
चालू घडामोडी 07, मार्च 2025 | प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना म्हणजे काय ? | Jan Aushadhi Diwas

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना म्हणजे काय ?
Jan Aushadhi Diwas
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) देशभरात जनऔषधी दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 28 फेब्रुवारी
2. 7 मार्च
3. 8 मार्च
4. 14 मार्च
उत्तर : 7 मार्च
बातमी काय आहे ?
• 7 मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
• त्याचबरोबर 1 ते 7 मार्च 2025 हा आठवडा देशभरात 'जनऔषधी सप्ताह' म्हणून साजरा करण्यात आला या दरम्यान देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात आले.
जनऔषधी दिवस का साजरी करण्यात येतो ?
• परवडणाऱ्या जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 7 मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जातो.
• जनऔषधी दिवस हा प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजने (PMBJP) अंतर्गत साजरी करतात.
पहिला जनऔषधी दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
7 मार्च 2019 रोजी पहिला जनऔषधी दिवस साजरी करण्यात आला.
जनऔषधी दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• " दाम कम, दवाई उत्तम " ही जनऔषधी दिवस 2025 ची संकल्पना आहे.
• 2025 ची ही थीम सर्वांसाठी परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या औषधांवर लक्ष केंद्रीय करते.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना काय आहे ?
Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana
• 2008 मध्ये जनौषधी योजना म्हणून दुकानांद्वारे परवडणाऱ्या दरात औषधे पुरवण्यासाठी रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती.
• पुढे 2015 मध्ये या योजनेचे सुधारणा करून योजनेचे नाव प्रधानमंत्री जन औषधी योजना करण्यातआहे.
• 2016 मध्ये योजनेला गती देताना पुन्हा या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना असे करण्यात आले.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनचे उद्दिष्ट्ये कोणते ?
• सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे, उपभोग्य वस्तू आणि शस्त्रक्रियांच्या वस्तू उपलब्ध करून देणे आणि ग्राहक/रुग्णांचा खर्च कमी करणे.
• सर्वसामान्यांमध्ये जेनेरिक औषधे लोकप्रिय करणे.
• विविध प्रकारच्या जेनेरिक औषधांची उपलब्धता करून वंचित/ मुख्यतः गरीब लोकांपर्यंत औषधे पोहचवणे.
• जनऔषधी केंद्रे उघडण्यात वैयक्तिक उद्योजकांना सहभागी करून रोजगार निर्माण करणे.
• जन औषधी केंद्रे ब्रँडेड औषधांना पर्यायी असलेले जेनेरिक औषधे 50 ते 80% कमी किमतीत औषधे देतात.