
चालू घडामोडी 07, मार्च 2025 | खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 | Khelo India Para Games 2025

खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025
Khelo India Para Games 2025
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 स्पर्धा कोठे होणार आहे ?
1. नवी दिल्ली
2. हैद्राबाद
3. तामिळनाडू
4. मुंबई
उत्तर : नवी दिल्ली
बातमी काय आहे ?
• केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची केली नुकतीच घोषणा केली.
खेलो इंडिया पॅरा गेम्स केव्हा होणार आहे ?
• नवी दिल्ली येथे 20 ते 27 मार्च 2025 दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स (दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा) होणार आहे.
• या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल पॅरा ॲथलीट (क्रीडापटू) देखील सहभागी होणार आहेत.
खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• खेलो इंडिया पॅरा गेम्स हा खेलो इंडिया मिशनचा एक भाग असून, तो प्रतिभावान खेळाडूंना त्यांचे क्रीडा आणि स्पर्धात्मक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
• खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांचे यंदा दुसर्यांदा आयोजन होत आहे.
• आगामी खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धां 2025 मधील 6 क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 1230 पॅरा ॲथलीट स्पर्धेत सहभागी होतील.
• खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धां 2025 मध्ये पॅरा तिरंदाजी, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा भारत्तोलन, पॅरा नेमबाजी आणि पॅरा टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतील.
पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले ?
• डिसेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथे पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
• पॅरा ॲथलीट्सना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा प्रदर्शित करता यावी, यासाठी डिसेंबर 2023 मध्ये पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करण्यात आले होते.