
चालू घडामोडी 13, मार्च 2025 | राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे नविन नाव काय ? | Commonwealth Games Federation ?

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे नविन नाव काय ?
What is the new name of the Commonwealth Games Federation ?
Subject : GS - खेळ, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे (Commonwealth Games Federation) ब्रँडिंगसाठीचे नवीन नाव काय आहे ?
1. कॉमनवेल्थ यूनियन
2. कॉमनवेल्थ टीम
3. कॉमनवेल्थ स्पोर्ट
4. कॉमनवेल्थ ॲथलेटिक्स
उत्तर : कॉमनवेल्थ स्पोर्ट (Commonwealth Sport)
राष्ट्रकुल क्रीडा महासंघा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(Commonwealth Games Federation)
• कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (CGF) ने घोषणा केली आहे की ते आता कॉमनवेल्थ स्पोर्ट (Commonwealth Sport) म्हणून ओळखले जाईल.
• हा निर्णय 10 मार्च 2025 रोजी कॉमनवेल्थ दिनाच्या निमित्ताने अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.
• या फेडरेशनचे कायदेशीर अस्तित्वाचे नाव कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन राहील, परंतु सार्वजनिक ओळख आणि ब्रँडिंग आता कॉमनवेल्थ स्पोर्टच्या नावाने असेल.
• संघटनेने निवेदनात असे म्हटले आहे की हे पाऊल केवळ क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन करण्यापलीकडे संस्थेची ओळख मजबूत करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
• ब्रँडिंगमधील बदलाचा उद्देश क्रीडा महासंघापासून जागतिक क्रीडा चळवळीमध्ये संघटनेचे रूपांतर प्रतिबिंबित करणे आहे.
• नवीन नाव संघटनेनच्या खेळांद्वारे एकता, विकास आणि समावेशनाला चालना देण्याच्या भूमिकेवर भर देणारे आहे.

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (Commonwealth Games Federation) म्हणजे काय ?
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन म्हणजे च राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ही एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था आहे जी राष्ट्रकुल देशांमधील खेळाडूंसाठी दर 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) आयोजित करते.
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन मुख्यालय कोठे आहे ?
या संस्थेचे मुख्यालय इंग्लंड देशातील लंडन या शहरात आहे.
पहिल्यांदा राष्ट्रकुल खेळ (कॉमनवेल्थ गेम्स) कधी आयोजित करण्यात आले होते ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, SSC GD 2024)
• पहिल्यांदा राष्ट्रकुल खेळ 1930 मध्ये झाले.
• पहिली राष्ट्रकुल स्पर्धा कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली.
• सुरुवातीला राष्ट्रकुल खेळ हे ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखले जात असे.

प्रश्न) खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते ?
(सरळसेवा भरती, SSC GD 2022)
1. 2008
2. 2010
3. 2012
4. 2014
उत्तर : 2010