
चालू घडामोडी 28, सप्टेंबर 2024

शहीद भगत सिंग
Bhagat Singh
महान क्रांतिकारक भगतसिंग यांची आज जयंती. त्यांना tcs9 टीम कडून विनम्र अभिवादन💐💐
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास, क्रांतिकारक

भगतसिंग यांबद्दल माहिती :
जन्म : भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी ब्रिटिश भारतात बंगा, पंजाब, (आता पाकिस्तानमध्ये) येथे एका शीख कुटुंबात झाला.
भगतसिंग यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते.
• 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भगतसिंग यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
• वयाच्या 12 व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची त्यांनी शपथ घेतली.
• लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या नॅशनल कॉलेज, लाहोरमध्ये भगतसिंग यांनी प्रवेश घेतला, तेथे त्यांच्या स्वदेशी चळवळीवर जोर दिला आणि क्रांतिकारी विचारांना व्यासपीठ मिळावले.
• भगतसिंग 1924 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) चे सदस्य बनले. वसाहतवादी सरकार उलथून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांती घडवून आणणे हा या संघटनेचा उद्देश होता.
• नंतर 1928 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) असे ठेवले गेले.
• स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना एकत्रित करण्यासाठी 1926 मध्ये भगतसिंग यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली.
• पोलिसांच्या लाठीहल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून 1928 मध्ये (लाहोर कट प्रकरण) पोलिस अधिकारी जे. पी. साँडर्स याला भगतसिंग, राजगुरू आणि आझाद यांनी गोळ्या घालून ठार केले.
• 18 एप्रिल 1929 रोजी, दडपशाही ब्रिटीश कायद्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीत केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकला आणि ते स्वतः हून अटक झाले.
• नंतर लाहोर कट प्रकरणात खुनाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
• त्याच्यावर खटला चालवण्यात आला, त्यांना दोषी ठरवण्यात आले.
• भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
• 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
• दरवर्षी 23 मार्च हा दिवस स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली म्हणून शहीद दिन म्हणून पाळला जातो.
• भगतसिंग यांना प्रेमाने शहीद-ए-आझम (अर्थ : महान शहीद) म्हणून ओळखले जाते.
भगतसिंग यांची विचारसरणी :
• भगतसिंग हे मार्क्सवादी आणि समाजवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते.
• तर्कवाद, समानता आणि न्याय यावर त्यांनी जोर दिला.
• विश्व प्रेम (युनिव्हर्सल लव्ह) या त्यांच्या लिखाणात भगतसिंग यांनी समानतेचे महत्त्व सांगितले.
• त्यांनी भूक आणि युद्धमुक्त जगाची कल्पना केली, जिथे मानवता वंश आणि राष्ट्रीयतेच्या सीमा ओलांडून सर्वांना समानतेने वागवले जाईल.
भगतसिंग यांनी लिहिलेली काही प्रमुख पुस्तके :
• मी नास्तिक का आहे ? (Why I Am an Atheist)
• द जेल नोटबुक (The Jail Notebook)
भगतसिंग यांची घोषणा काय होती ?
इन्कलाब झिंदाबाद
(अर्थ - क्रांती अमर असो)
परम रुद्र महासंगणक
PARAM Rudra Supercomputers
बातम्यांमध्ये : अलीकडेच, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वातावरण आणि हवामान संशोधनासाठी तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटिंग सिस्टीम आणि हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC) सिस्टीम लाँच केली.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारे 'अर्का' आणि 'अरुणिका' कशाशी संबंधित आहे ?
1. नवीन उपग्रह
2. सुपर कॉम्प्युटर सिस्टीम
3. बुलेटप्रुफ जॅकेट
4. मशीन गण
उत्तर : सुपर कॉम्प्युटर सिस्टीम

परम रुद्र महासंगणक काय आहे ?
• राष्ट्रीय महासंगणक अभियाना अंतर्गत स्वदेशी पद्धतीने हे परम रुद्र महासंगणक विकसित केलेले आहे.
• हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी तैनात करण्यात आले आहेत.
• हे विविध वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी डोमेनमधील जटिल संगणकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्यूटिंग प्रणाली म्हणजे काय ?
What is High-Performance Computing (HPC) system ?
• या HPC प्रणालीमध्ये असाधारण संगणकीय शक्ती आहे.
• हे वातावरण आणि हवामान संशोधनासाठी तयार केले आहे.
• हे पुण्यातील IITM संस्था (Indian Institute of Tropical Meteorology ) आणि नोएडामधील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (NCMRWF) या दोन प्रमुख स्थळांवर स्थित आहे.
• नवीन HPC प्रणालींना 'अर्का' आणि 'अरुणिका' असे नाव देण्यात आले आहे.
• उपयोग : हे उच्च-रिझोल्यूशन मॉडेल उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, अतिवृष्टी, वादळे, गारपीट, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि हवामानातील इतर गंभीर घटनांशी संबंधित अंदाजांची अचूकता अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील.
नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन काय आहे ?
• शैक्षणिक संस्था, संशोधक, MSME आणि स्टार्टअप्सच्या वाढत्या संगणकीय मागण्या पूर्ण करण्यासाठी देशाला सुपरकंप्युटिंग पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी 2015 मध्ये हे मिशन लाँच केले गेले.
• उद्दिष्ट : संपूर्ण भारतात प्रगत संगणकीय प्रणालींचे जाळे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
लता मंगेशकर
Lata Mangeshkar
Subject : GS - व्यक्ती
लता मंगेशकर या भारतीय संगीताच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली गायिका होत्या.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच मध्य प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?
1. के. एस. चित्रा
2. सुनिधी चौहान
3. श्रेया घोषाल
4. सांधना सरगम
उत्तर : के. एस. चित्रा

• जन्म : लता मंगेशकरांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदौर शहरात झाला.
• भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारताची गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
• लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती.
• त्यांनी 25000 हून अधिक गाणी गायली.
• गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.
• वयाच्या १३ व्या वर्षी वसंत जोगळेकर यांच्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले.
पुरस्कार आणि सन्मान :
आपल्या दीर्घ कारकिर्दीत लतादीदींना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे :
• पद्मभूषण (१९६९)
• दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९)
• महाराष्ट्र भूषण (1997)
• पद्मविभूषण (1999)
• भारतरत्न (2001)
• लीजन ऑफ ऑनर -२००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.
लता मंगेशकर यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार :
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार :
• मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे हा पुरस्कार दिला जातो.
• या पुरस्काराची सुरुवात 2022 मध्ये करण्यात आली.
• 2024 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आला.
लता मंगेशकर पुरस्कार :
• मध्य प्रदेश सरकारकडून हा पुरस्कार देण्यात येतो.
• हा पुरस्कार 28 सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी दिला जातो.
• या पुरस्काराची सुरुवात 1984 मध्ये केले गेली.
• संगीत क्षेत्रातील कलात्मक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.
• संगीतकार उत्तम सिंग यांना 2022 साठी तर गायिका के. एस. चित्रा यांना 2023 साठीचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.
GlobE Network
बातम्यांमध्ये : अलीकडेच, बीजिंगमध्ये झालेल्या सत्रादरम्यान भारताची ग्लोब नेटवर्कच्या सुकाणू समितीवर निवड करण्यात आली.
Subject : GS - आंतरराष्ट्रीय संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच भारताची GlobE Network समिती वर निवड करण्यात आली ही समिती खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. भ्रष्टाचार विरोधी लढा देणारी संघटना
2. मुक्त व्यापार करणारी संघटना
3. पर्यावरण संरक्षण करणारी संघटना
4. यांपैकी नाही
उत्तर : भ्रष्टाचार विरोधी लढा देणारी संघटना

आंतरराष्ट्रीय उपक्रम असलेल्या भ्रष्टाचार विरोधी कायदा अंमलबजावणी प्राधिकरणाच्या (GlobE Network) ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्कच्या पंधरा सदस्यीय सुकाणू समितीसाठी भारताची निवड झाली आहे.
GloBE Network म्हणजे काय ?
• The Global Operational Network of Anti-Corruption Law Enforcement Authorities.
• GloBE Network हा G-20 संघटनेचा उपक्रम आहे.
• GloBE नेटवर्क अधिकृतपणे 3 जून 2021 रोजी लॉन्च करण्यात आले.
• भ्रष्टाचार आणि आर्थिक गुन्ह्यांचे सामना करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली.
• 15 सदस्य असलेली समिती : 1 अध्यक्ष, 1 उपाध्यक्ष आणि 13 सदस्य असलेली समिती संस्थेला नेतृत्व आणि दिशा प्रदान करते.
• नुकतीच भारताची या समितीवर निवड करण्यात आली.
• भारताचे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) हे या नेटवर्कचा भाग आहेत.