
चालू घडामोडी 09, ऑक्टोबर 2024

मालाबार नौदल सराव 2024
Malabar Maritime Exercise 2024
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 च्या मालाबार नौदल सरावामध्ये खालील पैकी कोणते देश सहभागी झाले ?
1. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि संयुक्त अमेरिका
2. भारत, फ्रान्स, श्रीलंका आणि रशिया
3. भारत, मलेशिया, रशिया आणि श्रीलंका
4. भारत, पाकिस्तान, चीन आणि श्रीलंका
उत्तर : भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि संयुक्त अमेरिका

मालाबार बहुपक्षीय सराव 2024
• मालाबार 2024 हा सागरी सराव 08 ते 18 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणार आहे.
• यंदाचा युद्ध अभ्यास भारताने आयोजित केलेला आहे.
• या सरावात भारतासोबत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि संयुक्त अमेरिका (USA) यांचा सहभाग असेल.
मालाबार युद्ध अभ्यास 2024 कसा असणार आहे ?
• विशेष ऑपरेशन्स, पृष्ठभाग, हवाई आणि पाणबुडीविरोधी युद्ध या विषयावरील तज्ञांच्या देवाणघेवाणीद्वारे चर्चा करण्यासह सहकार्य आणि ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्या विस्तृत गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल.
• सागरी क्षेत्रात परिस्थितीजन्य जागरूकता सुधारण्यावर भर देऊन पाणबुडीविरोधी युद्ध, जमीन युद्ध आणि हवाई संरक्षण सराव यासारख्या जटिल सागरी ऑपरेशन्स आयोजित केल्या जातील.
मालाबार नौदल सरावाची (Malabar Maritime Exercise) सुरूवात केव्हा झाली ?
• 1992 मध्ये भारत आणि अमेरिका द्विपक्षीय नौदल सराव म्हणून याची सुरुवात झाली.
• पुढे 2015 मध्ये जपान आणि त्यानंतर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदल मलाबार सरावात सामील झाले.
• सरावात सहभागी देश : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
• हा नौदल युद्ध अभ्यास दरवर्षी हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरांमध्ये आळीपाळीने होतो.
मालाबार नौदल सरावाचे उद्दिष्टे काय आहे ?
• इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य आणि सुरक्षा मजबूत करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
• जागतिक समुदायाच्या आर्थिक प्रगतीकरता मुक्त, सर्वसमावेशक, नियमाधारी इंडो- पॅसिफिक क्षेत्र निर्माण करणे.
खुपऱ्या रोग म्हणजे काय ?
What is Trachoma ?
बातमी काय आहे ?
• जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असे जाहीर केले आहे की, भारत सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या खुपऱ्या (Trachoma) रोगाचे देशातून समूळ उच्चाटन केले.
• हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणारा भारत दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्रातील 3 रा देश ठरला आहे.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भारत खुपऱ्या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन करणारा दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्रातील 3 रा देश ठरला आहे. खुपऱ्या हा रोगामुळे काय परिणाम होतो ?
1. पाय हत्ती सारखे जाड होतात.
2. हृदयाला धोका निर्माण होतो.
3. डोळ्यांवर परिणाम होतो.
4. फुफ्फुसे निकामी होतात.
उत्तर : डोळ्यांवर परिणाम होतो.

खुपऱ्या रोग काय आहे ?
• खुपऱ्या हा डोळ्यांवर परिणाम करणारा जिवाणूजन्य रोग आहे.
• हा रोग क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस (Chlamydia Trachomatis) या जीवाणूमुळे होतो.
• हा रोग डोळ्यांवर परिणाम करतो. उपचार न केल्यास रोग्याल अंधत्व येऊ शकते.
• WHO ने या रोगाला दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग असे संबोधले आहे.
• WHO च्या अंदाजानुसार जगातील 150 दशलक्ष लोकांना खुपऱ्या रोगाचा संसर्ग झाला असून त्यापैकी 60 लाख लोकांना अंधत्व आले आहे. किंवा त्यांची दृष्टी अधू करणारी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
• हलक्या दर्जाच्या पर्यावरणीय परिस्थितीत राहणाऱ्या वंचित समुदायाच्या लोकांमध्ये खुपऱ्या आजार प्रामुख्याने आढळतो.
खुपऱ्या (Trachoma) हा आजार कसा पसरतो ?
• खुपऱ्या हा संसर्गजन्य आहे.
• हा रोगसंक्रमित लोकांचे डोळे, पापण्या, नाक किंवा घशातील स्राव यांच्या संपर्कातून पसरतो.
खुपऱ्या आजाराशी लढण्यासाठी भारत सरकारचे उपक्रम :
• देशात 1950-60 या कालावधीत अंधत्व येण्याच्या कारणांमध्ये खुपऱ्या हे प्रमुख कारण होते.
• त्यानंतर वर्ष 1963 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय खुपऱ्या नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली आणि नंतरच्या काळात भारताच्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात (National Program for Control of Blindness) या खुपऱ्या नियंत्रणविषयक प्रयत्नांचे एकत्रीकरण करण्यात आले.
• वर्ष 1971 मध्ये देशात खुपऱ्या रोगामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण 5% होते.
• नंतरच्या काळात राष्ट्रीय अंधत्व तसेच अधू दृष्टी नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध प्रयत्नांमुळे हे प्रमाण 1% पेक्षाही कमी करण्यात भारताला यश आले आहे.
• जागतिक आरोग्य संघटने (WHO) ची SAFE स्ट्रॅटर्जी काय आहे ?
• Surgery : अंधत्वाच्या अवस्थेवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया
• Antibiotics : संसर्ग दूर करण्यासाठी प्रतिजैविक (Antibiotics)
• Facial cleanliness : चेहऱ्याची स्वच्छता
• Environmental Improvement : पर्यावरणीय सुधारणा म्हणजे स्वच्छ पाणी आणि शौचालय यांची सुविधा निर्माण करणे तसेच इतर स्वच्छता सवयींचा अवलंब करणे.
जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटना
World Association of Zoos and Aquariums
बातमी काय आहे ?
जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटनेने अलीकडेच शंकर नावाच्या एका आफ्रिकन हत्तीच्या उपचाराबाबत चिंतेमुळे दिल्ली प्राणीसंग्रहालयाचे सदस्यत्व निलंबित केले आहे.
Subject : GS - पर्यावरण

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणाऱ्या जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्सालय संघटनेबद्दल योग्य विधान निवडा.
1. ही जागतिक स्तरावर प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालयांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संस्था आहे.
2. ही संघटना 1935 मध्ये स्थापन करण्यात आली आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटनेबद्दल थोडक्यात माहिती :
• जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटना 1935 मध्ये स्थापन करण्यात आली आहे.
• ही जागतिक स्तरावर प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालयांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संस्था आहे.
• या संघटनेच्या सदस्यांमध्ये जगभरातील अग्रगण्य प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय आणि मत्स्यालयांच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय संघटना, तसेच प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्य किंवा प्राणीसंग्रहालय शिक्षक यासारख्या काही संलग्न संस्थांचा समावेश आहे.
• जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटनेने आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्थांसोबत भागीदारी केली आहे.
• एकत्रितपणे, ते बेकायदेशीर वन्यजीव व्यापार, कोरल-रीफ जीर्णोद्धार, सागरी कचरा, शाश्वत पाम तेल आणि हवामान बदल यासारख्या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी संघटना वचनबद्ध आहेत.
जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटनेचे उद्दिष्ट काय आहे ?
• प्राणीसंग्रहालय, मत्स्यालय आणि जगातील समविचारी संस्थांना पशुंची निगा आणि कल्याण, पर्यावरण शिक्षण आणि जागतिक संवर्धन या सारख्या क्षेत्रात मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे आहे.