ईश्वर चंद्र विद्यासागर | Ishwar Chandra Vidyasagar
थोर समाजसुधारक, शिक्षणततज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏💐
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पैकी कोणाच्या प्रयत्नांमुळे 1856 मध्ये भारत सरकारने विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर केला ?
1. राजा राममोहन रॉय
2. ईश्वरचंद्र विद्यासागर
3. स्वामी दयानंद सरस्वती
4. केशवचंरद्र सेन
उत्तर : ईश्वरचंद्र विद्यासागर

ईश्वरचंद्र विद्यासागर हे एक प्रमुख बंगाली समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते ज्यांनी बंगाली सुधारणा चळवळी मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
• मुळ नाव : ईश्वरचंद्र बन्दोपाध्याय
• जन्म : बंगाल प्रेसिडेन्सीच्या मिदनापूर जिल्हात 26 सप्टेंबर 1820 रोजी झाला.
• विद्यासागर पदवी : संस्कृत आणि तत्त्वज्ञानाच्या विस्तृत ज्ञानासाठी 1839 मध्ये त्यांना विद्यासागर म्हणजे ज्ञानाचा महासागर ही पदवी त्यांना मिळाली.
• ते 21 वर्षांचे असताना फोर्ट विल्यम महाविद्यालयात संस्कृत विभागाचे प्रमुख झाले.
• ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1851 ते 1858 या काळात संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून प्रशासन आणि शिक्षणात प्रचंड सुधारणा केल्या.
सुधारणा :
शैक्षणिक सुधारणा :
• ते सार्वत्रिक शिक्षणाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकजण, जात किंवा लिंग यांचा भेदभाव न करता, शिक्षण घेण्यासाठी पात्र आहे.
• ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी अभ्यासक्रमात विज्ञान, गणित आणि आधुनिक तत्त्वज्ञान यांचा समावेश करून शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या.
• त्यांनी खालच्या जातीतील लोकांसाठी संस्कृत महाविद्यालयाचे दरवाजे उघडले आणि विविध ठिकाणी 20 मॉडेल स्कूलची स्थापना केली.
• त्यांनी बंगाली वर्णमाला पुनर्रचना केली आणि बंगाली टायपोग्राफी सुधारली, ती अधिक सुलभ केली.
• त्यांचे पुस्तक 'बोर्नो पोरीचॉय' (अक्षर परिचय), अजूनही बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जातो.
ईश्वरचंद्र विद्यासागर : महिला हक्क आणि सामाजिक बदलाचे पुरस्कर्ते
• ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांमुळे 1856 मध्ये भारत सरकारने विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर केला.
• विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा मिळावा म्हणून विद्यासागर यांनी स्वतःच्या मुलाला एका विधवेशी लग्न करण्याचा आग्रह केला.
• त्यांनी संपूर्ण बंगालमध्ये मुलींसाठी 35 शाळा स्थापन केल्या आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचा समावेश करण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा केल्या.
जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश कोणता ?
First Country in the World to Eliminate Leprosy ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अधिकृतपणे कोणत्या देशाला कुष्ठरोग मुक्त जगातील पहिला देश म्हणून मान्यता दिली ?
1. नेदरलॅंड
2. स्वित्झर्लंड
3. इटली
4. जॉर्डन
उत्तर : जॉर्डन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अधिकृतपणे जॉर्डनचे कुष्ठरोग दूर करणारा जगातील पहिला देश म्हणून पुष्टी केली आहे.
कुष्ठरोगाबद्दल महत्त्वाची माहिती :
• कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे.
• कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जिवाणूमुळे होतो.
• इ.स. १८७३ मध्ये नॉर्वेतील वैद्य गेरहार्ट हेन्रिक आरमौअर हान्सेन यांना प्रथम ऊतींच्या नमुन्यात कुष्ठरोगाचे जीवाणू आढळले.
• या जीवाणूंमुळे कुष्ठरोग होतो, असे त्यांनी इ.स. १८७४ मध्ये सिद्ध केले. म्हणून कुष्ठरोगाला हान्सेन रोग असेही म्हणतात.
• नाक आणि तोंडातून थेंबांद्वारे जिवाणू प्रसारित केले जातात.
• हस्तांदोलन करणे किंवा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे, एकत्र जेवण करणे किंवा एकमेकांच्या शेजारी बसणे यासारख्या अनौपचारिक संपर्कातून हा रोग पसरत नाही.
कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे काय आहे ?
• त्वचेवर पांढरा किंवा लाल चट्टा दिसतो
• त्वचेची संवेदनक्षमता कमी होते.
• या रोगामुळे त्वचा जाड होऊन शरीराच्या विविध भागांवर गाठी वाढलेल्या दिसून येतात.
• हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
• परिणामी बोटे आणि पंजा आतील बाजूला वळतात.
बाबा आमटे आणि आनंदवन :
• महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्याची सेवा केली.
• चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा गावाजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली.
• आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले.
जॉर्डन देशाबद्दल थोडक्यात माहिती :
• जॉर्डन हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे
• याच्या सीमा सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन, इराक, इस्रायल आणि सीरियाला लागून आहेत
• जॉर्डन नदीने इस्रायल आणि जॉर्डनची सीमा अधोरेखित केली आहे.
• राजधानी - अम्मान (Amman)
• चलन - जॉर्डनियन दिनार (JOD).
नगर वन योजना | Nagar Van Yojna
बातम्यांमध्ये : नुकतेच, भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने शहरी हिरवळ वाढविण्याच्या उद्देशाने नगर वन योजनेअंतर्गत 100 दिवसांत 100 नगर वनांचे लक्ष्य गाठले आहे.
Subject : GS - पर्यावरण, सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पैकी कोणता/ कोणते पर्याय बरोबर आहे.
A) शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा जास्त तापमान असते.
B) शहरी भागात काँक्रिट बांधकाम जास्त असल्याने शहरी उष्णता बेट तयार होतात.
C) नगर वन योजना हा उपक्रम शहरी भागात नागरी वनांच्या निर्मितीसाठी 2020 मध्ये सुरू करण्यात आला.
1. फक्त A बरोबर
2. A आणि B बरोबर
3. B आणि C बरोबर
4. A, B आणि C बरोबर
उत्तर : A, B आणि C बरोबर

नगर वन योजना काय आहे ?
• 2020 साली नगर वन योजना हा उपक्रम शहरी भागात नागरी वनांच्या निर्मितीसाठी सुरू करण्यात आला आहे.
• ही योजना स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना समावून घेत शहरी वनीकरणाला प्रोत्साहन देते.
• या योजनेअंतर्गत शहरी भागात वृक्ष लाऊन जंगल निर्मितीसाठी प्रति हेक्टर 4 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
• नगर वन क्षेत्रे किमान १० हेक्टर ते ५० हेक्टर पर्यंत असावे.
• या योजनेत महानगरपालिका, नगरपालिका आणि नागरी स्थानिक संस्था (ULB) असलेली सर्व शहरे समाविष्ट आहेत.
• या योजनेअंतर्गत वन्यजीवांना आकर्षित करण्यासाठी आणि पर्यावरणीय समतोलाला प्रोत्साहन देण्यासाठी जैवविविधता असलेली फळे देणारी, औषधी आणि स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यावर भर दिला जातो.
• प्रत्येक नगर वनामध्ये किमान दोन तृतीयांश (2/3) क्षेत्रफळ वृक्षांच्या आच्छादनाखाली असणे आवश्यक आहे आणि त्यात जैवविविधता उद्यान, स्मृती वने, बटरफ्लाय कंझर्व्हेटरीज आणि आौषधी वनस्पती असणारे हर्बल गार्डन आणि त्याचबरोबर एक पेड मा के नाम या कार्यक्रमाअंतर्गत तयार केलेली मातृ वने यांसारख्या विविध प्रकारच्या वनांचा सहभाग नगर वनामध्ये असेल.
• उद्दिष्ट : सध्या, प्रतिपूरक वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (National Fund of National Compensatory Afforestation Management and Planning Authority (National CAMPA)) च्या राष्ट्रीय निधीच्या आर्थिक सहाय्याने 2027 पर्यंत 1000 नगर वने विकसित करण्याचे नगर वन योजनेचे उद्दिष्ट आहे.
नगर वन योजनेची गरज का आहे ?
• वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार ज्या शहरांमध्ये जास्त झाडे आहेत ती कमी व्यस्त आहेत, तिथे कमी आवाजाचा दर आहे.
• एक पूर्ण वाढलेले झाड दरवर्षी 150 किलो कार्बन डाय ऑक्साईडचा वापर करू शकते जो ग्लोबल वॉर्मिंगसाठी सर्वात मोठ्या ग्रीनहाऊस गॅसेसपैकी एक आहे.
• शहरी भागातील झाडे ओझोन, सल्फर डायऑक्साइड आणि पार्टिक्युलेट मॅटर कमी करतात, पर्यावरणातून कार्बन डायऑक्साइडचे लक्षणीय प्रमाण काढून टाकतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात.
शहरी उष्णता बेटे म्हणजे काय ?
What is an Urban Heat Island ?
• शहरी उष्मा बेटे ही स्थानिक आणि तात्पुरती घटना म्हणून ओळखली जाते.
• यामध्ये शहरातील काही भागात त्याच्या आसपासच्या क्षेत्रापेक्षा जास्त उष्णता असते.
• शहरी उष्णता बेट मुळात काँक्रिटपासून बनलेल्या बांधकामामध्ये अडकलेल्या उष्णतेमुळे होते.
• उष्णतेची ही वाढ काँक्रीटपासून बनलेल्या शहरांतील इमारती आणि घरांमुळे होते जेथे उष्णता अडकलेली असते आणि सहज विरघळू शकत नाही.
• अशा भागात तापमानातील फरक 3 ते 5 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतो.
शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा जास्त तापमान का असते ?
• शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला वृक्षारोपण, शेतजमिनी, जंगले आणि झाडे यांच्या रूपाने अधिक हिरवेगार आच्छादन लाभले आहे.
• शहरी भागात काँक्रिट बांधकाम जास्त असल्याने शहरी उष्णता बेट तयार होतात.
• वाहतूक, Air conditioning (Ac), फॅक्टरीमधून सोडला जाणारा धूर, कमी झाडांचे प्रमाण अशा अनेक कारणांमुळे शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा जास्त तापमान असते.
थ्री गॉर्जेस धरण | Three Gorges Dam
Subject : GS- भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण "थ्री गॉर्जेस धरण" कोणत्या देशात आहे ?
1. अमेरिका
2. चीन
3. रशिया
4. ऑस्ट्रेलिया
उत्तर : चीन

बातम्यांमध्ये : नासाच्या शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे की चीनचे सर्वात मोठे जलविद्युत धरण, "थ्री गॉर्जेस डॅम" मोठ्या प्रमाणात पाणी हलवत आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या फिरण्यावर परिणाम होत आहे.
थ्री गॉर्जेस धरणाबद्दल महत्त्वाची माहिती :
• चीनमधील जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण "थ्री गॉर्जेस डॅम" नावाचा एक अतिशय मोठा प्रकल्प आहे.
• गॉर्जेस(Gorge) म्हणजे घळई.
• थ्री गॉर्जेस धरण हे चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर स्थित आहे.
• हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र (Hydroelectric Power Station) आहे.
• सुमारे दोन दशकांच्या बांधकामानंतर 2012 मध्ये हे धरण पूर्ण झाले.
• हे धरण २,३३५ मीटर (७,६६० फूट) लांब आणि १८५ मीटर (६०७ फूट) उंच आहे.
• टर्बाइन फिरवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी हे धरण कुटांग्झिया, वुक्सिया आणि झिलिंग्झिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन सर्वात जवळच्या घाटांमधून (Gorges) पाण्याचा प्रवाह वापरतो.
थ्री गॉर्जेस धरण बांधण्यामागचा मुख्य हेतू कोणता ?
वीजनिर्मिती बरोबर यांगत्से नदीची जलवाहतूक क्षमता वाढवण्याचा आणि पूराचे पाणी साठवण्यासाठी जागा उपलब्ध करून पूर येण्याची शक्यता कमी करणे हे देखील थ्री गॉर्जेस धरण बांधण्यामागचा हेतू आहे.
यांगत्से (Yangtze) नदीबद्दल परीक्षेसाठी वनलाईनर पॉईंट्स :
• ही चीन आणि आशियातील सर्वात लांब नदी आहे.
• जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे.
• एकाच देशाच्या हद्दीत वाहणारी ती सर्वात लांब नदी देखील मानली जाते.
• यांगत्से नदी 6,300 किमी (3,915 मैल) लांब आहे.
• यांगत्से नदी तिबेटच्या पठारावर उगम पावते आणि पूर्व चीन समुद्राला जाऊन मिळते.
घळई किंवा निदरी म्हणजे काय ?
नदीच्या किंवा प्रवाहाच्या क्षरण (झीज) कार्यामुळे खडकाळ प्रदेशांत निर्माण होणाऱ्या अरुंद व खोल दरीला घळई किंवा निदरी (Gorge) असे म्हटले जाते.