष्ट्रीय हिंदी दिवस 1953 मध्ये साजरा करण्यात आला.
हिंदी दिवस 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"हिंदी – पारंपारिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील पूल" ही हिंदी दिवस 2024 ची थीम आहे.
"Hindi – The Bridge between Traditional Knowledge and Artificial Intelligence".
जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो ?
10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.
जागतिक ग्रामीण विकास दिन
World Rural Development Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच संयुक्त राष्ट्र महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे ?
1. 14 सप्टेंबर
2. 22 ऑगस्ट
3. 6 जुलै
4. 5 मे
उत्तर : 6 जुलै

बातम्यांमध्ये : अलिकडेच संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 78 व्या अधिवेशनात 6 जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन (World Rural Development Day) म्हणून घोषित करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
उद्दिष्ट : सर्वसमावेशक पद्धतीने ग्रामीण भागाचा विकास करणे त्यासाठी जगाचे लक्ष्य केंद्रित करणे आणि त्याद्वारे शाश्वत विकासाचे ध्येय (Sustainable Development Goals) साध्य करणे.
ग्रामीण विकास दिवस का महत्त्वाचा आहे ?
• दारिद्र्य निर्मूलन, अन्नसुरक्षा, पोषण, स्थानिक प्रशासन, व्यापार, उपजीविका, मूलभूत गरजा पूर्ण करणे, शाश्वत विकास आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर हे आशिया आणि पॅसिफिक प्रदेश तसेच जगासमोरील एक प्रमुख समस्या आहेत.
• या समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष आणि आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
• हा दिवस ग्रामीण भागाचे आणि तेथील लोकांचे महत्त्व त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
श्री विजया पुरम
Port Blair Renamed as Sri Vijaya Puram
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच केंद्र सरकारने कोणत्या शहराचे नाव बदलून श्री विजया पुरम असे करण्याचा निर्णय घेतला आहे ?
1. पोर्ट ब्लेअर
2. कावरत्ती
3. माहे
4. यानम
उत्तर : पोर्ट ब्लेअर

बातम्यांमध्ये : केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार ची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजया पुरम असे का करण्यात आले ?
• अंदमान आणि निकोबार बेटांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेचा सन्मान करण्यासाठी आणि पूर्वीशी संबंधित वसाहतवादी वारसा नष्ट करण्यासाठी पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्यात आले.
• नवीन नाव, श्री विजया पुरम, हे चोला साम्राज्य आणि भारताच्या समृद्ध वारशाशी त्याचा संबंध अधोरेखित (हायलाइट) करते.
पोर्ट ब्लेअर हे नाव कसे पडले ?
• पोर्ट ब्लेअरचे नाव आर्किबाल्ड ब्लेअर (Archibald Blair) या ब्रिटिश नौदल सर्वेक्षक आणि बॉम्बे मरीनमधील अधिकारी यांच्या नावावर ठेवण्यात आले.
• अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अंदमान बेटांचे मॅपिंग करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
श्री विजया पुरम (पोर्ट ब्लेअर) बद्दल महत्त्वाची माहिती :
• श्री विजया पुरम हे बंगालच्या उपसागरातील केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांचे राजधानी आहे.
• भारतीय सशस्त्र दल, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाची भारताची पहिली एकत्रित त्रि-कमांड श्री विजया पुरम येथे आहे.
• पोर्ट ब्लेअर (श्री विजया पुरम) हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली 1943 ते 1944 पर्यंत आझाद हिंद सरकारचे मुख्यालय होते.