
चालू घडामोडी 07, मार्च 2025 | T-72 Tank | T-72 रणगाडा

T-72 रणगाडा | T-72 TANK
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भारताने T-72 रणगाड्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला ?
1. अमेरिका
2. रशिया
3. फ्रान्स
4. जर्मनी
उत्तर : रशिया
बातमी काय आहे ?
• भारताच्या संरक्षण मंत्रालयाने रशियन महासंघाच्या रोसोबोरोन एक्सपोर्ट (Rosoboronexport) सोबत 248 दशलक्ष डॉलर्स किमतीचा करार केला आहे.
• या कराराअंतर्गत T-72 रणगाड्यासाठी 1000 HP इंजिन संपूर्णतः तयार स्थितीत आणि जोडणी केलेल्या अर्ध-तयार अवस्थेत असतील.

मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन :
• या कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संरक्षण क्षेत्रातील 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी या करारात तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अंतर्गत रोसोबोरोन एक्सपोर्टकडून चेन्नईच्या अवाडी येथील आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड (अवजड वाहन कारखाना) ला इंजिन जोडणी आणि नंतर परवानाधारक उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा (Transfer of Technology) समावेश आहे.
कराराने काय फायदा होईल ?
• T-72 रणगाडा हा भारतीय लष्कराच्या मुख्य रणगाडा ताफ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
• सध्या हे रणगाडे 780 HP इंजिनने सुसज्ज आहेत.
• मात्र 1000 HP इंजिनने त्यांना अधिक शक्तिशाली बनवता येईल,
• ज्यामुळे भारतीय लष्कराची रणभूमीवरील गतिशीलता आणि आक्रमक क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.
T-72 रणगाड्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• T-72 रणगाडा हा सोव्हिएत रशिया ने डिझाइन केलेला आहे.
• 1971 मध्ये सादर झाल्यापासून T-72 रणगाडा अनेक देशांच्या सशस्त्र दलांचा आधारस्तंभ आहे.