
चालू घडामोडी 10, मार्च 2025 | पहिला शौर्य वेदनम् महोत्सव | Shaurya Vedanam Festival

पहिला शौर्य वेदनम् महोत्सव
Shaurya Vedanam Festival
Subject : GS - संरक्षण, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पहिला शौर्य वेदनम् महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला ?
1. हैद्राबाद
2. बिहार
3. नवी दिल्ली
4. गुजरात
उत्तर : बिहार
शौर्य वेदनम महोत्सवा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 7- आणि 8 मार्च 2025 रोजी बिहारमधील पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील मोतिहारी येथे पहिला शौर्य वेदनम् महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
• संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) आणि पूर्व चंपारण जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
शौर्य वेदनम महोत्सव का आयोजित करण्यात आला ?
शौर्य वेदनम महोत्सवाचे उद्दिष्ट काय ?
• भारतीय सशस्त्र दलांच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणे आणि
• तरुणांना आणि सामान्य नागरिकांना संरक्षण दलांबद्दल जागरूक करणे आणि त्यांना प्रेरित करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट्य होते.
कार्यक्रमात भारतीय सशस्त्र दलांच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन :
या कार्यक्रमात लष्कर (Army) , नौदल (Navy) आणि हवाई दलाच्या (Air Force) आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे आणि उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले.
• भारतीय सैन्याने K-9 वज्र तोफा, T-90 भीष्म टँक, स्वाती रडार आणि BMP लढाऊ वाहन यांसारखी प्रगत उपकरणे प्रदर्शित केली.
• भारतीय नौदलाने आपल्या शक्तीचे प्रदर्शन करताना पाणबुड्या (submarines), विध्वंसक (destroyers) आणि विमानवाहू जहाजांचे (aircraft carriers ) मॉडेल प्रदर्शित केले.
• या कार्यक्रमादरम्यान भारतीय हवाई दलाने तीन सुखोई-30 लढाऊ विमाने, दोन AN 32 वाहतूक विमाने आणि चेतक हेलिकॉप्टरसह फ्लायपास्ट केले.
• हवाई दलाच्या आकाश गंगा पथकाने 8000 फूट उंचीवरून उडी मारली.
