
चालू घडामोडी 11, ऑक्टोबर 2024

Loknayak Jayaprakash Narayan Birth Anniversaries
लोकनायक जयप्रकाश नारायण जयंती
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जयप्रकाश नारायण यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
1. लोकमान्य
2. लोकनायक
3. लोकहितवादी
4. सरदार
उत्तर : लोकनायक
• लोकमान्य - बाळ गंगाधर टिळक.
• लोकनायक - जय प्रकाश नारायण.
• लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख.
• सरदार - वल्लभभाई पटेल

लोकनायक जयप्रकाश नारायण कोण होते ?
जन्म: 11 ऑक्टोबर 1902 , बिहार मधील सीताबदियारा येथे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला.
विचारसरणी :
• अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्यांच्या वर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडला.
• ते गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते होते.
स्वातंत्र्य संग्रामातील योगदान :
• 1929 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.
• 1932 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला.
• 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष, या काँग्रेस पक्षातील डाव्या विचारसरणीच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
• 1939 मध्ये, ब्रिटनच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात भारताच्या सहभागाला विरोध केल्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले पण ते निसटले.
• गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसऱ्या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाशांनी चळचळीची सूत्रे सांभाळली.
स्वातंत्र्योत्तर भूमिका :
• काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही म्हणून 1948 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस पक्ष सोडला.
• 1952 मध्ये त्यांनी प्रजा समाजवादी पार्टी (Praja Socialist Party) स्थापन केली.
• 1954 मध्ये, त्यांनी आपले जीवन केवळ विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला समर्पित केले.
• भूदान चळवळीने धनाढ्य जमीनमालकांना त्यांच्या जमिनीचा काही भाग स्वेच्छेने भूमिहीन लोकांना देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय आणीबाणी विरोधी लढा :
• जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांची निवड रद्द केली आणि अतिरिक्त सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली आहे.
• पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.
• त्यांनी इंदिरा गांधी राजवटीविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले.
संपूर्ण क्रांती म्हणजे काय ?
• या दरम्यान 1974 मध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, सामाजिक परिवर्तनाच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला.
• या कार्यक्रमांना त्यांनी 'संपूर्ण क्रांती' (Total Revolution) असे म्हटले.
• या क्रांतीतून सर्वांसाठी प्रगतीचा विचार करणारा आदर्श समाज निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता.
पुरस्कार आणि सन्मान :
• 1965 : सार्वजनिक सेवेसाठी त्यांना 1965 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
• 1999 : जयप्रकाश नारायण यांना "स्वातंत्र्य लढ्यात आणि गरीब व दलितांच्या उत्थानासाठी केलेल्या अमूल्य योगदानासाठी" भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न (1999) मरणोत्तर बहाल करण्यात आला.
भारतरत्न नानाजी देशमुख जयंती
Nanaji Deshmukh Birth Anniversary
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतरत्न नानाजी देशमुख यांबद्दल खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.
1. त्यांनी भारतातील पहिल्या ग्रामीण विद्यापीठाची स्थापना केली.
2. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य

🧐 भारतरत्न नानाजी देशमुख कोण होते माहिती आहे का तुम्हाला ?
नानाजी देशमुख, भारतातील एक समाजसुधारक आणि राजकारणी होते. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण काम केले.
• जन्म : 11 ऑक्टोबर 1916 महाराष्ट्रातील (सध्याचे) हिंगोली जिल्हातील कडोली येथे झाला.
• मूळ नाव : चंडिकादास अमृतराव देशमुख
• लोकमान्य टिळक आणि त्यांची राष्ट्रवादी विचारधारेने प्रभावित होते.
• ते भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते होते.
• आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
• नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनामागील प्रमुख शक्ती होते.
सामाजिक कार्य :
• नानाजी देशमुख हे आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण स्वावलंबनावर लक्ष केंद्रित करणारे समाजसुधारक होते.
• त्यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ - चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाची स्थापना केली आणि विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम केले.
राजकारणी आणि खासदार :
• ते जनता पक्षाच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते.
• 1977 च्या लोकसभा निवडणुकीत बलरामपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले.
• 1999 मध्ये त्यांनी देशासाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती.
मृत्यू : 27 फेब्रुवारी 2010.
पुरस्कार आणि सन्मान :
• 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• 2019 मध्ये, देशासाठी केलेल्या सेवांसाठी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर त्यांना बहाल करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन
International Day of the Girl Child
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरी करतात ?
1. 8 मार्च
2. 5 सप्टेंबर
3. 11 ऑक्टोबर
4. 14 नोव्हेंबर
उत्तर : 11 ऑक्टोबर
19 डिसेंबर 2011 ला संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl) म्हणून घोषित केला होता.

पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
11 ऑक्टोबर 2012
पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची संकल्पना थीम काय होती ?
बालविवाह समाप्त करणे
आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा हेतू काय आहे ?
मुलींना सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांची दखल घेत त्यांच्या मानवी अधिकारांची पूर्तता करण्याचा आणि मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधण्याचा हेतू यामागे आहे.
2024 च्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची संकल्पना (थीम) काय आहे ?
भविष्यासाठी मुलींची दृष्टी
‘Girl's Vision for the Future’.
नोट : 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे.
• बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो.
• ३ जानेवारी या सावित्रीमाईंच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रात बालिका दिवस साजरा केला जातो.
• महाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.