
चालू घडामोडी 08, मार्च 2025 | जागतिक महिला दिन | International Women’s Day

जागतिक महिला दिन
International Women’s Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी असतो ?
(सरळसेवा भरती, रेल्वे भरती, महाराष्ट्र पोलीस भरती पुणे ग्रामीण 2023, SSC CHSL 2022)
1. 5 मार्च
2. 8 मार्च
3. 10 मार्च
4. 12 मार्च
उत्तर : 8 मार्च
जागतिक महिला दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरी करतात.
• जागतिक महिला दिनाला आंतरराष्ट्रीय महिला दिन असेही म्हणतात.
आपण जागतिक महिला दिन का साजरा करतो ?
• लैंगिक विषमता आणि भेदभावावर प्रकाश टाकण्यासाठी, राजकारण, समाज आणि अर्थव्यवस्थेत महिलांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जगभरात दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.
जागतिक महिला दिन 2025 साठीची संकल्पना (थीम) काय आहे ?
"सर्व महिला आणि मुलींसाठी : हक्क. समानता. सक्षमीकरण." ही यंदाची संकल्पना थीम आहे.
“For All Women and Girls: Rights. Equality. Empowerment.”
या वर्षीची थीम अशी कृती करण्याचे आवाहन करते जी समान हक्क, शक्ती आणि संधी उपलब्ध करून देऊ शकेल.
जागतिक महिला दिना ची संकल्पना कोणी मांडली ?
• क्लारा झेटकिन (Clara Zetkin) यांनी 1910 मध्ये जागतिक महिला दिनाची संकल्पना मांडली.
• क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या.

जागतिक महिला दिन 8 मार्च लाच का साजरी करतात ?
• क्लारां झेटकिन यांनी जेव्हा महिला दिवसाची कल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही ठराविक तारीख नव्हती.
• पुढे 1917 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू असताना रशियन महिलांनी ‘भाकरी आणि शांतता’ अशी मागणी घेऊन संप पुकारला.
• या दरम्यान रशियन महिलांनी शांतता मोहीम आयोजित केली होती.
• काही दिवसातच राजकीय उलथापालथ झाली, रशियन झारना पद सोडावं लागलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
• त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो.
जागतिक महिला दिना ला संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) अधिकृतपणे मान्यता केव्हा दिली ?
• 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक महिला दिना ला अधिकृतपणे मान्यता दिली.
• 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.
नोट :
• 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.
• भारतात , 13 फेब्रुवारी, सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात.