
चालू घडामोडी 12, मार्च 2025 | लोकनेते यशवंतराव चव्हाण जयंती

लोकनेते यशवंतराव चव्हाण जयंती
Yashwantrao Chavan Birth Anniversary
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, महाराष्ट्राचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती 2017)
1. सह्याद्रीचे वारे
2. ऋणानुबंध
3. कृष्णाकाठ
4. वरील पैकी सर्व
उत्तर : वरील पैकी सर्व
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांबद्दल महत्त्वाची माहिती :
• यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्यसैनिक, सहकारी नेते आणि समाजसेवक होते.
• 'सामान्य माणसाचा नेता' (लोकनेते) म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते.
जन्म आणि शिक्षण :
• यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.
• त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले,
• तर उच्च शिक्षण त्यांनी कोल्हापूर व पुणे येथे घेतले.
• त्यांनी पुणे येथून कायद्याची पदवी घेतली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
• 1932 च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनादरम्यान ब्रिटीश पोलिसांनी त्यांना अटक केली.
• 1942 च्या भारत छोडो आंदोलनात यशवंतराव चव्हाण सामील झाले.
• सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
• भूमिगत राहून सातारा चळवळीला मदत करताना ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडले.
यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द :
• यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
• यशवंतराव चव्हाण हे 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात भारताचे उपपंतप्रधान ही होते.
• त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाचे पदे भूषविली.

मृत्यू :
• 25 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीत निधन झाले.
• यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कराड येथे, कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतीसंगम या ठिकाणी आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेली पुस्तके :
• सह्याद्रीचे वारे
• ऋणानुबंध
• कृष्णाकाठ
• भूमिका
