
चालू घडामोडी 14, मार्च 2025 | कॅनडाचे नवे पंतप्रधान कोण ? | Who is the new Prime Minister of Canada ?

कॅनडाचे नवे पंतप्रधान कोण ?
Who is the new Prime Minister of Canada ?
Subject : GS - जगाचा भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच मार्च 2025 मध्ये कॅनडाचे नवे पंतप्रधान कोण बनले ?
1. डोनाल्ड ट्रम्प
2. मार्क कार्नी
3. एलॉन मस्क
4. जॉर्जिया मेलोनी
उत्तर : मार्क कार्नी (Mark Carney)
• विद्यामान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 7 जानेवारीला राजीनामा दिल्यानंतर त्यांचा वारसदार निवडण्यासाठी पक्षाने अधिवेशन आयोजित केले होते.
• टोरांटोमध्ये झालेल्या कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पार्टीच्या अधिवेशनात मार्क कार्नी यांना 85.9 टक्के मते मिळाली.
• आता मार्क कार्नी किमान सध्यासाठी कॅनडाचे नवे पंतप्रधान असणार आहे.

कोण आहेत मार्क कार्नी ?
• मार्क कार्नी हे एक अर्थशास्त्रज्ञ आणि माजी केंद्रीय बँकर आहेत.
• 2008 मध्ये कार्नी यांची बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून निवड झाली.
• कॅनडाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
• ते बँक ऑफ इंग्लंडने गव्हर्नर ही होते.
कॅनडा देशा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे.
• कॅनडा हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे.
• ओटावा (Ottawa) ही कॅनडाची राजधानी आहे.
• कॅनडियन डॉलर (CAD) हे कॅनडाचे अधिकृत चलन आहे.
• कॅनडा देश 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे.
• कॅनडा देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे.
• कॅनडाची दक्षिणेस अमेरिका हा देश आहे.