
चालू घडामोडी 17, मार्च 2025 | रमाकांत रथ यांचे निधन | Ramakanta Rath Passes Away

रमाकांत रथ यांचे निधन
Ramakanta Rath Passes Away
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रख्यात कवी आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष रमाकांत रथ हे प्रामुख्याने कोणत्या भाषेचे लेखक आणि कवी होते ?
1. हिंदी
2. उडिया
3. बंगाली
4. मराठी
उत्तर : उडिया (Odia)
बातमी काय आहे ?
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रख्यात ओडिया कवी आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष रमाकांत रथ यांचे रविवारी, 16 मार्च 2025 रोजी निधन झाले.
रमाकांत रथ यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• रमाकांत रथ यांचा जन्म 13 डिसेंबर 1934 रोजी ओडिशा च्या कडक या ठिकाणी झाला.
• रमाकांत रथ हे 1957 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रुजू झाले.
• ओडिशाचे मुख्य सचिव आणि भारत सरकारचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे.
• रथ हे साहित्य अकादमीचे सहा वर्षे उपाध्यक्ष आणि पाच वर्षे अध्यक्ष होते.
• साहित्य अकादमीचे अध्यक्षपद भूषविणारे ते पहिले उडिया भाषक ठरले.
• त्यांच्या साहित्यात गद्य आणि गीतात्मकतेचे मिश्रण आहे, ज्यामुळे ओडिया कवितेला आधुनिक शब्दरचना सादर झाली.
• त्यांच्या कविता इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
• त्यांना उडिया कवितेला आधुनिक वळण देणारा कवी म्हणूनही ओळखले जाते.
पुरस्कार आणि सन्मान :
2006 मध्ये उडिया साहित्यातील योगदानासाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने रमाकांत रथ यांना सन्मानित करण्यात आले.
• केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (1978)
• सरस्वती सन्मान (1992)
• पद्मभूषण (2006)
• अतिबदी जगन्नाथ दास पुरस्कार (2018) – ओडिशाचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान
• राज्य साहित्य अकादमी पुरस्कार
• बिशुवा सन्मान
• कबीर सन्मान
प्रमुख साहित्य आणि काव्यसंग्रह :
• केते दिनर
• अनेक कोठरी
• संदिग्ध मृगया
• सप्तमऋतू (साठी साहित्य अकादमी पुरस्कार जिंकला)
• सचित्र अंधार
• श्रीराधा
• श्रीपलातक