
चालू घडामोडी 08, मार्च 2025 | ट्रोपेक्स-25 नौदल सराव | TROPEX-25

ट्रोपेक्स-25 नौदल सराव
TROPEX-25
Subject : GS - संरक्षण - युद्ध अभ्यास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ट्रोपेक्स-25 (TROPEX-25) सराव कोठे आयोजित करण्यात आला ?
1. प्रशांत महासागर
2. अटलांटिक महासागर
3. हिंदी महासागर
4. भूमध्य समुद्र
उत्तर : हिंदी महासागर (Indian Ocean)
बातमी काय आहे ?
नुकताच भारतीय नौदलाच्या थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज (TROPEX) या सागरी सरावाची 2025 ची आवृत्ती समारोप झाला.
TROPEX 2025 युद्ध सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
THEATRE LEVEL OPERATIONAL READINESS EXERCISE (TROPEX-25) :
• TROPEX 2025 युद्ध सराव जानेवारी ते मार्च 2025 या दरम्यान भारतीय नौदलाकडून आयोजित करण्यात आला होता.
• हा भारतीय नौदलाचा सर्वात मोठा सागरी सराव आहे.
• त्यात भारतीय लष्कर (Indian Army), भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांचा समावेश आहे.
• हा सागरी सराव दर 2 वर्षांनी हिंदी महासागरात आयोजित केला जातो.

TROPEX 2025 युद्ध सरावा मध्ये कोण कोण सहभागी झाले ?
• या युद्ध सरावात भारतीय नौदलाडून (Indian Navy) 65 ते 70 नौदल जहाजे, 9 ते 10 पाणबुड्या (Submarines) आणि विविध प्रकारच्या 80 पेक्षा जास्त विमाने सहभागी झाले होते.
• तर भारतीय हवाई दलाकडून (Indian Air Force) सुखोई- 30, जग्वार, C-130, AWACS आणि फ्लाइट रिफ्युएलर विमाने तैनात करण्यात आली.
• भारतीय लष्कराडून (Indian Army) 600 पेक्षा जास्त पायदळ सैनिक (Infantry Troops) सहभागी झाले होते.
• तर भारतीय तटरक्षक दलाकडून (Indian Coast Guard) 10 पेक्षा जास्त जहाजांनी सहभाग नोंदवला.
TROPEX युद्ध सरावाचे फायदे काय ?
• या सागरी सरावामुळे भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दल यांना आपापसात ऑपरेशनल (कार्यान्वयन) पातळीवरचा संवाद साधायला मदत होते.
• ज्यामुळे गुंतागुंतीच्या परिस्थितीत एकमेकांबरोबर समन्वय साधून काम करण्याची त्यांची क्षमता आणखी मजबूत होते.
• TROPEX 2025 युद्ध सरावाने भविष्यात लढाईसाठी सज्ज, विश्वासार्ह, एकसंध राहण्याची नौदलाची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.