
चालू घडामोडी 05, ऑक्टोबर 2024

मराठी अभिजात भाषा गौरव दिन
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून खालील पैकी कोणता दिवस साजरी करण्याचा निर्णय घेतला ?
1. 1 ऑक्टोबर
2. 3 ऑक्टोबर
3. 5 ऑक्टोबर
4. 10 ऑक्टोबर
उत्तर : 3 ऑक्टोबर

3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला.
मराठी भाषेबद्दल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती :
• मराठी भाषा ही मूळची आर्यांची भाषा मानली जाते.
• भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी ही भाषा सातपुडा पर्वतरांगांपासून खाली कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली व स्थिरावली.
• ‘श्री चामुन्डाराये करविले’ असे शिलालेखावरील मराठी भाषेत लिखित पहिले वाक्य श्रावणबेळगोळ येथे असल्याचा दाखला उपलब्ध आहे.
प्रश्न) "माझा मराठी चा बोल कौतुके। परि अमृताते हि पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन " असे कोणी म्हटले आहे ?
उत्तर : संत ज्ञानेश्वरांच्या वरील ओवी आहेत. त्यांनी मराठी भाषेचा गोडवा या ओवी मधून सांगितलेला आहे.
अर्थ : माझा मराठीचे बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैंज लावली तरी माझ्या मराठीचे बोल ती पैंज जिंकतील. कारण मराठी भाषेत एवढा गोडवा आहे.
प्रश्न) मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी गठन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : प्रा. रंगनाथ पठारे
मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी 2014 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती.
🧐 हे तुम्हाला माहित आहे का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
अभिजात भाषा म्हणजे काय त्याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇
कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार
Late Vasudeo Gaitonde Lifetime Achievement Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार कोणास देण्यात आला ?
1. लक्ष्मण श्रेष्ठ
2. नाना पाटेकर
3. आशा भोसले
4. यांपैकी नाही
उत्तर : लक्ष्मण श्रेष्ठ

• दृश्यकलेच्या क्षेत्रात (Visual arts) योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
• सन २०२२-२३ या वर्षातील कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना देण्यात येणार आहे.
कै. वासुदेव गायतोंडे कोण होते ?
• वासुदेव एस. गायतोंडे हे भारतीय चित्रकार होते.
• ते भारतातील अग्रगण्य अमूर्त चित्रकार म्हणून ओळखले जात होते.
• आधुनिक भारतीय चित्रकलेत अमूर्त शैलीला एक वेगळी प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली.
• त्यांचा जन्म 1924 मध्ये नागपूर येथे झाला.
पुरस्कार आणि सन्मान :
• वासुदेव गायतोंडे यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले.
• बॉम्बे आर्ट सोसायटीचे सिल्व्हर मेडल (१९५०),
• ‘यंग एशियन आर्टिस्ट’ अवॉर्ड, टोकियो (१९५७),
• जे.डी. रॉकफेलर प्रवास शिष्यवृत्ती, अमेरिका (१९६४-६५),
• ‘कालिदास सन्मान’ (१९८९),
• ‘पद्मश्री’ पुरस्कार (१९७१) हे त्यांपैकी प्रमुख सन्मान आहेत.
शास्त्रज्ञांना Charon उपग्रहावर वायू सापडले
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, सूर्यमाला
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, खारॉन ' (Charon) वर शास्त्रज्ञांनी कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन पेरॉक्साइड हे वायू शोधून काढले आहेत. तर खारॉन ' (Charon) हा खालील पैकी कोणाचा उपग्रह आहे ?
1. पृथ्वी
2. गुरू
3. शुक्र
4. प्लुटो
उत्तर : प्लुटो

Charon बद्दल वनलाईनर पॉईंट्स :
• प्लुटोच्या सर्वात मोठ्या उपग्रह 'खारॉन ' (Charon) वर शास्त्रज्ञांनी कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन पेरॉक्साइड हे वायू शोधून काढले आहेत.
• Charon हा प्लूटोच्या पाच उपग्रहांपैकी सर्वात मोठा आहे.
• हा प्लूटोच्या जवळजवळ अर्ध्या आकाराचा आहे.
• प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे बटू ग्रह संबोधले जाते.
• ग्रीक पौराणिक कथेतील हेड्स देवतांच्या प्रदेशातील मृत आत्म्यांचा फेरीवाला Charon वरून हे नाव देण्यात आले आहे.
• Charon हा उपग्रह 22 जून 1978 रोजी जेम्स क्रिस्टी आणि रॉबर्ट एस. हॅरिंग्टन यांनी दुर्बिणीद्वारे शोधले होते.
प्लूटो (बटु ग्रह/लघुग्रह) बद्दल महत्त्वाची माहिती :
Pluto (Dwarf Planet)
• २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली.
• या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण बटु ग्रह(Dwarf Planet) / लघुग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.
• या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला.