
चालू घडामोडी 08, मार्च 2025 | ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ पुरस्कार | ‘Honorary Order of Freedom of Barbados’ Award

‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ पुरस्कार
‘Honorary Order of Freedom of Barbados’ Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, कोणत्या भारतीयाला बार्बाडोस देशाने ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा आपला सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले ?
1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी
3. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
4. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बातमी काय आहे ?
• ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ पुरस्काराबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
‘Honorary Order of Freedom of Barbados’ Award
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बार्बाडोस देशाचा " ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस " पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
• या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन बार्बाडोसचे सरकार आणि तिथल्या जनतेचे जाहीर आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ पुरस्कार का देण्यात आला ?
• कोविड-19 साथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि मौल्यवान मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे बार्बाडोस सरकारने जाहीर केले.
• महामारी काळात मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पाठिंब्यामुळे बार्बाडोसला या संकटातून सावरण्यास मदत मिळाली, असेही बार्बाडोस सरकारने सांगितले.
बार्बाडोस देशा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• बार्बाडोस हे उत्तर अटलांटिक महासागरातील एक कॅरिबियन बेट आहे.
• ब्रिजटाऊन (Bridgetown) ही बार्बाडोस देशाची राजधानी आहे.
• डेम सैंड्रा प्रुनेला मेसन (Dame Sandra Prunella Mason) या बार्बाडोस देशाच्या राष्ट्रपती आहे.
