
चालू घडामोडी 08, ऑक्टोबर 2024

भारतीय वायुसेना दिन
92nd Indian Air Force Day 2024
92 व्या भारतीय वायुसेना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय वायुसेनेची स्थापना केव्हा करण्यात आली ?
1. 8 ऑक्टोबर 1910
2. 8 ऑक्टोबर 1922
3. 8 ऑक्टोबर 1932
4. 8 ऑक्टोबर 1942
उत्तर : 8 ऑक्टोबर 1932

• दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो.
• यंदाचा हा 92 वा भारतीय वायुसेना दिवस आहे.
भारतीय वायुसेना दिन का साजरी करतात ?
भारतीय वायुसेनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आणि जवानांच्या बलिदानाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो.
भारतीय वायुसेनचा इतिहास :
• स्थापना : 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना करण्यात आली.
• स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सहाय्यक हवाई दल म्हणून हे दल स्थापना करण्यात आले.
• त्यावेळी हवाई दलास रॉयल इंडियन एअर फोर्स (Royal Indian Air Force) म्हणून ओळखले जात असे.
• 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, "रॉयल" हा शब्द वगळण्यात आला.
• 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर हे हवाई दल भारतीय वायुसेना (Indian Air Force) बनले.
भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य काय आहे ?
What is Indian Air Force Motto ?
• "नभः स्पृशं दीप्तम्" हे भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य आहे.
• याचा अर्थ गौरवाने आकाशाला स्पर्श करा (Touch the Sky with Glory) असा होतो.
• भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य गीतेच्या अकराव्या अध्यायातून घेतले आहे.
• महाभारताच्या महायुद्धात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेले हा एक उपदेश आहे.
2024 साठी भारतीय वायु सेनेची संकल्पना (थीम) काय आहे ?
" भारतीय वायु सेना - सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर ”. ही आहे.
सध्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहे ?
• एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहे.
• एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी ३० सप्टेंबर 2024 रोजी हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
🧐हे तुम्ही वाचलं आहे का ?
भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख कोण आहे ?
चालू घडामोडी 24, सप्टेंबर 2024
हिराकुड धरण कालवा प्रणालीच्या नूतनीकरणासाठी 855 कोटींची तरतूद
Hirakud Dam
बातम्यांमध्ये : ओडिशा सरकारने हिराकुड धरण कालवा प्रणालीच्या नूतनीकरणासाठी ₹855 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे संबलपूर, सुवर्णापूर, बारगढ आणि बालनगीर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सिंचनासाठी मदत मिळेल.
Subject : GS - भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतातील सर्वात लांब धरण, हिराकुड धरण, खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे ?
1. तापी
2. गोदावरी
3. महानदी
4. कावेरी
उत्तर : महानदी

हिराकुड धरणबाबत महत्त्वाची माहिती :
• हिराकुड धरण हे स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील पहिल्या मोठ्या बहुउद्देशीय नदी खोऱ्यातील प्रकल्पांपैकी एक आहे.
• हिराकुड धरण महानदीवर बांधण्यात आले आहे.
• हे धरण ओडिशा राज्यातील संबलपूर शहराच्या सुमारे 15 किमी वरच्या दिशेने बांधले गेले.
• हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
• हिराकुड धरण हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे.
• हिराकुड धरणाची लांबी 25.8 किमी आहे.
• 1957 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले.
• हिराकुड धरण हे हिराकुड जलाशय बनवते, ज्याला हिराकुड तलाव असेही म्हणतात.
• हिराकुड जलाशयाला 2021 मध्ये रामसर स्थळ घोषित करण्यात आले.
हिराकुड धरण बांधण्याचे उद्दिष्ट काय होते ?
• पुरापासून संरक्षण : महानदीला येणाऱ्या पुरांपासून संरक्षण करण्यासाठी.
• वीजनिर्मिती : दोन पॉवरहाऊसद्वारे वीजनिर्मितीची स्थापित क्षमता 347.5 मेगावॅट आहे.
• सिंचनासाठी पाणी : या प्रकल्पातून १,५५,६३५ हेक्टर खरीप आणि १,०८,३८५ हेक्टर रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाईनर प्रश्न
प्रश्न) ओडिशाचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत ?
उत्तर : श्री मोहन चरण माझी
प्रश्न) हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : ओडिशा
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजे काय ?
What are Eco-Sensitive Zones ?
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) गीर राष्ट्रीय उद्यान खालील पैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. उत्तर प्रदेश
2. मध्य प्रदेश
3. गुजरात
4. महाराष्ट्र
उत्तर : गुजरात

पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची बातमी काय आहे ?
गुजरातमधील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी गीरच्या जंगलाभोवती प्रस्तावित इको-सेन्सिटिव्ह झोनला विरोध केला आहे.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणजे काय ?
• दुर्मिळ प्राणी, पक्षी, झाडे, वनऔषधी व जंगल अशी जैवविविधता असलेले क्षेत्र म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन.
• पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी त्याचे जतन आवश्यक असते. त्यासाठी काही नियम ठरवले जातात.
• केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेल्या राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्यानुसार (2002-2016),
• राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांच्या सीमेच्या 10 किमीच्या आत असलेली जमीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र(Eco-Sensitive Zone) किंवा इको-फ्रेजील झोन म्हणून जाहीर केली जाईल.
• 10 किमी नियम सामान्य तत्त्व म्हणून लागू केला जात असताना, त्याचे क्षेत्र बदलू शकते.
• जर एखादे क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणजेच "संवेदनशील कॉरिडॉर" असतील तर केंद्र सरकार 10 किमीच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ESZ) म्हणून अधिसूचित करू शकते.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone) चे महत्त्व काय आहे ?
• Shock Absorbers : इको-सेन्सिटिव्ह झोन संरक्षित क्षेत्रांसाठी ( Shock Absorbers ) म्हणून काम करतात, जेणेकरुन मानवी हस्तक्षेपामुळे "नाजूक परिसंस्थेवर" (fragile ecosystems) होणारा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होईल.
• संक्रमण क्षेत्र ( Transition Zone ) : ही क्षेत्रे उच्च संरक्षणाची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांपासून कमी संरक्षणाची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांपर्यंत संक्रमण क्षेत्र म्हणून काम करतात.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone) मध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे ?
कृषी किंवा फळबाग शेती, पावसाचे पाणी साठवण, सेंद्रिय शेती, इत्यादी.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone) मध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी नाही ?
कोणत्याही व्यावसायिक खाणकाम, दगड उत्खनन, मोठे जलविद्युत प्रकल्प, प्रदूषण करणारे उद्योग, वीटभट्ट्या इत्यादींना परवानगी नाही.
गीर संरक्षित क्षेत्र :
गीर संरक्षित क्षेत्रांमध्ये गीर राष्ट्रीय उद्यान, गीर वन्यजीव अभयारण्य, पानिया वन्यजीव अभयारण्य आणि मितियाला वन्यजीव अभयारण्य, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील जुनागड, अमरेली आणि गिर सोमनाथ जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
महाराष्ट्रात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहेत का ?
हो. महाराष्ट्रातील पाचगणी, माथेरान, नाशिक आणि महाबळेश्वर इत्यादी ठिकाणांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये यापुर्वीच समावेश करण्यात आला आहे.